काव्यलेखन

खाबूगिरी...!!!

Submitted by रोहितगद्रे१ on 5 June, 2013 - 04:53

टुजी थ्रीजी सगळे बीजी
आग आग जळून खाक
शोध शोध कागद शोध
झाली राख शांतता राख

टोवर उंच खूप खूप
उभे राहिले गुप चूप
साहेब सगळे हुप हुप
मिशीला दिसते अजून तूप

बंदूक बंदूक खेळे बाळ
काडतुसाची लपवी माळ
पोलिस पोलिस भाईला ओलिस
चार धपाटे उगाच बालिश

धरण धरण नुसता घात
काकाजींना वरण भात
उस उस मोठ्ठा उस
पाणी पळवा लावून फूस

रस्ता रस्ता मोठ्ठा रस्ता
गाडी ऎटीत धावत असता
धडाक धड गाडी आत
खड्डा पडला चार हात

देऊळ

Submitted by panks on 5 June, 2013 - 04:35

देवळाच्या घाभाऱ्यात बसलेल्या देवाला विचारल
मिळत कारे समाधान तुला या चार भिंतीत
त्यातील समोरची भिंत सजीव पण सतत बदलणारी
त्या भिंतीवरचे भाव वेगळे रंग वेगळे रूप वेगळे
पण एक गोष्ट सारखीच तिचे डोळे जे सदैव मिटलेले
अन तुझ्या अखंड कृपेची वाट बघणारे
तुलाही आता सवय झाली असेल या रंगांची आणि
मिटलेल्या डोळ्यातील अपेक्षांची.
का कंटाळलास तू सुद्धा या रोजच्याच अपेक्षांनी भरलेल्या भिंतीना
वाटत तुलाही जाव पळून कुठेतरी निर्जन ठिकाणी
जेथे असेल फक्त निरागस प्रेम ना कुठल्या भिंती ना कुठले आसन
पण तुला तसही करून चालणार नाही
कारण तुला ह्या भिंतीनीच आसनावर सुरक्षित वा बंदिस्थ

पाऊस

Submitted by आर.ए.के. on 4 June, 2013 - 07:43

ओली माती , ओले आभाळ,
काळ्या ढगांचा, काळाच महाल!

ओले दप्तर , ओला डबा,
ओल्या रस्त्यावर , मित्रांची सभा!

ओले कपडे , ओले बूट,
ओल्या शाळेत , अभ्यासात सूट!

ओले रस्ते ,ओल्या पायवाटा,
ओल्या मैदानात , पाण्याचा साठा!

ओले आकाश , ओल्या विजा,
ओल्या रात्रीत, पांघरुणात निजा!

ओली पाने, ओली फुले,
ओल्या झाडावर, वेल झुले!

ओले आसमंत , ओल्या सार्‍या दिशा,
काळा-सावळा दिवस, अन काळी कुट्ट निशा!

तुला कधी कळेल का?

Submitted by मुग्धमानसी on 4 June, 2013 - 03:54

भेटलो जिथे पाऊल
पुन्हा तिथे वळेल का?
पुन्हा माझी आठवण
तुला तशी छळेल का?

दूर जायचेच होते
सार्‍या रहाटीपासून
पण तुझे दूर जाणे
मला सांग टळेल का?

आता देशील सोबत
आता धरशील हात
माझे पांगूळले मन
कधी पुन्हा पळेल का?

दोन शब्द हवे होते
तेंव्हा गप्प राहिलास
आता गाईलेस गाणे
माझ्या कानी पडेल का?

वाट पाहता पाहता
जीव कंटाळून गेला
उंबर्‍यात तू दिसावा
असे कधी घडेल का?

असे मन जाळताना
क्षण क्षण हारताना
माझ्या हासण्याचे रडे
तुला कधी कळेल का?

शब्दखुणा: 

पावसाची मिठी

Submitted by पुरंदरे शशांक on 4 June, 2013 - 02:57

पावसाची मिठी

भरदिसा पडे
पावसाची मिठी
नाही रीती भाती
कशी म्हणू प्रिती

तुडवीतो राने
करी चोळामोळा
धावे सैरावैरा
कसा याचा चाळा

थेंब किती भारी
सरीवर सरी
करी शिरजोरी
लगटतो उरी

पावसाची मिठी
ओलावली दिठी
किती दिसा झाली
सजणाची भेटी

उणावे आवेग
पुरेपूर संग
उन्हात हसुनी
निहाळी नि:संग

लाजली धरणी
मुख घे झाकोनी
हासू झळकले
पदरा आडोनी ....

शस्त्र घ्यायला हवे

Submitted by अभय आर्वीकर on 4 June, 2013 - 00:00

शस्त्र घ्यायला हवे

श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे

ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे
टोचल्या फळास ठीक सावरायला हवे

शीग येइना कधीच पायलीस का इथे?
कोण लाटतोय रास आकळायला हवे

भेद शासका कशास नागरी व गावठी?
वाटणे निधी समान हे शिकायला हवे

लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे

कालचे तुफानग्रस्त सज्ज होतसे पुन्हा
झेप घेत उंच-उंच बागडायला हवे

पहिल्या पावसात...

Submitted by सांज मन on 3 June, 2013 - 10:00

पहिल्या पावसात...
पहिल्या पावसात वाटल दुसर्‍यांदा भिजाव,
पण पावसाच्या हे मुळीच मनी नसाव,
त्याने ढगाखाली हात पसरावेत,
मान उंच करवी,
डोले मिटावेत,
आणि पावसाने मात्र उद्यासाठी उराव...

बोचर्‍या वार्‍याने हळुवार याव,
हातच्या उबेने त्याला नमवाव,
याच उबेत तिच्या आठवनींना जपाव,
पहिल्या पावसात...

ओठांनी शिळ घालावी,
गालांनी कळी खुलवावी,
उडत्या केसात हात फिरतोच,
तो, तिन समोर याव
ते ही पहिल्या पावसात...

मग अबोल ती आणि अबोल तो,
अन टपोर्‍या थेबांनी याव,
तिच्या गालावरुन ओघळाव

शब्दखुणा: 

शिवार

Submitted by निशिकांत on 3 June, 2013 - 09:14

शिवार माझा खूप तापला
वाट ढगांची बघतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

असेच झाले गतवर्षीही
वांझोटे नभ आले गेले
वाया गेले बी-बियाणही
डोक्यावरती कर्ज वाढले
बघून मालक फासावरती
शिवार माझा रडतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

आभ्यासुन शेती शास्त्राला
पदवीधर का करी चाकरी?
शेत कसाया लाज वाटते
हवाय बर्गर नको भाकरी
शिक्षण पध्दत अशी कशी ही?
शिवार माझा पुसतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

एकच मार्गी वाट कशी ही
खेड्यामधुनी शहरी जाते?
परत यावया कुणी न राजी
भूमातेशी तुटते नाते
खिन्न अंतरी शिवार झाला
एकटाच भळभळतो आहे

आता मला जगणं जरा जमेलंसं वाटतंय...

Submitted by मुग्धमानसी on 3 June, 2013 - 01:34

भुलथापांना माझ्या
मन फसेलंसं वाटतंय
आता मला जगणं
जरा जमेलंसं वाटतंय...

थेंबभर पाऊस, मुठभर वारा
चोचभर थोडा चिमणचारा
आभाळभर माझी तहान
आता भागेलंसं वाटतंय...

एक रस्ता अनवाणी
पाऊलभर हिरवळ गार
सोबत माझी मलाच
आता लाभेलंसं वाटतंय...

उन उन भातासारखं
उन्ह दाटल्या वरणासारखं
लिंबू पिळून आयुष्य
मला चघळेलंसं वाटतंय...

जाता जाता एक कर
पेटते दिवे हातात धर
तुझ्यामागे रेंगाळत रस्ता
वाट चुकेलंसं वाटतंय...

शब्दखुणा: 

एका कवितेला लागली चाल

Submitted by कविन on 3 June, 2013 - 01:08

एका कवितेचा
वेगळाच नूर
वाचता वाचता
उमटले सूर

सुरांनी त्या
धरला ताल
कवितेला
लागली चाल

चालीत म्हणता
झाली पाठ
वर्गात आपली
कॉलर ताठ

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन