काव्यलेखन

विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 December, 2012 - 09:58

गझल
विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!
प्रत्येकाची धुरा वाहती समर्थ स्वामी!!

दु:खांमध्ये श्रद्धेची होतेच परीक्षा....
नभ फाटू दे, तेही शिवती समर्थ स्वामी!

राखेमधुनी सुद्धा गावे उभी राहती!
तुटलेले संसार वसवती समर्थ स्वामी!

हवा भाव अन् हवी सबूरी भक्तापाशी;
माळरानही पहा फुलवती समर्थ स्वामी!

उगा कशाला धावावे मागुनी सुखाच्या?
अरे, सुखाचे मळे पिकवती समर्थ स्वामी!

दूर तुझ्यापासून कुठे गेलेत कधी ते!
श्वासाश्वासामधे धडकती समर्थ स्वामी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.

चुकून दोनदा प्रकाशित

Submitted by बेफ़िकीर on 19 December, 2012 - 01:58

चुकून दोनदा प्रकाशित झालेले लेखन आहे. क्षमस्व!

http://www.maayboli.com/node/39728 येथे मूळ कविता आहे.

काही प्रश्नांचे उत्तर मी शोधत नाही आताशा

Submitted by बेफ़िकीर on 19 December, 2012 - 01:57

काही प्रश्नांचे उत्तर मी शोधत नाही आताशा
कुठूनही तू दूर कसा दिसतोस कळेना आकाशा

हारवलेल्या रस्त्यावरती सापडते पडकी टपरी
कभिन्न काळा इसम जगाला चहा पाजतो अन् जगतो
खिन्न किळसवाण्या वस्तूंवर छाप लक्झरीची छपरी
कासावीस बनत दर्पाने चहा मागुनी मी बसतो

आदळतो कप...

आदळतो कप दुर्दैवाच्या थाटाने अस्तित्वावर
इसम थुंकुनी बाजूला, "द्या चार रुपै सुट्टे" म्हणतो
टेबलवरची घाण पाहुनी मीही चिडतो इसमावर
भवतालाला शिव्या मोजुनी इसम जरा टेबल पुसतो

चहा भुरकुनी घाणतवाना होत निरखतो आकाशा
काही प्रश्नांचे उत्तर मी शोधत नाही आताशा

घाण स्वतःची विकणार्‍यांचे लेबल स्वच्छ कसे होते

नकोसे वाटते

Submitted by रसप on 18 December, 2012 - 23:37

स्वत:ला शोधणे नकोसे वाटते
निराशा दाटणे नकोसे वाटते

सरे ना वाट ही किती चालायचे ?
विसावा पाहणे नकोसे वाटते

उधारी दे जरा सुखाची जीवना
भिकेचे भोगणे नकोसे वाटते

नव्याने हारणे मला चालेल पण,
सततचे झुंजणे नकोसे वाटते

खरा ये वा मला 'नसे मी' सांग तू
तुझे आभासणे नकोसे वाटते

जराशी रात्र दे जरासा चंद्र दे
उन्हाने पोळणे नकोसे वाटते

उद्याशी आजचा निरंतर हा लढा
कुणीही हारणे नकोसे वाटते

तुझ्या हातातले बनावे खेळणे
स्वत:शी खेळणे नकोसे वाटते

तुझा होईल रे 'जितू'ही ईश्वरा
तुझे बोलावणे नकोसे वाटते

....रसप....
१८ डिसेंबर २०१२

इथे ओशाळला म्हणे मृत्यू कधी

व्यसनी

Submitted by सत्यजित on 18 December, 2012 - 22:36

अजुनही आपसूक वळते
नजर त्या खिडकी पाशी
फरक इतकाच की
आता प्रश्न पडतात
तेंव्हा वादळं उठायची

आता नकोशी उत्तरं असलेले
नको ते प्रश्न
तेंव्हा हवीहवीशी असणारी
नको ती वादळं...

तशी खिडकी सामान्यच
पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती
पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता
नाधोंच्या कवितांतला पाऊस होता
बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता
ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती
त्या पलिकडे जाऊन
शब्दां शिवाय मनात रेंगाळत
रहाणारी 'एक' कविता होती

काही गोष्टी सवयीने
किती सवयीच्या होतात
तर काही गोष्टी
सवयी लावून जातात

मी इतकी वर्ष बघतो आहे
त्या खिडकी कडे
पण कधीच थांबलो नाही

काल चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला डुलण्याचा!

Submitted by चैत रे चैत on 18 December, 2012 - 15:26

प्रोफेसरांच्या एका सुंदर गझलेतील अमृत आम्ही चाखले आणि आमच्या मनात आले की आपणही एखादी गझल करून पाहावी. पण दुर्दैवाने आम्हाला चढलेली धुंदी उतरलीच नाही. त्याच धुंदीत लिहिलेल्या काही लडबडत्या ओळी आहेत ह्या.

काल चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला डुलण्याचा!
घोट घोट मी सारी प्यालो, स्वाद समजला चकण्याचा!!

सोबत करण्या तुला नेमका हवाच होता कुणी तरी;
सोस हिला ही रुसण्याचा अन् सोस तुला ही 'बसण्याचा'!!

द्रव्य मिळाले खोऱ्याने; पण...हाय, काल मी गमावले!
किंगफिशरच्या प्याल्यामध्ये शाप मिळाला हरण्याचा!!

शब्दखुणा: 

तू

Submitted by vasant_20 on 18 December, 2012 - 13:25

एकटी पावलं जेंव्हा स्टेशनकडे निघतात
तेंव्हा पावलागणीक तुझी आठवण येते..!

तिघांच्या सीटवर चौथ कुणीतरी बसत
तेंव्हा खरच तुझी आठवण येत ..!

भर पावसात वारा अंगाला झोंबतो
तेंव्हा प्रत्येक शहा‌र्‌यात तुझी आठवण येते...

नाही तू बेवफा, नाही मी बेवफा पण ,
पेट्रोलचे रेट बघितले की तुझी आठवण येते..

.
.
.
.
माझी बाईक...

काय तो वदणार मजला पाठ आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 18 December, 2012 - 11:35

गझल
काय तो वदणार मजला पाठ आहे!
बिनकण्याचा तो....तरीही ताठ आहे!!

मी असा दिसतो, नको जाऊस त्यावर........
जाण तू पडली कुणाशी गाठ आहे!

बोलणे अगदी मऊ, लोण्याप्रमाणे!
मात्र करताना कृती तो राठ आहे!!

ही न ओहोटी नवी, नवखी न भरती......
तू मना सागर! तुझा मी काठ आहे!

केवढा हा गर्व बुद्धीचा म्हणावा!
हा म्हणे मतिमंद....तो तर माठ आहे!!

दांडगाई, माज, मस्ती केवढी ही....
पोलिसी वेषातला तो लाठ आहे!

काय रेड्याचा तरी उपयोग येथे?
म्हैसही प्रत्येक इथली वाठ आहे!

चाखल्यावरतीच फळ, समजेल गोडी!
मी हपूसाचीच अस्सल बाठ आहे!!

काम, नुसते काम, तेही बेहिशोबी....

हल्ली सुचायला लागलंय उगाचं असं लिहिणं

Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 18 December, 2012 - 04:48

हल्ली वाढायला लागलं आहे तुझं डेस्क वर येणं
तुझ्याशी बोलताना माझं तिच्याकडे पाहणं
तू आल्यावर तिचं निघून जाणं
आणि तिच्या जाण्यावर एखादा विनोद होणं ।। १ ।।

हल्ली बरं वाटतंय मित्रांसोबत राहणं
एखाद्या गोष्टीवर comment देणं
आपल्या comment ला दाद येणं
अधून मधून एखादा चेहरा पाहणं ।। २ ।।

हल्ली कमी झालं आहे शांत शांत राहणं
आपल्याच प्रवाहात भान हरवणं
एकटच कुठेतरी फिरायला जाणं
आणि फावल्या वेळेत टी व्ही पाहणं ।। ३ ।।

हल्ली सुचायला लागलंय उगाचं असं लिहिणं
लिहून झाल्यावर सगळ्यांना सांगणं
चहा कॉफी ला सोबत जाणं

ओढणी.. साजणी..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2012 - 23:56

ओढणी.. साजणी..

माथा गळ्यास झाकते
एक ओढणी सजून
काय कवतिक तिचे
घे गं जरा समजून

उन्हा तान्हात साजणी
येते सावली बनून
कोणी नवखा दिसता
घेते अंगही झाकून

सार्‍या अंगा-खांद्यावर
कशी दिसते शोभून
एकटीने जाता येता
धीर देई उमजून

भंवताल दिसे नवा
जेव्हा ओढणी आडून
निरख तू वास्तवाला
नको जाऊस भुलून

किती जणी सख्या तुझ्या
देती ओढणी फेकून
क्षणिकाच्या सुखाला त्या
गेल्या भुलून फसून

ओढ लागते जीवाला
निसर्गाचे सारे देणे
घेई पारखून नीट
दान पदरात घेणे

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन