काव्यलेखन

तुला सांगायचे आहे........

Submitted by आनंद पेंढारकर on 10 June, 2013 - 07:12

उरीचे श्वास दरवळले, तुला सांगायचे आहे
तुला नाहीच जे कळले, तुला सांगायचे आहे

तुझ्या डोळयांमध्ये जेव्हा उगा डोकावले वेडे
कसे आभाळ सावळले, तुला सांगायचे आहे

इथे लाटेतुनी जेव्हा, तुझी चाहूल आलेली
मनाचे तीर नीतळले, तुला सांगायचे आहे

मुके मन ओंजळीमध्ये किती झाकून ठेवावे
कधी हातून ओघळले, तुला सांगायचे आहे

तुझा होकार येताना, जिथे नजरेतुनी झुकल्या
नभीचे चंद्र साकळले, तुला सांगायचे आहे

किती हे आवरावे तू, स्वत:ला दूर जाताना
तरी पाऊल अडखळले , तुला सांगायचे आहे

आनंद पेंढारकर

अंधाराशी लढता लढता

Submitted by निशिकांत on 10 June, 2013 - 04:34

कळोखाचा विजय जाहला
घडूनये ते घडता घडता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

किती अमीषे आली गेली
मोह कधी ना मनास शिवला
ओली सूखी जशी मिळाली
त्यात सुखाचा शोध घेतला
सर्व सुमंगल शुचित्व दिसते
वळून मागे बघता बघता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

देवपुजा मी कधी न केली
जरी अंतरी देव मानतो
मंदिरात मूर्ती अन् ईश्वर
कष्टाच्या घामात पाहतो
व्यस्त केवढा ! पोटाची मी
रोज चाकरी करता करता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

निसर्ग, धरती, हिरवळ माझी
आकाशाचा मला चांदवा
झोपडीत मी जरी राहतो
मला कशाची नसे वानवा
वेदनेतही आनंदाशी
नाळ जोडली जगता जगता

पाउस..

Submitted by छोटी on 10 June, 2013 - 04:03

कालच तू विचारलं, मला पाऊस का आवडतो ,
मला पाऊस आवडतो कारण मला रंग आवडतात
तो झाडाचा पाऊस पडायच्या आधीचा हिरवा रंग ,
नंतरच तो हिरवागार आणि तो पोपटी रंग पाऊस ओसल्यानंतर .
एकाच रंगाच्या इतक्या छटा पाऊसात दिसतात.
म्हणूनच मला पाऊस खूप आवडतो.

कालच तू विचारलं, मला पाऊस का आवडतो
मला पाऊस आवडतो कारण मला प्रेम करायला आवडत.
पाऊस तर प्रेम करतो अगदी निस्वार्थी प्रेम,
स्वताला: झोकून देऊन वाहत जात ...
स्वत: आनंद होत,दुसर्याला आनंदी करायचं,
म्हणूनच मला पाऊसही आवडतो आणि तू आणि तुझ्या प्रेमाचे रंग हि ....

हसून पाहिलेस तू ....

Submitted by वैवकु on 10 June, 2013 - 02:07

हसून पाहिलेस तू म्हणून संभ्रमात मी
असेनका खराखुरा जसा तुझ्या मनात मी

जुनाट होन हा विकून टाक संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात मी

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी

नसूनही ..तुला हवे असेल तर तसे समज
कसा असेन कवडसा ...नसेन जर उन्हात मी

तरून जायचे असेल तर बुडून जायचे
खरा प्रकार शोधला तुझ्यात पोहण्यात मी

अजून एव्हढ्यात मी तुला कुठे मिळायला
अजून चाल वैभवा तुझ्यात खूप आत मी

कधी तरी स्वतः विना जगास पाह विठ्ठला
तुझ्यासवेच नांदतो ...इथे चराचरात "मी" !!

___________________________________________________

लडाख

Submitted by रसप on 10 June, 2013 - 01:29

पर्वतरांगा
तुझ्याच सार्‍या
तुझी पठारे
तुझ्याच सरिता
वाळवंटही
तूच पसरल्या
शिखरांपासुन
पायथ्यांपुढे
शुभ्र हिमाच्या
अनंत शाली
धरणी भिडते
आकाशाला
असा अनोखा
संगमसुद्धा
तूच घडवला

वैविध्याचे
आश्चर्यांचे
अथांगतेचे
अनंततेचे
असे प्रदर्शन
कधी न दिसले
परंतु येथे
विशालतेच्या
परिसीमेला
मानवतेची
चाहुल नाही
असे भयंकर
रूप तुझे तर
कसे असावे
दानवतेचे
भीषण दर्शन ?

जेव्हा येतो
तुझ्या रूपाने
समोर मृत्यू
तुझ्याच निश्चल
शांतपणाने,
कशी तुझी ही
भीती झटकुन
पुन्हा एकदा
मनात माझ्या
विशुद्ध श्रद्धा
भरून यावी
आणि जुळावे
कर हे दोन्ही

शब्दखुणा: 

एक वेडा निशिगंध

Submitted by पुरंदरे शशांक on 9 June, 2013 - 19:37

एक वेडा निशिगंध

तुझ्या मनी फुललेला
एक वेडा निशिगंध
सार्‍या ऋतूत आगळा
सुवासतो धुंद फुंद

थेंब घेई पाकळ्यात
एक एक साठवून
कण कण ओलाव्याचे
येती मग उमाळून

शिशिराची थंडी त्यास
कधी बाधू ना शकते
नित्यनवी हिरवाई
पानापानात दिसते

ग्रीष्मातही हासतसे
शिर उंच उभवून
करीतसे मंद मंद
सुवासाची पखरण

असा निशिगंध नित्य
जावो बहरत सखी
यावा मनी फुलुनिया
जेव्हा जेव्हा मी निरखी
---------------

पावसाची सर.....

Submitted by Sangeeta Kulkarni on 9 June, 2013 - 13:45

पावसाची सर.....

हळूवार पावसाची सर
अलगद येऊन जावी...

एक सुंदरशी संध्याकाळ
हळूच खुलून यावी...

अलगद पडणा-या गारांचा
एक प्रवास सहवासाचा...

न बोलता बरंच काही सांगणारा
स्पर्श न करता मनाला भिडणारा...

मनाला उभारी देणारा
शून्यातून नवे जग साकारणारा...

शब्दखुणा: 

पावसाची देशी कविता (अमेरिकन चष्म्यातून)

Submitted by उद्दाम हसेन on 9 June, 2013 - 12:40

साल : ३०१३. जून ०७
स्थळ : पुंबई ईस्ट, प्राचीन विद्या संशोधन केंद्र
२०१३ सालच्या आंतरजालाचा शोध लागल्यानंतर मराठी आणि तत्सम भाषा डिकोड झाल्याने पाऊस असा सर्च दिल्यावर सापडलेली एक कविता. ब-याच कविता सापडल्या. त्यावरून पाऊस आल्यानंतर आनंदी होणा-यास कवी म्हणत असावेत असा निष्कर्ष निघालेला आहे. या निष्कर्षाला छेद देणारी कविता सापडल्याने संशोधक बुचकळ्यात पडलेले आहेत. सदर कवीने हा माझा पहिला प्रयत्न आहे असं नमूद केल्याने गोंधळ आणखी वाढला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
दि. ९ जून २०१३, अमेरिका

सल

Submitted by सचिनकिनरे on 9 June, 2013 - 04:41

सल...

सल मनी ही,
खुपुनी राहे.
उत्तर नाही,
प्रश्नची सारे....

सहज सोपे,
काही नाही,
दोन मनातील,
दूर किनारे...

कशास त्रागा,
का झुरशी तू,
हिशेब तुला का,
नवीन सारे....

ऋण चुकेना,
मुक्त व्हायचे,
दश दिशांना,
तुझे पहारे....

शब्दखुणा: 

रुसुबाई

Submitted by सई गs सई on 8 June, 2013 - 11:42

आलीस का रुसु बाई रुसु?
किती गं रडलीस मुसुमुसु
आण बरं जरा गालात हसु

बघ मी आणलंय तिरामिसु
खा कि गं आता नको आसु
लई ग्वाड हाय हे तिरामिसु

चल आता मस्त खेळत बसु
चुरुचुरु चराचरा बोलत बसु
नि बाहुल्यांच्या खेळात फसु

बघुन आम्हाला असं वेडंपिसु
दोन चोंबड्या करी खुसु-फुसु
आवरत नाही बाई आता हसु

- सई

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन