काव्यलेखन

कानफाटा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 July, 2013 - 13:03

बुजक्या कानाच्या कानफाटा मी
अलख निरंजन ध्वनी मनी
होम धडाडे सोहम अंतरी
अन देहाच्या वीणेमधुनी
तत्वमसीचा नाद झंकारी
पवनच्या या वावटळीतून
मन उसळते देह सोडून
जाते वरवर स्थिर होवून
निजते घेवून शून्य उशाला
त्या निद्रेत मी नसलेल्या
असते केवळ निळे आकाश
भरून उरतो शुभ्र प्रकाश
स्वप्न हि कुणा कळू लागते
जीवनाचा अट्टाहास

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 

अचानक .....

Submitted by Sangeeta Kulkarni on 7 July, 2013 - 12:29

अचानक .....

वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या
झाडासारखी अचानक समोर येते ..

वळवाच्या पावसासारखं
भिजवून टाकते..

जाणवलेला सुगंध जास्त
मनोहारी वाटतो ..

एखादाच प्रसंग खूण
पटवायला पुरेसा असतो..

तिचा.. निव्वळ स्नेह
खडकामागच्या झुळझुळ
झ-यासारखा-- प्रसन्न ताजा...

शब्दखुणा: 

जीवघेणी तुझी....

Submitted by भाग्यश्री ७ on 7 July, 2013 - 11:05

जीवघेणी तुझी, खोड ही साजणा, का न येतोस वेळेवरी?
आस मिटली तरी, श्वास तुटले तरी, वाट पाहीन वेड्यापरी.....

नेत्र मत्स्याकृती, कंठ मैनेपरी, डौल हंसातला घेतला,
कौतुकाची खरी बाब ऐका पुढे, अंतरी ठेवली कस्तुरी...

नेमकी कोण मी? आठवेना मला, सापडेना मला मी पुढे,
लाट उसळून वा, पान ढाळून मी जाहले कावरी बावरी...

रोज कोंडा-कण्या घेउनी रांधते, पंचपक्वान्न विश्वातले,
झोपडीचे करी देवघर, स्त्री असे अन्नपूर्णा घराची खरी....

सांगते मी तुम्हा, मूर्त माझ्या मनी, कोणती आवडीची वसे,
जी विटेवर उभी, हात कमरेवरी, मोर मुकुटामधे साजिरी!!!!

निशेच्या उरी.....

Submitted by भाग्यश्री ७ on 7 July, 2013 - 10:39

निशेच्या उरी चांदण्यांचा उसासा,
क्षितीजावारी सूर्यरूपी खुलासा....

तुला विश्व हे आर्ततेने पुकारी,
मला एकटीला नसे तू हवासा....

कसे रोज आभाळ गाशी पिला तू,
मला छंद दे ना तुझा हा जरासा.....

असे काय करडेच दिसशी नभा तू,
जणू रंग माझा तुला लागलासा....

पऱ्यांच्या, फुलांच्या कथा वाचते मी,
जगाया हवा ना मलाही दिलासा....

~भाग्यश्री कुलकर्णी.

तुझे डोळे

Submitted by डॉ अशोक on 7 July, 2013 - 07:15

तुझे डोळे

लावून खाली नजर, बघतात डोळे तुझे
काम लाख शब्दांचे, करतात डोळे तुझे.
*
लपविले मी मलाही, माहीत मी न मजला
तळ गाठण्या मनाचा, घुसतात डोळे तुझे
*
सुख मी कवेत घेता, थरथरून ओठ गेले
घेऊन उंच झोका, झुलतात डोळे तुझे
*
वादळे आठवांची, गाठती सांजवेळी
मिटूनी पापण्यांना, झुरतात डोळे तुझे
*
असो दे मेनका वा, असू दे अन्य कोणी
आगळी तू वेगळी, खुलतात डोळे तुझे

-अशोक

शब्दखुणा: 

फ़ुलाला पोळण्याआधी उन्हाचा श्वास अडकावा

Submitted by प्राजु on 7 July, 2013 - 05:18

सरींवरती जरा व्हावा उन्हाचा मंद शिडकावा
नव्याने सप्तरंगी ध्वज नभाशी आज फ़डकावा

कधी झालेच नाही जे अता ते होउनी जावे
फ़ुलाला पोळण्याआधी उन्हाचा श्वास अडकावा

किती गोडी गुलाबीने उभा संसार चालू हा
जरा एखाद मुद्दा वाद घालायास हुडकावा

किती कोमट जगायाची मनाला या सवय झाली
निखारा एक क्रांतीचा उराशी आज भडकावा

किती कंटाळवाणी गलबते येती किनार्‍याशी
तडाखा वादळाचा एकदा येऊन थडकावा!

तुला ना पाहिले देवा कधी मी आजतागायत
तरी का ना तुझ्यावरचा अढळ विश्वास तडकावा?

एकांत क्षणांना ..

Submitted by भारती.. on 7 July, 2013 - 00:42

एकांत क्षणांना ..

एकांत क्षणांना | अश्रूंचे तोरण |
दिलेस आंदण | धन्यवाद ||
ऐश्वर्य व्यथांचे | ओसंडले मनी |
समृद्ध स्वामिनी | केले मज ||
होय स्वीकारला | तू दिलेला साज |
सारे वाद आज | मिटवले ||
असो तुजपाशी | आकाशाचा अर्थ |
हृदयीचे आर्त | माझ्याकडे ||

https://www.youtube.com/watch?v=Uyw_rx97af4

.............. क्रॉस कनेक्शन ..............

Submitted by विनायक. दि.पत्की. on 6 July, 2013 - 07:58

कधी कधी आपल्याला दोन वेगवेगळी कामे करावयाची असतात पण गडबडीत नेमके उलट होते याचे त्याला तर त्याचे ह्याला मग त्यातून विनोद निर्माण होतो अशीच एक व्यक्ती हल्ली सोने स्वस्त झाले म्हणून पै पै करून जमवलेला पैसा खर्चून लॉकेट कम मंगळसूत्र नवीन प्रकारचे (हवे तर टू इन वन म्हणा ) बायको साठी खरेदी करतो आणि गडबड अशी होते कि बस....
याला म्हणतात .............. क्रॉस कनेक्शन

बायको विसरली मंगळसुत्र न्हाणीत,
पण शोधीत होती मच्छरदाणीत.
मच्छरदाणीचे मूळ उचकून काढले,
आणी त्या सवे मला खाली हि पाडले.
मच्छर उडाला,झोप मला चावली (मच्छर चावला म्हणून झोप उडाली नव्हे कारण क्रॉस कनेक्शन)

दिंडी मधले |

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 July, 2013 - 07:42

दिंडी मधले | दु:ख सावळे |
पुन्हा दाटले | शब्दामध्ये ||१||
पुन्हा मनाचा | बांध फुटला |
उर भरला | तव प्रेमे ||२||
पुन्हा जीवाला | भूल पडली |
चालू लागली | वाट जुनी ||३||
स्वप्न साजिरे | एक निळूले |
मनी जागले | आज पुन्हा ||४||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

पावसा पावसा...

Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2013 - 04:48

पावसा पावसा...

पावसा पावसा ..... रुसू नको, रुसू नको
कोर्डा कोर्डा ..... जाऊ नको, जाऊ नको

जोरजोरात अस्सा पड ..... अस्सा पड
नदी वाहेल रस्ताभर ...... रस्ता भर

अस्सा भिजव सार्‍यांना .... सार्‍यांना
म्हणतील बास धिंगाणा .... धिंगाणा

मज्जा येते भिजताना ..... भिजताना
गाणी गात नाचताना .... नाचताना

कणीस खाऊ खमंगसे .... खमंगसे
गर्रम भज्जी सामोसे .... सामोसे

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन