काव्यलेखन

मैत्री

Submitted by Vishal Kulkarni 005 on 13 December, 2012 - 12:55

मैत्री म्ह्णजे....

ना किनारा समुद्राचा
ना क्षितिज आकाशाचे
ना हसू आनंदाचे
ना रडू दु:खाचे
ना तमा कशाची
ना भान जगाचे
स्वत:तच हरवलेली
खोलखोल समुद्रसारखी
मुक्त आकाशात भरारी घेणारी
अविरत अशी जळणारी
जळून पण मागे धूर आणि राख ठेवणारी
आठवणींच्या धूराने डोळ्यात पाणी आणणारी
सोबत असते वर्तमानात
जोडून ठेवते भूत भविष्याला
अस्तित्वातच मनसोक्त रमणारी ....मैत्री

शब्दखुणा: 

ऊन-सावली

Submitted by अमेलिया on 13 December, 2012 - 01:33

ऊन-सावलीच्या खेळामध्ये
एकदा ऊन रुसून बसलं
'साऱ्यांना बरी तूच आवडतेस
माझं कौतूकच नाही कसलं

जो तो मला नको म्हणे
मुरडून नाक मिचकावून डोळे
शुभ्र स्वच्छ अन लख्ख असे मी
तरीही मजला जो तो टाळे

तुला मात्र भलताच भाव
तुला पाहून खुश सगळे
माझ्यापासून दूर होतात
तुझ्या मात्र गळ्यात गळे'

सावली हसली गालात
'कसे कळले नाही तुला?
तू आहेस म्हणून मी आहे
मी नाहीच मी तुझ्याविना

कधी तू कधी मी
हाच तर तुझा-माझा खेळ
एकच आपण दोघे बघ
जन्मांतरीचा आपला मेळ'

आसवांना भाव नाही

Submitted by निशिकांत on 13 December, 2012 - 00:19

गाळलेल्या आसवांना भाव नाही
जाणणारा वेदना हा गाव नाही

तू दिलेले मी विसरलो घाव नाही
लाख जखमा, थांबलेला स्त्राव नाही

मारुती वेशीत आहे रक्षणाला
पण तरी चोरास का मज्जाव नाही ?

लागती पैसे विठूच्या दर्शनाला
राहिला भक्तास पहिला भाव नाही

चोरली माझी गझल ज्या चोरट्याने
ठेवले मक्त्यात माझे नाव नाही

झाकण्याला हार झालेली कधीही
जिंकल्याचा आणला मी आव नाही

बक्षिसासाठीच तंटामुक्त खेडी
भांडणाचा पण तिथे आभाव नाही

शोध घेता माणसांचा, श्वापदे का
भेटती सगळीकडे हे ठाव नाही

वाट काटेरी पुढे "निशिकांत" आहे
पण तुला आता गड्या घुमजाव नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

विमला ठकार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 December, 2012 - 14:05

ज्ञानेश्वरानंतर मी प्रेम केले
ते विमालाजींच्या शब्दावर
हृदयात ते कोरून ठेवले
पुन:पुन्हा मस्तकी धरले
अर्थातच त्यांना ते
कधीच आवडले नसते
हे मला पक्के ठावूक आहे
तेवढे मी त्यांना जाणले आहे.

त्यांचे शब्द धारधार
जातात अगदी खोलवर
चिरत अंतकरण आत
उकलत जन्मांचे संस्कार
अमाप प्रेम, अपार करुणा
ओतप्रोत भरलेली त्यात
वाचता वाचता डोळ्यात
कितीदा आसवे ओघळतात
मेंदूत भूकंप होतात
प्रतिमा तुटून जातात
ती आसवे सुखाची असतात
आणि सुटकेचीही असतात
हरपलेले श्रेय सापडल्यामुळे
झालेल्या आनंदाची असतात .

काहीही अधिकार न गाजवता
मैत्रीचा ,स्नेहाचा स्पर्श न सोडता
आधार देतात प्रत्येकवेळेला

शब्दखुणा: 

तुझिया प्रेमाचा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 December, 2012 - 12:41

तुझिया प्रेमाचा पडो न विसर
ऐसे हे अंतर तद्रूप व्हावे ll १ ll ll
जळो संसाराची व्यर्थ तळमळ
नाभिशी नाळ जुळावी पुन्हा ll२ ll
सार्थक व्हावे शिणल्या कायेचे
खेळ हे मायेचे कळो यावे ll ३ ll
आलो मी जेथून यावे ते कळून
उगमी न्हाऊन व्हावे कृतार्थ lll ll ४ ll
सर्वांगी ओंकार अवघा जागवा
विरून जावा अहं कल्लोळ ll ५ ll

विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

मी ..

Submitted by कमलाकर देसले on 12 December, 2012 - 09:39

मी ...

तुला पाहिले मी ;
तुला पूजिले मी ...

फुलांचे हृदय हे ;
तुला वाहिले मी ..

तुझे गूण सांगू ;
किती गाइले मी ..

पुजेतुन स्वत:ला ;
तुला अर्पिले मी ..

तुझी मेहदी बघ ;
कशी रेखिली मी ..

तुझी कोर भाळी ;
अता कोरिली मी ..

तनाने मनाने ;
तुझी राहिली मी ..

प्रतिक्षेतली बघ ;
किती काहिली मी ..

तुझे सर्व सारे ;
तुला रे दिले मी ..

तुझी जाहल्याने ;
किती साहिले मी ..

- कमलाकर देसले

शब्दखुणा: 

मनाची कविता

Submitted by तुषार जोशी on 12 December, 2012 - 08:24

मी हरलो म्हणू नकोस
यावेळी हरलोय म्हण
पुन्हा जग जिंकण्यासाठी
येतील कितीतरी क्षण

एकटा उरलो म्हणू नकोस
सध्या एकटा आहे म्हण
आयुष्य संपले नाही अजून
भेटतील किती तरी जण

मी थकलो म्हणू नकोस
जरा दम घेतोय म्हण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण

तुषार जोशी, नागपूर
१७ आगस्ट २०१०, ०९:००

शब्दखुणा: 

काव्ययात्रा

Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2012 - 05:52
तारीख/वेळ: 
16 December, 2012 - 07:30 to 09:30
ठिकाण/पत्ता: 
शाहू स्मारक भवन, बहुउद्देशीय सभागृह, कोल्हापूर

http://www.facebook.com/photo.php?fbid=10151202619759472&set=np.12548311...

मी मराठी नेट व रूबरू एन्टरटेनमेन्ट आयोजीत

काव्ययात्रा

कविता, गझल व गीते यांची मैफील:

सहभागी मायबोलीकरः

सुप्रिया जाधव

प्राजक्ता पटवर्धन

बेफिकीर

==============

अगत्याचे आमंत्रण

==============

धन्यवाद!

माहितीचा स्रोत: 
फेसबूक
प्रांत/गाव: 

आत्ता होत ते गेलं कुठ ?

Submitted by prashantsut on 12 December, 2012 - 03:15

आत्ता होत ते गेलं कुठ ?
आताच होता दिवस
मग रात्र कशी झाली ?
पश्चीम दिशेला सुर्यदेव कधी बुडाला
इथं आता उजेड होता
सावल्या कशा आल्या ?
आत्ता होतं ते गेलं कुठं

आत्ता होतं ते गेलं कुठं
गाण होतं तुझं जुन
एक सीडी, एक सीडी प्लेयर
एक स्पीकर एक जुना टीव्ही
त्यातल काही चालत नाही
रिपेर बी होत नाही कुठं
आत्ता होतं ते गेलं कुठं

मी नाही हरलो

Submitted by prashantsut on 12 December, 2012 - 03:05

तुच होतीस ती
ती तुच होतीस
जिने माझ्या भावनाना कचा खाल्ले
माझे ह्रुदय चीन्नविचीन्न* करून टाकले
आणि
माझा आत्मा
तो तर तू मीठाशिवाय तोंडी लावलास
आणि मी ?
मी तळमळत होतो
वेदना भळभळत होतो
तरी तुला म्हणालो
चव बरी आहे का ?
पण माझ्या त्या त्यागाची
समपर्णाचे तुला काय ?
तू प्रेमाची नरभक्षक कैदासीन
मीच वेडा, मूर्ख ठरलो
पण
मी नाही हरलो

जग आता प्रेमावर विश्वास ठेवनार नाही हे लक्षात ठेव.

कवी प्रशांतसुत

कविता प्रकाशनासाठी दिलेली आहे. कॉपी करू नये.

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन