काव्यलेखन

दिल ढूँढता है ...

Submitted by भारती.. on 23 May, 2013 - 04:58

दिल ढूँढता है ...

त्या आळसलेल्या सुखावलेल्या दिनराती
त्या पहिल्या प्रेमाच्या उत्कंठित रुजवाती

सहवास तिचा रंगवीत तंद्रीतच बसणे
मन शोधत आहे पुनः तसे भ्रमणेरमणे

दिस उजाडला तरी अंगणात लोळत होतो
कोवळ्या हिवाळी उन्हाशीच खेळत होतो

मग उपडे पडुनी कूस बदलुनी झोपावे
छायेत तुझ्या पदराच्या डोळे निववावे

कधी उन्हाळ्यातल्या रात्रौ पूर्वेच्या झुळुका
घेऊन सवे येती शीतलशा काळोखा

पसरून छतावर शुभ्रशीत चादरी आम्ही
जागलो किती निरखीत चांदण्या गर्द तमी

आणिक कधीतरी पर्वतातल्या शिशिरात
गोठवते थंडी हिमवर्षावी प्रहरात

दरी खोरी घुमवीत ऐकू येते जणू शांती

शब्दखुणा: 

नाते

Submitted by राजेंद्र देवी on 22 May, 2013 - 07:03

नाते...

हे सारे तेव्हाचं ठरले होते
जेव्हा नाते नुरले होते

मी रिता झालो सारे सांगून
तू ठेवले सारे हातचे राखून
हे सारे तेव्हाच ठरले होते
जेव्हा ग्रह आकाशीचे फिरले होते

त्या विश्वात एकटा मी होतो
दिवस जेथे सारे सरले होते
हे सारे आठवणीतच राहिले
ते विश्व तरी आता कोठे उरले होते

मी खूप प्रयत्न केले ते चित्र पुन्हा साकारण्याचे
ते रंग पण आता कोठे उरले होते
हे गीत जरी स्फुरले मज
शब्द त्याचे विरले होते

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

तुझ्या चिंतनाची नशा और आहे...

Submitted by मुग्धमानसी on 22 May, 2013 - 03:39

तुझ्या चिंतनाची नशा और आहे
तू नसणे समोरी... तसे गौण आहे!

जिथे पाऊले दूर वळली तुझी रे
तिथे मी स्वतःची रोवली वेल आहे!

पहाडाप्रमाणे तुझे स्वत्व जपले
तिथे पायथ्याशी मी अनभिज्ञ आहे!

फुले सांडली ओंजळीतून काही...
तुला काय नुकसान कळणार आहे?

नसूदे तुझा थेंबही सोबतीला
मनी दाटले तूच आभाळ आहे!

मनीच्या प्रदेशी तुझे राज्य असते
जरी ते अताशा कोरडे शुष्क आहे!

अशा छान बेबंद जमतात गप्पा...
मध्ये शब्द उच्चारणे.. व्यर्थ आहे!

शब्दखुणा: 

अबोली

Submitted by रसप on 22 May, 2013 - 03:23

अबोलीच्या फुलांचे
तुझ्या-माझ्या मनांचे
घरांच्या अंगणांचे
कुणी ऐकायचे ?

छतांच्या झुंबरांशी
कड्यांच्या बंधनांशी
जवळच्या अंतरांशी
किती भांडायचे ?

स्मृतींच्या पाउलांना
पसरत्या सावल्यांना
तरल कातर छटांना
कसे वाचायचे ?

तुझे येणे न होते
तुझे जाणे न होते
तुझे असणे न होते
कधी सांगायचे?

इथे सारा पसारा
अनावर कोंडमारा
छुप्या पाऊसधारा
कसे टाळायचे ?

तरीही हाक द्यावी
उरी आशा रुजावी
नजर ओली थिजावी
कुणी समजायचे ?

कैवार सद्गुणांचा...

Submitted by सुशांत खुरसाले on 22 May, 2013 - 03:21

घेशील का मना तू कैवार सद्गुणांचा?
मांडून चल बसूया बाजार सद्गुणांचा..!

मज कैक 'राग' आले अन् कैक 'राग' गेले..
पण आळवीत आलो मल्हार सद्गुणांचा

ती एकदाच मजला भेटून काय गेली..
मी भक्त फार झालो दिलदार सद्गुणांचा !

या नवयुगात आता म्हणतात संत त्याला
ज्याच्या मनास झाला आजार सद्गुणांचा !

दिसतेस खास तू पण..इतकेच वाटते की-
तू एकदा करावा श्रुंगार सद्गुणांचा...!!

एक निःशब्द जाणीव...

Submitted by चेतन... on 21 May, 2013 - 07:09

मध्यरात्रीच्या नीरव शांततेतून
मनाच्या विश्वातील अणुअणुत
भरून राहिली आहे
एक निःशब्द जाणीव
एखाद्या एकाकी तळ्यासारखी...!

रात्रीच्या निराशय गर्भात
ती शोधत आहे
चन्द्रस्पर्शाने जेव्हा पाण्यावर
तरंग उठतील तो क्षण...!

आणि
तोपर्यंत
चंद्राच्या प्रतिबिंबाचे अभिशाप झेलत
आतुरतेने वाट पाहत आहे
सूर्याच्या तप्त रंध्रातून
प्रकट होणारा
पहिला किरण
देहावर पडण्याची...!

-चेतन

सूर्य म्हणतो पावसाचा शाप बघ आला फ़ळाला

Submitted by प्राजु on 21 May, 2013 - 05:12

बहरला मोहोर माझा, का असा पुरता जळाला
सूर्य म्हणतो पावसाचा शाप बघ आला फ़ळाला

बोलण्याचे कायदे होते जरी मी पाळलेले
नेमका कोठे कशाने तोल अर्थाचा ढळाला?

मी कशी अन काय भुलले रे तुझ्या शब्दांस पुन्हा
मानले मी प्रीत बघ फ़सव्या तुझ्या त्या मृगजळाला

हे शिखर नुसते! , नका अंदाज बांधू वेदनेचा
खूप काही साचले आहे जुने माझ्या तळाला

दाटले आकाश डोळा अंतरंगी वीज तांडव
पण तरी आव्हान देते शीड माझे वादळाला

कासवे रडली हजारो, आसवांचा पूर आला
लाडका मासा कदाचित लागला कोण्या गळाला!!

हे सुखासिन दु:ख माझे, खास दुनियेने दिलेले
वाढते त्याची नशा की, मागुनी घेते छळाला

व्यत्यास

Submitted by अमेय२८०८०७ on 20 May, 2013 - 14:07

गंध ओल्या पाकळ्यांचा वाळताना श्वास झाला
बंधनाचे क्लिष्ट धागे तोडताना त्रास झाला

जाळताना पाहिलेले मी शवांना मानवांच्या
ईश्वराला जाळण्याचा सोहळाही खास झाला

घेतल्या मोजून साऱ्या जन्मव्यापी येरझाऱ्या
सार्थकाचा संचिताशी नेमका व्यत्यास झाला

डाव माझा, दान माझे, मीच बाजी लावलेली
खेळताना 'तू' पणाला लागल्याचा भास झाला

तू दिलेल्या आठवांच्या वेदनांचे गीत केले
हुंदक्याच्या सावलीने षड्ज हा खग्रास झाला

चांदणे गेले कुठे?

Submitted by निशिकांत on 20 May, 2013 - 10:36

प्रेम सरले, भाव ह्रदयी दाटणे गेले कुठे?
शिंपिले जे जीवनी तू चांदणे गेले कुठे?

रोमरोमातून फुलतो लागता चाहुल तुझी
जीवघेणे पैंजणांचे वाजणे गेले कुठे?

भेटता तू खास कांही हरवल्यागत वाटते
वाट बघण्याच्या सुखाचे नांदणे गेले कुठे?

बाग का ओसाड झाली? ना कळ्या ना पाकळ्या
गंधवेडे शोधती गंधाळणे गेले कुठे?

बंधने लाखो मुलींवर शोडषी ओलांडता
कालचे निष्पाप हसणे, खेळणे गेले कुठे?

लोप झाला संस्कृतीचा आवडे का पश्चिमा ?
गोड अंगाई जुनी अन् पाळणे गेले कुठए ?

जाहिराती आणि जिंगल्स पाठ पोरांना किती !
श्लोक गीतेचे अताशा घोकणे गेले कुठे ?

व्यर्थ का "निशिकांत" लिहिशी पोटतिडकीने असा?

तरी हे क्षणांनो......

Submitted by बेफ़िकीर on 20 May, 2013 - 05:30

पिढ्यांमागुनी या पिढ्या चाललेल्या
करत सार्थतेला निरर्थक, निनावी
निराशेकडे पावले टाकलेल्या
पुन्हा येत नाहीत या त्याच गावी

जगावे कसे सांगणार्‍या प्रणाली
हजारो निघाल्या पुढे नष्ट झाल्या
पुन्हा ही धरा तेच ते जीव व्याली
प्रणालींतल्या व्यर्थता स्पष्ट झाल्या

कशालाच नाही तसा अर्थ येथे
असा अर्थ मी काढला या जगाचा
करावी कशाला फुका शर्थ येथे
कुणाचा न कोणी न कोणी स्वतःचा

तरी हे क्षणांनो......

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन