काव्यलेखन

येतेस तू अशी की ......

Submitted by deepak_pawar on 1 June, 2013 - 01:25

कधी येतेस तू अशी की
पाऊस उन्हातून यावा
दुःखाचा कणकण माझ्या
तू मायेनं शिंपीत जावा....

झुळूक वार्‍याची बनूनी
तू येशी झुलवीत अशी
शेवरीच्या कापसापरी
हा जीव तरंगत नेशी....

अळवावर दवबिंदू -
जसा,कधी येतेस तशी
जरा चमके विश्व माझे
अंधार पेटवून जाशी......

संध्येचे क्षितिजावरती
रंगाचे मेघ हे झरती
भाळावर चुंबून घेता
बघ नभी पेटल्या ज्योती....

शब्दखुणा: 

उंदीर मांजराचा खाऊ

Submitted by पाषाणभेद on 31 May, 2013 - 15:54

उंदीर मांजराचा खाऊ

एकदा थंडी वाजते म्हणून
एका माऊने केली गाऊ
तेथला उंदीर मनात म्हणाला
आता गुपचूप खाऊ खाऊ

खाऊ होता माऊसमोर
धीर केला उंदराने
हळूच गेला चालत चालत
मांजरीकडे पाहीले त्याने

खाऊचा वास त्याने घेतला
सुटले पाणी तोंडाला
खाऊ न द्यायचा कोणाला
विचार त्याच्या मनातला

डोळे मिटून सताड पडली
अंग चोरून मनी
मिटक्या मारीत खायचा खाऊ
उंदराने स्वप्न पाहीले मनी

होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला

शब्दखुणा: 

त्याने होय म्हणताच

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 31 May, 2013 - 05:01

त्याने होय म्हणताच
सर्वांगी हर्ष दाटला
थांब क्षणभर मना
जरा सावरू दे मला

स्वप्नातील स्वप्न असे
दिसे आज जागृतीला
जणू एक मोरपीस
स्पर्शले रे हृदयाला

आज साऱ्या तपस्येचे
पुण्य आले रे फळाला
याहून अधिक काही..
नाही नि नकोच मला

त्याचा हरेक शब्द मी
हृदयामध्ये झेलला
देहातील कण कण
आज वादळ जाहला

हे खगांनो हे फुलांनो
सांगा हे साऱ्या जगाला
प्रकाश अन वाऱ्यानो
पसरा दाही दिशाला

विश्व पुरेना आनंदा
काय करु हृदयाला
त्याने स्वीकारले मला
अर्थ जीवनाला आला

हा एक काळ आहे

Submitted by निशिकांत on 31 May, 2013 - 01:09

आयुष्य सांज झाली
सरली सकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

होतो कधी तिच्या मी
प्रेमात रंगलेला
मी एकटाच आता
प्याल्यात झिंगलेला
चढता नशा उमगते
जगणे रटाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

माझ्याच इशार्‍यांची
त्यांना असे प्रतिक्षा
झालेत थोर, माझी
करतात ते समिक्षा
होतो जहाल केंव्हा
आता मवाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

जोमात कधी चढलो
मी ऊंच ऊंच शिखरे
उठण्यास तेच गुडघे
करतात आज नखरे
उद्वेग वेदनांचा
आता सुकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

डौलात राज्य मीही
सिंहासमान केले
तख्ता अता पलटला
तह मी गुमान केले
गात्रात त्राण नाही
नुसते आयाळ आहे

कवीराजा (नवरंग १९५८ -भरत व्यास स्वैर अनुवाद )

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 May, 2013 - 12:35

कवीराजा
करू नकोस उगाच शब्द तोडमोड
काही धंदा कर थोडे पैसे जोड
शेर शायरी तुझी नच कामी येणार
कवितेची वही अन वाळवी खाणार
भाव वाढतो वेगान धान्य महागते भराभर
मरशील उपासाने भुके जागशील रात्रभर
म्हणून सांगतो तुज मित्रा हे सारे सोड
काही धंदा कर थोडे पैसे जोड
चल फेक पेन ते कर बंद काव्यमशीन
बघ रोकड किती घरी नि शिल्लक अजून
घरात उरले किती तूप नि गरम मसाला
किती पापड लोणच अन तिखट मसाला
किती तेल मिरची हळदी नि धने जिरे
कविराजा अन हळूच तू वाणी बन रे
अरे पैशावर लिही काव्य अन गीत भूकेवर
गव्हा वरती गझल होऊ दे शेर धान्यावर
लवंग मिर्ची वर चौपाई तांदुळावर दोहे
कोळश्यावर लिहशील तर वाह क्या बात है

माझा कोंकण

Submitted by कोकण्या on 30 May, 2013 - 07:26

घरी कोकणात जात असताना सड्यावर आल्यावर पहाटे पहाटे सुमद्र किनारा आणि लाल झालेले आकाश, थोड्याच वेळात पावसाने त्या लाल रंगावर ओठलेली काळि झालर आणि बदलनारा सगळा परिसर पाहुन सुचलेले ..

माझाहि एक प्रयत्न!

माझा कोंकण

माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोकण!
दर्‍या खोर्‍यांचे आंगण, त्याला ढगांचे गोंदन!
माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोंकण!!१!!

हिरवा मावळा होउन, उभा सह्याद्रिचा कडा,
नीळ्या सागर किनारी, शांत पहुडला सडा,
सड्याच्या काळ्या तनुवरी फुलली आमराई,
सह्याद्रीच्या कुशितुनी उगवली काजुचि हिरवाई
झंजु मुंजु कातरवेळी शांत सागराचे भाळी

शब्दखुणा: 

कशिदाकाम

Submitted by भारती.. on 29 May, 2013 - 05:05

कशिदाकाम

मनासकट माणसे पचवणे : फूटपाथचे अजगरी धोरण.
तिच्या कशिद्यांना साक्ष ठेवून.
खिडकीच्या माथ्यावर ती टांगते सर्वसर्वज्ञ गुलबक्षी तोरण.

सारे पदपथिक. एकच शून्याभास. सार्‍या संवेदनात निमंत्रण आत्मसात
अंतिम सत्याचे. हे नाव मृत्यूचे.
ती विणते शालीवर फुले. ठेवते डांबरगोळ्या कोमल गंधकोशात.

संमिश्र अनाहत गलबलाटात अपघाताची एक किंकाळी विखुरलेली.
पडद्यावर सळसळतात नृत्यमग्न मोर
बोटांच्या मेणबत्त्या मालवून एव्हाना ती उठून आत गेलेली.

भारती बिर्जे डिग्गीकर
( 'मध्यान्ह', मौज प्रकाशन,२००६ मधून)

नक्षलवादी..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 May, 2013 - 04:13

आमचीच मारतात
का आम्हास हि माणसे
आपलेच रक्त कशी
सांडतात हि माणसे .
जळूनिया कूस आई
हंबरडा फोडते रे
आज त्याची उद्या तुझी
घर हेच जळते रे .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय दाटलेले l

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 May, 2013 - 04:13

भय दाटलेले l आहे जगण्याचे l
कुठल्या व्यथेचे l ओझे हे ll १ ll
मीच सोडविता l मज म्हणविता l
हसता हसता l पुरे वाट ll २ ll
कुणाला बोलू l आणि समजावू l
अवघे टाकावू l असे बोल ll ३ ll
फुटक्या शब्दांचे l जुनेच हे गाणे l
लिहितो नव्याने l शहाणा मी ll ४ ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन