काव्यलेखन

श्राद्ध

Submitted by dr.sunil_ahirrao on 9 July, 2013 - 03:39

...आता एक घाव दोन तुकडे केल्यावर,
आपापल्या वाट्याचा रक्तबंबाळ तुकडा
जगापासुन लपवणे आलेच !
सोबत ठिबकणाऱ्या आठवांचा ओला हुंदका
आतल्याआत पोसणे आलेच..
य़ापेक्षा
जपली असतीस नात्याची अडखळती धडधड,
दिले असतेस थोडे श्वास ,
फुंकला असतास थोडा प्राण !
अगदिच वटवृक्ष झाला नसता,
खुरटेच ऱाहिले असते झाड ...तरिही ,ते फक्त तुझे नि माझे !
... आता
य़ा कलेवऱाचे दरक्षणी श्राद्ध करणे आलेच...!
- डॉ. सुनील अहिरराव

मेंदू

Submitted by dr.sunil_ahirrao on 9 July, 2013 - 03:22

विचार असे ...मग़ तसे आणि कसेही..
इथे -तिथे ,घऱात , रस्त्यात , ऑफिसात भुणभूण भुणभूण ;
मेंदू नुसता ठसठसतो !
कायच्या काय अंतर्बाह्य घुसळण.
प्रवास कुठुन कुठे .. कुठेच्या कुठे.
कसलेकसले मेंदूइतके क्लिष्ट संदर्भ:
धुसर, गडद ,काळे, निळे ,हिऱवे ,भगवे;
मिसाईलसारखे धावून येतात अंगावर !
दीर्घ युद्धातली वाताहत झाल्यावर अखेर तू भेटतेस :
विचार तिथेच अडतात, गुंततात ,
विसाव्याला थांबतात ...!
मी शिणलेला मेंदू टेबलवऱ काढुन ठेवतो !
- डॉ. सुनील अहिरराव

पाऊस नसे हा पहिला..

Submitted by रसप on 9 July, 2013 - 02:33

पाऊस नसे हा पहिला पण भिजणे बाकी आहे
मी तिच्या लोचनांमधुनी पाझरणे बाकी आहे

विश्वास कसा ठेवावा तू आसपास असल्याचा
माणूस माणसामधला सापडणे बाकी आहे

मी लिहिल्या अनेक कविता संतोष वाटला नाही
नुकतेच मला कळले की, 'तू' सुचणे बाकी आहे

सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे

माझ्यात राम आहे अन् माझ्यामधेच रावणही
चेहरा तुम्हाला दुसरा दाखवणे बाकी आहे

आईस फसवुनी 'जीतू' मी अनेक पाउस भिजलो
ती ओल मनातुन अजुनी वाळवणे बाकी आहे

शब्दखुणा: 

भोलानाथ !!

Submitted by अनुराधा म्हापणकर on 9 July, 2013 - 02:27

सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

पूर येऊन पाणी वाहून
सारंच बुडेल काय ?

.. ढग फुटून पुन्हा पुन्हा
.. फाटेल काय रे आभाळ
.. देव म्हणोनी मिरवताना
.. करशील का रे सांभाळ

माणसाला शिक्षा म्हणून
विपरीत घडेल काय
सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

.. जाऊदे पण भोलानाथ
.. तुला काय रे माहीत
.. पूरांमधे वाहून गेलं
.. सगळंच तुझ्यासहीत

स्वर्ग सांग आमच्यासाठी
दार तरी उघडेल काय
सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?
सांग सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

सारखा

Submitted by मिल्या on 8 July, 2013 - 14:12

समजायचो मी ज्यास देवासारखा
तोही निघाला थेट... माझ्यासारखा

मंदिर, कचेरी, बार, संसद, चावडी
कलगीतुरा रंगे तमाशासारखा

सैतान का इतका अमानुष वागला?
अंगामधे माणूस शिरल्यासारखा

मित्रा मला थोडे तरी स्वातंत्र्य दे
बिलगू नको आजन्म दु:खासारखा

तलखी मनाची भर दुपारी थांबली
आला अचानक शेर वळिवासारखा

झुळुकेप्रमाणे मी खरे तर जायचो
भेटायचा तो बंद दारासारखा

पाऊस तू आहेस... पाऊसच रहा
वागू नको भगवान असल्यासारखा

शब्दखुणा: 

बाळूचे स्वप्न -

Submitted by विदेश on 8 July, 2013 - 11:45

सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।

शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।

मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।

कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।

उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।

बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नातच बाळू मोजून बेजार !
.

शब्दखुणा: 

असेच काही जगता जगता ......

Submitted by आनंद पेंढारकर on 8 July, 2013 - 11:27

असेच काही जगता जगता
चराचरातून टिपून घ्यावे
खोल मिसळुनी रक्तामध्ये
रोज नव्या रंगात नहावे

असेच काही जगता जगता
श्वास कुणाला आंदण द्यावे
कुणा ओठीच्या स्मितासाठी
स्वतःस थोडे छिलून घ्यावे

असेच काही जगता जगता
उन पावसाशी बोलावे
दु:ख कुणाचे करून आपले
आसवांमध्ये चिंब भिजावे

असेच काही जगता जगता
मनापासूनी लिहून जावे
लिहिता लिहिता भान हरपुनी
स्वतःच वेडी कविता व्हावे

असेच काही जगता जगता
मातीमध्ये कण रुजवावे
कुणास नकळत आभाळाचा
हात धरूनी निघून जावे

आनंद पेंढारकर

मला मान्य नाही.....

Submitted by मी मधुरा on 8 July, 2013 - 09:16

विचारात झुरणे मला मान्य नाही,
तुझे दूर जाणे मला मान्य नाही...

समोरून या घाव घालावयाला,
छुपे वार करणे मला मान्य नाही....

उगा वाद घालू नको तू अताशा,
अशी मात होणे मला मान्य नाही....

किती काळ संवेदना गोठवू मी,
मनी ‘मात्र’ कुढणे मला मान्य नाही....

बना शूर थोडे, भिडा संकटांना,
पराभूत होणे मला मान्य नाही....

~मधुरा.....

अंधाऱ्या संध्याकाळी.

Submitted by राहुल नरवणे. on 8 July, 2013 - 08:06

एक संध्याकाळ, हुरहूर लावणारी,
काहूर माजवणारी.

एक संध्याकाळ, दिव्यातले तेल पळवणारी,
वात विझवणारी.

एक संध्याकाळ, पिलांना जवळ बोलावणारी,
पाखराचे पंख कापणारी.

एक संध्याकाळ, गंभिर, उदास, केविलवाणी, रडवणारी,
विदारक, केविलवाणी हसणारी.

एक संध्याकाळ, तुझं - माझं भांडण लावणारी,
दोघांना कायमचं विलग करणारी.

एक संध्याकाळ, मला अंतर्मुख करणारी, फसवणारी,
विलग होऊन बसणारी.

एक संध्याकाळ, दिसणारी - न दिसणारी,

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

स्थित्यंतर

Submitted by भानुप्रिया on 8 July, 2013 - 06:40

पाउल टाकलंय उंबरठ्याबाहेर,
मन अजून घरातच रेंगाळतंय..
नव्याच्या लखलखटात बावरून,
माजघरातला अंधार शोधतंय..

'माझं' घर आता 'आईचं', 'माझी' माणसं 'माहेर'
संदर्भ बदलतायत भोवतीचे, मी ही बदलतेय बहुतेक
पण खरंच, बदलेन का मी?
स्वतःचे स्वतःशी चाललेले अखंड संवाद..मध्यच अडखळतेय, सावरतेय.
स्वतःचं सामान आवरताना, एकट्यानेच रडतीय.

आनंद की हुरहुर अधिक, सांगता येणं कठीण आहे,
आठवांचे सारे बंध, असं सोडून जाणंही कठीण आहे!

नवं जोडायला जमेल का?
जुनं सोडायला जमेल का?
माहिती नाही..कळेलच लवकर!

बावरलेलं मन, येईल मग माजघर सोडून!

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन