काव्यलेखन

बाप....

Submitted by विनार्च on 17 June, 2013 - 01:22

फार पूर्वी नाही अलिकडेच
माझंही एक घर होतं
जिथ रहायला माझा बाप होता
सगळीकडे असतो तसाच
आमच्यातपण जनरेशन गॅप होता
छोटी मोठी भांडण होती
पण डोक्याला कसलाच ताप नव्हता
कारण काही झाल तरी
माझ्यामागे माझा बाप होता
दिवसभर कितीही भांडला तरी
रात्री मायेने डोक्यावर हात फिरवायचा
अगदी गाढ झोपेतही
त्याच्या प्रेमाचा ओलावा जाणवायचा
त्याच्यापेक्षा वेगळ व्हायच होत मला
म्हणून त्याचे सगळे नियम
मी बेदरकारीने मोडत होते
त्याने माझ्यासाठी निवडलेले पर्याय
मी बंड करुन सोडत होते
पण तरीही माझ्या आयुष्यावर
त्याचा वेगळाच एक छाप होता
छोटी मोठी भांडण होती
पण डोक्याला कसलाच ताप नव्हता

शब्दखुणा: 

थेंब थेंब

Submitted by पुरंदरे शशांक on 17 June, 2013 - 00:26

थेंब थेंब

थेंब थेंब अलवार
घेती मातीत आकार
कणसात उमलोनी
मोती झाले दमदार

थेंब थेंब मेघातला
मातीविण तळमळे
नदी नाल्यात वाहता
जलसंजीवन झाले

थेंब थेंब नाजुकसा
पानांवरी झुलतसे
गंध होऊनी फुलात
वार्‍यालाही लावी पिसे

थेंब थेंब डोळ्यातला
मन डोही डुचमळे
वारा सोसाट्याचा येता
पापणीच्या कडा आले....

शब्दखुणा: 

Submitted by आनंद पेंढारकर on 16 June, 2013 - 13:36

रेल्वेच्या गर्दीत
आला समोर तेव्हा
त्याच्या हनुवटीला दाढी
माझ्या कपाळी नाम होता
माझ्या डोळ्यात खुन्नस
तोही तेवढाच बेफाम होता
कानात दोघांच्याही घुमत
धर्माचा पैगाम होता

एक स्फोट सीटखाली
दोन देह छिन्न
त्याच्या तोंडी रहिम
माझ्या मुखी राम होता

एक आकृती झाली प्रकट
तोच त्याचा अल्लाह होता
तोच माझा शाम होता
पण लक्षात येता येता
खेळ झाला तमाम होता

आनंद पेंढारकर

पान टपरीच्या बाजूला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 June, 2013 - 10:18

पान टपरीच्या बाजूला
भिंतीच्या आडोश्याला
नुकतीच मिसरूड फुटली
मुले येती सिगारेट प्यायला
काही चुकल्या चुकल्यागत
काही अगदी बेपर्वा
चुटकी वाजवत राख झाडत
धूर सोडती आडवा तिडवा
जणू जातात एकटेच
जगापासून दूर दूर
सभोवती ओढून घेत
निळा पांढरा तो धूर
कुणी तरी येतो उगाच
कुणी आणला जातो ओढून
तंबाखूच्या उग्र गंधात
स्वत:स देती सारे झोकून
पाहता पाहता कोपऱ्यात
पाकिटांचा होतो किल्ला
मोठ्या टाईपात पाटी असतो
केविलवाणा आरोग्य सल्ला

विक्रांत प्रभाकर

शकुनगंध

Submitted by अज्ञात on 16 June, 2013 - 08:12

त्या ओठातिल शब्द
मदनउत्कट होऊनी झरतात
स्मितहास्याची लकेर स्वरमय
खग चिमणे किलबिलतात

बंद पापणी मन चंचल
पर फुलाफुलात विहरतात
चुंबुनिया मधुपराग सालस
शीळ ओळ आळवतात

कोण कळे ना प्रतिमा केवळ
स्पर्श उणे दरवळतात
शकुनगंधमय वास सदाही
तळहृदयी वावरतात

......................अज्ञात

सवाल सारे....

Submitted by आनंद पेंढारकर on 16 June, 2013 - 04:35

नसेल प्रीती उरात ज्यांच्या खुशाल सारे
कसे जगावे करून कुणाला बहाल सारे ?

तुझेच अस्तित्व होत जाते हरेक उत्तर
तुझ्या अलिकडे तुझ्या पलिकडे सवाल सारे

कितीक खटले मनात माझ्या तुझ्याविरोधी
तुझ्याच बाजूस कां झुकावे निकाल सारे ?

निरभ्र आकाश मेघ नव्हताच सावळाही
तुझे बरसणे मनी झिरपणे कमाल सारे

तुला पहाता झरा झुळझुळे अखंड गात्री
उगाच खांद्यावरी वहाती पखाल सारे

रहा मुलाकातमे हमेशा सिलासिलासा
कही जुबासे निकाल ना जाये खयाल सारे

आनंद पेंढारकर….

जाहले घासून माझे दात आता (हझल)

Submitted by सुशांत खुरसाले on 16 June, 2013 - 00:11

जाहले घासून माझे दात आता
गढुळ पाणी प्यायचे जोशात आता !

रोज होते बोंब की मी सूर्यवंशी..
'ऊठ मेल्या वाजले की सात आता!'

स्नान करण्याचे भले येते जिवावर
आळशी माझ्या मनाची जात आता

दात देवा घासुनी तैयार हो तू..
बुचकळीतो मी तुला तीर्थात आता !

भाव माझा वाढवावा वाटते पण -
गंडतो मी रोजचा स्वस्तात आता !

प्रेम...

Submitted by Vishal Kulkarni 005 on 15 June, 2013 - 13:46

प्रेम...

मोग-याच्या सुगंधी सुवासात
मी हरखून गेले होते...

तुझ्या आठवणीत
मी हरवून गेले होते...

तुला खूप प्रेम द्यायचे होते
प्रेमात तुला जग विसरायला लावायचे होते...

तुझ्या माझ्या निर्व्याज प्रेमावर
कुठलेही बंधन नको होते
कुठलेही बंधन नको होते....

शब्दखुणा: 

पहिला पाऊस......

Submitted by आनंद पेंढारकर on 15 June, 2013 - 13:01

पहिला पाऊस
खिडकीत बसून निरखणाऱ्याना काय म्हणावं ?
पायांना चिखल लागेल म्हणून
मातीच्या सुगंधाला नाकारणाऱ्याना काय म्हणावं ?
पहिल्या पावसाची कविता
स्टडीरूम मध्ये बसून लिहिणाऱ्याना काय म्हणावं ?

पहिल्या पावसाचा प्रत्येक थेंब
रोमारोमात झिरपावा लागतो
पहिल्या पावसाचा गंध
सर्वांगात भिनावा लागतो

मगच फुटतात कोंब गात्रातल्या कवितेला
पालवी मनातल्या शब्दांना
आणि पसरते हिरवळ सर्वांगावर

पहिला पाऊस......

Submitted by आनंद पेंढारकर on 15 June, 2013 - 13:01

पहिला पाऊस
खिडकीत बसून निरखणाऱ्याना काय म्हणावं ?
पायांना चिखल लागेल म्हणून
मातीच्या सुगंधाला नाकारणाऱ्याना काय म्हणावं ?
पहिल्या पावसाची कविता
स्टडीरूम मध्ये बसून लिहिणाऱ्याना काय म्हणावं ?

पहिल्या पावसाचा प्रत्येक थेंब
रोमारोमात झिरपावा लागतो
पहिल्या पावसाचा गंध
सर्वांगात भिनावा लागतो

मगच फुटतात कोंब गात्रातल्या कवितेला
पालवी मनातल्या शब्दांना
आणि पसरते हिरवळ सर्वांगावर

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन