काव्यलेखन

ज्ञान | यशाचे उगमस्थान ||

Submitted by विनायक. दि.पत्की. on 9 February, 2013 - 03:21

ज्ञान असते पाण्याहून पातळ,
नसे याहून अन्य कोणी नितळ.
प्रसंगी येवो कसलीही वावटळ,
बोथट होणे ज्ञानापुढे मात्र अटळ.||१||
धीर गंभीरता हि साधते ज्ञानाने,
निरव शांतता हि अनुभवावी मनाने.
हेच जमवावे कणाकणाने,
चराचरात असलेले घ्यावे अनुभवाने.||२||
यश असाध्य नसते,
शान सुद्धा जोडीला असते.
चेतन्य शरीरी वसते,
उरी समाधान हि ठसते.||३||
गरम दुध फुंकून पिणे,
मनाने आवडीची साखर घालणे.
स्थान परत्वे स्वताला बदलणे,
नव्या,नित्य,यशाची हीच आहेत साधने.||४||
(प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर वाचावे )

नक्की

Submitted by योगितापाटील on 9 February, 2013 - 02:14

नशिबा तुझ्यापुढे मी ना वाकणार नक्की
दे वार तू कितीही मी झेलणार नक्की

लढण्यात आपुल्या ज्या हरलेच कैकवेळा
पचवून शल्य सारे मी जिंकणार नक्की

वाटेवरी तमाच्या मी चंद्र पेरलेला
स्वप्ने उद्या सुखाची पण उमलणार नक्की

आयुष्य वाळवंटी मृगजळ खुणावणारे
हुलकावणी तुझी ही पण संपणार नक्की

मम सागरात आता वादळ उधाणलेले
नौका तरी किनारी पोहोचणार नक्की

ग्रीष्मातल्या उन्हाने भेगाळली भुईही
आशा वळीव होऊनी बघ बरसणार नक्की

-योगिता पाटील

हे असे घडणार नक्की!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 February, 2013 - 14:51

गझल
हे असे घडणार नक्की!
मी पुन्हा फसणार नक्की!!

आवरू दे बाडबिस्तर....
मी उद्या नसणार नक्की!

शेवटी काटे, अरे, ते....
एकदा रुतणार नक्की!

वाट ही काट्याकुट्यांची.....
पार मी करणार नक्की!

मी तुझ्या झालो हवाली!
काळजी मिटणार नक्की!!

घोकले तेही विसरलो....
आज ती रुसणार नक्की!

फाटले आभाळ इतके;
दगडही द्रवणार नक्की!

शेपटीवर पाय पडला....
तो मला डसणार नक्की!

प्राक्तना! मी शब्द देतो....
जिंदगी जगणार नक्की!

शीड आहे फाटलेले!
नाव भरकटणार नक्की!!

कोण सांभाळेल तुजला?
मद्य हे चढणार नक्की!

ओत तू पाणी कितीही,
वीष ते भिनणार नक्की!

प्रेम म्हणजे...

Submitted by Sangeeta Kulkarni on 8 February, 2013 - 14:03

प्रेम म्हणजे...

प्रेमाचा साक्षात्कार काव्य
रुपाने पडतो बाहेर...

ह्रदयाची तार
सुरेलपणे झंकारते
प्रेमाचे क्षण म्हणजे
आयुष्यातील घडी असते...

तिचा पुसटसा स्पर्श, आभास
जीवनाची दिशाच बदलून टाकते
काहीतरी करण्याची,काहीतरी बनण्यासाठी
प्रेरणादायक ठरते...

काहीतरी हरवलेले
कधीतरी गवसते
अंधकारमय जीवनात
प्रकाशाची ज्योत पेटवते...

शब्दखुणा: 

राज्य एखादे बळीचे

Submitted by सुशांत खुरसाले on 8 February, 2013 - 12:14

खेळणे नव्हते कधी ,आकाश माझ्या ओंजळीचे
तारकांचे दीप जेथे , भक्त होते काजळीचे

जा जरा छेडून माझ्या ,अंतराला तू नव्याने
स्पर्शुनी गेलीस तू की ,फूल होते बाभळीचे !

का कधी तोडीन राणी, पाश प्रीतीचे तुझ्या मी
हाय ते तर बंध होते ,मखमलीच्या साखळीचे !

संकटांच्या दंशमाला, दैव आणी फाटकेसे
नाचुनी त्यांच्या उरावर, श्वास घेतो मोकळीचे !

लोकशाहीचीच स्वप्ने ,पाहती का देश सारे?
का कुणी आणीत नाही ,राज्य एखादे बळीचे..?

मिसेस उर्फ पत्नी उर्फ बायको उर्फ सौ.

Submitted by विनायक. दि.पत्की. on 8 February, 2013 - 10:08

हात खन्डा ज्यान्चा करण्यात कामाचे पिसेस,
माझ्या मुळेच तुमचे बरे हे ज्यांचे विशेष .
नेहमीच ज्याना द्याव्या लागतात बेस्ट विशेस,
त्यानाच म्हणतात मिसेस.

ज्याच्या अभावी भासत असतेच सर्वशुन्य,
म्हणुन करावेच लागते त्याचे वर्चस्व मान्य.
घराची प्रगतीच त्यांच्या घ्यांनी व मनी
त्यांनाच म्हणतात पत्नी

माहेरचा वसा ,चालवतात सासरचा वारसा
त्यात कुठे ही न अडे प्रगतीचे पाउल पडे पुढे
ऋणकोला ही ज्या करतात धनको
त्यांनाच म्हणतात बायको

मन म्हणजे..

Submitted by के अंजली on 8 February, 2013 - 09:24

मन म्हणजे तळ्यामधलं
निवळशंख पाणी
मन म्हणजे झुरमुरणारी
ढगांमधली गाणी..

मन म्हणजे वसंतातली
अस्फुट रम्य पहाट
मन म्हणजे ओलेशार
दवांमधली वाट..

मन म्हणजे वेणूमधली
मंजूळ हलकी साद
मन म्हणजे पागोळ्यांचा
टीपटीप ओला नाद..

मन म्हणजे डोळ्यामधली
उत्कट वेडी प्रीत
मन म्हणजे गुणगुणणारे
अक्षय जीवन गीत..

डासा चाव रे, ढेकणा चाव रे

Submitted by राजे विडंबनश्री on 8 February, 2013 - 08:07

डासा चाव रे, ढेकणा चाव रे
तुझ्या चावण्याचे किती गुण गाऊ रे
पण, अलगद आम्हाला चाव रे

मला निद्रेची धुंदी असू दे
जाग न येता डंख तुझा डसू दे

माझा घोरण्यात सुस्तावला गाव रे
रक्त शोषून मार तू ताव रे

- राजे विडंबनश्री

शब्दखुणा: 

तेज कोठे हरवले?

Submitted by निशिकांत on 8 February, 2013 - 04:59

का दिसे अंधार सारा, तेज कोठे हरवले?
काळजाला काळजीने खूप आहे ग्रासले

वेध ग्रहणी लागण्या आधीच का अंधारले?
राहुकेतूंचा दरारा सर्व जग धास्तावले

बेगडी अश्वासनावर लोक सारे भाळले
का दिले निवडून त्यांना? आम जन पस्तावले

पेटुनी उठणे अताशा ना दिसे रस्त्यावरी
रोजचे अन्याय बघुनी लोकही निर्ढावले

वेग आता शब्द झाला परवलीचा जीवनी
कासवाची अन् सशाची गोष्ट सारे विसरले

फेसबुकवर रोज माझा टाकते फोटो नवा
"मस्त, सुंदर" वाचुनी प्रतिसाद वाटे चांगले

कायद्याला तोडणारे कायदे करती इथे
का गुन्हेगारास आम्ही संसदेवर धाडले?

का अचानक भळभळाया लागल्या जखमा जुन्या?
लागता डोळा जरासा कोण ते डोकावले?

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन