काव्यलेखन

फ़ुलाला पोळण्याआधी उन्हाचा श्वास अडकावा

Submitted by प्राजु on 7 July, 2013 - 05:18

सरींवरती जरा व्हावा उन्हाचा मंद शिडकावा
नव्याने सप्तरंगी ध्वज नभाशी आज फ़डकावा

कधी झालेच नाही जे अता ते होउनी जावे
फ़ुलाला पोळण्याआधी उन्हाचा श्वास अडकावा

किती गोडी गुलाबीने उभा संसार चालू हा
जरा एखाद मुद्दा वाद घालायास हुडकावा

किती कोमट जगायाची मनाला या सवय झाली
निखारा एक क्रांतीचा उराशी आज भडकावा

किती कंटाळवाणी गलबते येती किनार्‍याशी
तडाखा वादळाचा एकदा येऊन थडकावा!

तुला ना पाहिले देवा कधी मी आजतागायत
तरी का ना तुझ्यावरचा अढळ विश्वास तडकावा?

एकांत क्षणांना ..

Submitted by भारती.. on 7 July, 2013 - 00:42

एकांत क्षणांना ..

एकांत क्षणांना | अश्रूंचे तोरण |
दिलेस आंदण | धन्यवाद ||
ऐश्वर्य व्यथांचे | ओसंडले मनी |
समृद्ध स्वामिनी | केले मज ||
होय स्वीकारला | तू दिलेला साज |
सारे वाद आज | मिटवले ||
असो तुजपाशी | आकाशाचा अर्थ |
हृदयीचे आर्त | माझ्याकडे ||

https://www.youtube.com/watch?v=Uyw_rx97af4

.............. क्रॉस कनेक्शन ..............

Submitted by विनायक. दि.पत्की. on 6 July, 2013 - 07:58

कधी कधी आपल्याला दोन वेगवेगळी कामे करावयाची असतात पण गडबडीत नेमके उलट होते याचे त्याला तर त्याचे ह्याला मग त्यातून विनोद निर्माण होतो अशीच एक व्यक्ती हल्ली सोने स्वस्त झाले म्हणून पै पै करून जमवलेला पैसा खर्चून लॉकेट कम मंगळसूत्र नवीन प्रकारचे (हवे तर टू इन वन म्हणा ) बायको साठी खरेदी करतो आणि गडबड अशी होते कि बस....
याला म्हणतात .............. क्रॉस कनेक्शन

बायको विसरली मंगळसुत्र न्हाणीत,
पण शोधीत होती मच्छरदाणीत.
मच्छरदाणीचे मूळ उचकून काढले,
आणी त्या सवे मला खाली हि पाडले.
मच्छर उडाला,झोप मला चावली (मच्छर चावला म्हणून झोप उडाली नव्हे कारण क्रॉस कनेक्शन)

दिंडी मधले |

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 July, 2013 - 07:42

दिंडी मधले | दु:ख सावळे |
पुन्हा दाटले | शब्दामध्ये ||१||
पुन्हा मनाचा | बांध फुटला |
उर भरला | तव प्रेमे ||२||
पुन्हा जीवाला | भूल पडली |
चालू लागली | वाट जुनी ||३||
स्वप्न साजिरे | एक निळूले |
मनी जागले | आज पुन्हा ||४||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

पावसा पावसा...

Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2013 - 04:48

पावसा पावसा...

पावसा पावसा ..... रुसू नको, रुसू नको
कोर्डा कोर्डा ..... जाऊ नको, जाऊ नको

जोरजोरात अस्सा पड ..... अस्सा पड
नदी वाहेल रस्ताभर ...... रस्ता भर

अस्सा भिजव सार्‍यांना .... सार्‍यांना
म्हणतील बास धिंगाणा .... धिंगाणा

मज्जा येते भिजताना ..... भिजताना
गाणी गात नाचताना .... नाचताना

कणीस खाऊ खमंगसे .... खमंगसे
गर्रम भज्जी सामोसे .... सामोसे

शब्दखुणा: 

आय लव्ह यू..

Submitted by के अंजली on 5 July, 2013 - 22:25

सकाळी सकाळी..
छानश्या सुखद शीतल हवेत..
प्रणयोत्सुक रमणीसारखं..

माझ्या अधीर अधरांनी..डोळे मिटून..
तुला दिलेलं एक उष्ण चुंबन.

शरीरभर सळसळत जाणारं अलौकिक चैतन्य..
माझ्या रंध्रारंध्रात भिनत जाणारा...
तुझा मंद दरवळ...

माझ्या बटांशी खेळणारे..
तुझे उष्ण श्वास..

मग रहावतच नाही..

जीभ पोळली तरी बेहत्तर..
तुला एका दमात पिऊन टाकावा
अशी अनावर उर्मी..

सारं जग तुझ्यापुढे तुच्छ !!

पण..चवीचवीनं, बेताबेतानं
तुला घोट घोट पिताना

देहभर भिनत जाणारं
गवती चहा नी आलं..

आहा!!

" मी "

Submitted by राहुल नरवणे. on 5 July, 2013 - 09:46

वर्तमानाला पडलेलं सुखद स्वप्नं
की, भविष्य काळाची काळजी.
जगाला पडलेला प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.

जगण्यातला तोच रटाळपणा
कि, वेगळेपणाचा घाट.
जगताना पडलेले अनेक प्रश्न
कि, उत्तर न शोधता घालवलेलं आयुष्य.

कला, साहित्य, संस्क्रती, अध्यात्माचा पाठपुरावा
कि, वासनेच्या भरात, परकीय संस्क्रतीत वाहत जाणारा भ्रष्ट समाज.

मी प्रतिक कोणाचं
आणि आदर्श कोणासाठी ?

मी पडलेला एक प्रश्न
कि, सहज सोपं उत्तर.

प्रांत/गाव: 

आश्वासित....

Submitted by आनंद पेंढारकर on 5 July, 2013 - 08:38

आजी-आजोबा, आई-बाबा
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे
शोधायचो तुला पूर्वी
प्रत्येक देवळातल्या,
प्रत्येक मूर्तीच्या पायापाशी
डोकं टेकवून….

पण तू भेटलाच नाहीस कधी
मूर्तीतून प्रकट होऊन
बहुतेक तू नसावाच तिथं
तुझा वावर मात्र जाणवत राहिला
भोवतीच्या प्रत्येक माणसाच्या
प्रत्येक कृतीतून ….

आताशा जेव्हा जोडतो हात
तुझ्या मूर्तीसमोर
तेव्हा टिपत असतो
किलकिल्या डोळ्यांनी
तुझ्या हालचाली आजूबाजूला
आणि होतो आश्वासित, निर्धास्त ….

पटलीय आता खात्री माझी
तू आहेसच उभा
अवतीभोवती माझ्या
आणि धरशीलच डोक्यावर
आभाळा एवढी सावली सावली
प्रत्येक रणरणत्या क्षणाला ….

काही अस्पर्श्य भावना...!

Submitted by बागेश्री on 5 July, 2013 - 02:06

धुंदीत जगता जगता,
उरल्यात काही संवेदना,
अजूनही न अनुभवलेल्या... न स्पर्शिलेल्या!
वाटतंय आताशा घ्याव्यात जगून .... त्या
काही अस्पर्श्य भावना...!

असेलच ना नक्की काही-

आनंदाच्या पार पलिकडलं
दु:खाच्याही जरा अलिकडलं,
भितीच्या मग बरंच पुढचं
अन् उदासीच्याही आधीचं काही....?

पान्हा फुटण्या क्षणा भोवतालचं,
मायेच्या ओथंबत्या नजरे नंतरचं
कासावीस जीवाच्या आसपासचं,
बेपर्वा मिनीटांच्या पहिले काही....

असहाय्यतेच्या जरा आधीचं
हतबलतेच्या थोडं जवळचं
रुजणार्‍या आशेच्या सभोती
उणीवांच्या, भवताल काही...

जगताना जे जाणवलंच नाही,
निसटलेलं हे काही बाही,
उरलेल्या ह्या संवेदना,

शब्दखुणा: 

या संपन्न (?) देशात..

Submitted by अनुराधा म्हापणकर on 5 July, 2013 - 01:14

मरतो आहे.. मरतो आहे
या संपन्न (?) देशात
प्रत्येक जण मरतो आहे !!

महागाई नी भ्रष्टाचार
रोगासारखा पसरतो आहे
आजचे स्कॅन्डल आम्ही
उद्याच्याला विसरतो आहे

तो वधारतो डाॅलर,
आपला रुपया घसरतो आहे
पळावे कुठे, तुझ्याही दारी देवा
जपला श्वास सरतो आहे

मरतो आहे.. मरतो आहे
या संपन्न (?) देशात
प्रत्येक जण मरतो आहे !!

अनुराधा म्हापणकर

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन