काव्यलेखन

पद्मभूषण मंगेश पाडगावकर

Submitted by चाऊ on 27 January, 2013 - 02:46

आमच्या सारखंच कुणाला कुठेतरी खुपतं
गोड काही पाहून त्यांचंही मन सुखावत
होय म्हणत आयुष्याला सामोरं जाताना
दु:खही लाजुन मोहरीचा दाणा होतं

तुम्हीच शिकवलं मनसोक्त जगायला
न दिसलं करत पोक्त जगाला वगळायला
प्रत्येक वेळी अगदी फाईव्ह स्टारच नको काही
काय मजा आहे पावसात कांदाभजी चाखायला

जेवलं पोटभर तर ढेकर देत दाद द्यावी
आवडलं कुणी तर डोळ्यांनी साद द्यावी
सुचलं झकास काही तर घ्यावी सुरेल तान
नाही तर हरकत नाही तण्णावून घोरायला

हे सगळं तुमच्यासारख आम्हालाही वाटतं
कुणाला तरी सांगावं, नीट मांडावं वाटत
तुमच्या कविता मग आपल्याश्या वाटतात
सहजच लागतो मग आम्ही मनापासून गुणगुणायला

तुझी स्पंदने आज लपवू नको...

Submitted by अ. अ. जोशी on 27 January, 2013 - 02:26

मुखी ओढणी फार ओढू नको
तुझी स्पंदने आज लपवू नको

तुझी स्वप्न पडतात जागेपणी
मला एवढे वेड लावू नको

मनाशी तुझ्या खेळलो फार मी
अता तू पुन्हा तेच खेळू नको

तुला सांगण्याचे किती ठरविले
तरी प्रश्न, सांगू कि सांगू नको ?

तुला वाटते काय माझ्याविना ?
मनातील सोडून ऐकू नको

जगाशी तुझे काय नाते असे...
असू दे, मला फार पटवू नको

किती चांगले चालते आपले..
जुने पान मध्येच चाळू नको

शिकविण्या धडा वासनेला 'बले'
कुणाचीच तू वाट पाहू नको

असे ठाण मांडून हृदयात तो
मनी मान ईश्वर कि मानू नको

शब्दखुणा: 

आनंदसागर

Submitted by श्रिया महेन on 27 January, 2013 - 00:41

आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे. तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात".आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य, आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

आनंदसागर

सुरूवात ही तुझ्याकडून,
शेवट ही तुझ्याकडेच.
पण मधला प्रवासच भरकटलेला,
अशाश्वतात गुरफटलेला.

ह्या भरकटलेल्या वाटेवरती
पुन्हा गवसतो तोच गांव
विस्मरून ते पावन तत्व
अन् मीही मांडते तोच डाव.

खुणा, तुझ्या नि माझ्या साम्यत्वाच्या
इथे मिटवीते माया
ममतेचे कच्चे बंध
इथे निर्मिते काया

नसे अशक्य जरी मिळविणे

पुरुषार्थ -

Submitted by विदेश on 26 January, 2013 - 07:10

किती जणांचा धावा केला
कुणी न तेव्हां धावत आला

किती दमले मी टाहो फोडुन
रडले कुढत अपुल्याच मनातुन

जपण्याचा मी प्रयत्न केला
शीलाच्या माझ्या ठेव्याला

दुर्दैवाचा घाला पडला
नशिबी दुर्योधन धडपडला

जगास फुटला नाही पान्हा
धावत नाही आला कान्हा

सुन्न-खिन्न टाकून मी मान
पुरुषार्थाचा बघत अपमान !

. . .

शब्दखुणा: 

नि:शब्द .... मी !

Submitted by विदेश on 26 January, 2013 - 07:08

तुला भेटल्यावर मी

एकही शब्द बोललो नाही !

अगदी स्वाभाविक आहे

तुझा नंतरचा रुसवा फुगवा ;

सांगू का खरेच सखे ,

तुला पाहताक्षणीच -

नुसतेच पहावेसे

वाटत राहिले...

शब्दांनाही !

.

शब्दखुणा: 

आता उरली फक्त आठवण ..

Submitted by विदेश on 26 January, 2013 - 07:03

बहरलेला वृक्ष होतो ,
एकदा मी छानसा -
गळुन गेली फूल पाने..
एकटा मी हा असा !

नाचती पक्षी कसे
बघुनिया खांद्यावरी..
खेळताना, होइ मजला
हर्ष माझ्या अंतरी -

शब्दखुणा: 

"चला गुर्जी, झंडा फडकून घेऊ!"

Submitted by -शाम on 26 January, 2013 - 05:35

कुणीतरी हकललेली
आलीच परत
काठी टेकवत
चिंध्या सावरत ...

मुक्तीच्या जल्लोषात
नाचली असेल बाहुली घेवून
इतकं असावं वय
तेंव्हा नसेल जाण कुट्ट भविष्याची
आणि आता नसेल ती सय

जेंव्हा हातात घेतला
थरथरणारा हात
"खाऊ मिळलं ना मला?"
पुटपुटली कानात

तिच्या प्रश्नाने उठलेलं वादळ
माझ्या पापणीबाहेर येण्याआधी
घामाचा डंख नसलेली
ओरडली शुभ्रखादी......

"चला गुर्जी, झंडा फडकून घेऊ!"

................................................शाम

चेहरा भलताच माझा बोलका!

Submitted by सतीश देवपूरकर on 26 January, 2013 - 04:36

गझल
चेहरा भलताच माझा बोलका!
त्यामुळे ठेचाळतो मी नेमका!!

कान भिंतींना असे लावू नका....
यायाचा ऐकू न माझा हुंदका!

मीच माझी साथ जेव्हा सोडली.....
त्याच वेळी जाहलो मी पोरका!

हे असे कुठवर, किती शिवणार तू?
मी असा हा जागजागी फाटका!

ते मला धरुनीच होते या मुळे....
वाटलो त्यांना जणू मी ओंडका!

वेदना जळण्यातली कळते चिते!
पोळलो मीही न थोडा थोडका!!

ते खडा समजून मजला फेकती....
मी हिरा साक्षात होतो वेचका!

याचसाठी मी नकोसा जाहलो....
मीच त्यांच्यातील होतो नेटका!

व्हायला सावध इश-यांनी मुक्या;
मी तुझ्या इतका कुठे रे बेरका?

थांग गझलेचा मला लागायला....

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन