काव्यलेखन

चुकूनसुद्धा...

Submitted by मुग्धमानसी on 14 May, 2013 - 01:55

चुकूनसुद्धा माझा विषय निघू देऊ नकोस
मनात माझ्या क्षणांनाही जगू देऊ नकोस...

हसून सगळं टाळत जा
क्वचित काही बोलत जा
बोलतानाही शब्दांमध्ये
उगाच हसू घोळत जा
दोन शब्दांत जीवघेणं अंतर पडू देऊ नकोस..

देवापुढे दिवा लाव
हात जोड, डोळे मिट
पसरलेलं सगळं मन
पुन्हा लावून ठेव नीट
पण आठवांच्या उतरंडीला धक्का लागू देऊ नकोस...

पानांमागे विसावलेला
चंद्र हळूच बघताना
गार झुळूक हलकेच तुझ्या
अंथरुणात शिरताना
कवटाळलेल्या स्वप्नांत डोळे भिजू देऊ नकोस...

शब्दखुणा: 

रुसवा

Submitted by अज्ञात on 14 May, 2013 - 01:22

कबूल नाही नसलेपण तव
निगूत जपले आहे वैभव
सरले ऋतू कितीक युगाब्धे
हिरमुसले ना जीवन लाघव

अदृष्यातिल दृष्य आभासे
चंचल डोळ्यांमधील बारव
स्मितरेषा गालांवर अंकित
खोल खळ्या ओठांचे पल्लव

भल्या किनारी रुसवा फसवा
अबोल्यात वठले गुंजारव
आभास; विझल्या खुणा सणाच्या
भिजले काळिज हसले शैशव

............................अज्ञात

कोशिंबिर

Submitted by रीया on 13 May, 2013 - 07:19

एकदा झाले काय
भाज्यांना फुटले पाय
टॉमॅटो लागला चालायला
बटाटा लागला पळायला
गाजराची लागली काकडीशी शर्यत
दोघेही निघाले धावत पळत
मिरच्यांनी पाहीली त्यांची गंमत
मटार आले उड्या मारत
विळीताईला पहाता मात्र
सगळे झाले गळित गात्र!
भा़ज्यांची अन मग फजिती झाली
जेवणात आमच्या कोशिंबिर आली.
____________
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

कैसा दत्ता तुझा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 May, 2013 - 06:40

कैसा दत्ता तुझा l पडला विसरl
जळो व्यवहार l माझा आता ll १ ll
काम धंदा उगा l घेतला बोडखी l
केली मानतुकी l घेण्या देण्या ll २ll
म्हणवितो भक्त l रचितो कवित्व l
परी असे रिक्त l घडा माझा ll ३ ll
गेला किती काळ l तुझ्या विस्मरणी l
लागली टोचणी l माझ्या जीवा ll ४ ll
तुची माय बाप l करावी करुणा l
माझिया स्मरणा l नित्य यावे ll ५ ll
हाती असो हात l पाय चलो साथ l
नाम तुझे गात l रात्रंदिन ll ६ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कर्दनकाळ

Submitted by कावळा on 13 May, 2013 - 03:17

शब्दांचे काहूर माजता,पोट जरा करता कलकल
काव्यकमोडावरी बसोनी रोज लिहाव्या दोन गझल.

स्वतःस म्हणतो आम्ही आणिक दुज्यास फटके एकेरी
आम्ही लिहितो अस्सल दुसर्‍याचे लेखन असते बंडल

कुणी करी बेफिकीर गझला,कुणी पाजळे डाक्टरकी
कणखर गझला बिनकामाच्या,अमुच्या गझला फार तरल

सूर्य ,स्मशाने गझलेमध्ये,फूलपाखरे बागडती
मायबोलिच्या चिखलामध्ये ,होय फक्त अमुचेच कमल

स्पष्ट आमच्या गझला,प्रतिमा,रदिफ-काफिये,खयालही
तरी आमच्यावर जळणारे चिवडत बसती काव्यचिखल

नारा अमुचा कभी नही बदलेंगे आहे समजुन घ्या

दोन क्षण...

Submitted by योगेश र. पवार on 13 May, 2013 - 02:04

!!!.....दोन क्षण दुखचे.....!!!

कधी विरहाचे
कधी प्रेमाचे
वाहुन गेलेल्या आसवांच्या प्रवाहाचे
दोन क्षण दुखचे.....

कधी दिवसाच्या स्वप्नाचे
कधी रात्रीच्या जगन्याचे
पाहीलेल्या त्या तुटलेल्या घराचे
दोन क्षण दुखचे.....

कधी वेड्या संसाराचे
कधी जपलेल्या नात्याचे
सोडुन गेलेल्या तिच्या आठवणींचे
दोन क्षण दुखचे.....

कधी परतीच्या वाटेचे
कधी समुद्राच्या लाटेचे
ओंजलीतल्या त्या ओल्या आसवांचे
दोन क्षण दुखचे.....

--- योगेश र. पवार ( yp )

शब्दखुणा: 

रक्त आटते जनतेचे

Submitted by अभय आर्वीकर on 12 May, 2013 - 23:42

रक्त आटते जनतेचे

रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला

सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला

निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला

टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला

दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
दोन्ही हात उरले मात्र, दररोज उर बडवायला

किती सीता पळवायच्या, तुम्ही लागा पळवायला
श्री बजरंग येत आहे, ’अभय’ लंका तुडवायला

"ति"ची गझल

Submitted by आकाश बिरारी on 12 May, 2013 - 17:24

.

तिची लग्ननौका तरे आजही
जरी काळजाला चरे आजही

शरीरे जरी एक झाली तरी
मनांच्या मधे अंतरे आजही

तिचे प्रश्न होते बरोबर कसे
तिला सांगती उत्तरे आजही

पती, बाप, मुलगा ठरवतो तसे
मनीचे तिच्या ना ठरे आजही

तिची पोतसर कैद बनली जणू
तिला खुणवती उंबरे आजही

कधी चारचौघात ना घेतला
तिला तो उखाणा स्मरे आजही

--- आकाश बिरारी

यार

Submitted by चेतन... on 12 May, 2013 - 16:13

मिठीत सुखाने अडखळत घेतले आहे मला
दुःखाने घट्ट उराशी कवटाळले आहे मला

सुख आले सुख गेले सरी जणू वळवाच्या
मळभानेच आजवर सांभाळले आहे मला

सुख म्हणजे क्षणाचे कण चालले सोबत कधी ?
दुःख म्हणजे यार आहे समजले आहे मला

चेतन

डोळ्यांमधलं पाणी

Submitted by चेतन... on 12 May, 2013 - 16:01

रिकामं हृदय जेव्हा
अचानक भरून येत
त्यावेळी डोळ्यांमध्ये
पाणी दाटून येत

डोळ्यातल्या थेंबांना
ओघळायचं असतं
पण थेंबांना कधीही
ओघळता येत नसतं

डोळ्यातले थेंब
डोळ्यातच राहतात
ओघळण्याऐवजी
तरळतच राहतात

डोळ्यातल्या डोहाची
एक खोल खंत
डोळ्यातल्या झऱ्याला
नसतो कधी अंत

करायची फक्त
एक गोष्ट साधी
लपवायचं पाणी
पापणी लवण्याआधी

काहीतरी होत पण
पाणी गळत नाही
आता तर डोळ्यामध्ये
पाणी दिसत नाही

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन