काव्यलेखन

हवा एक पाऊस....................

Submitted by अमोल परब on 10 July, 2013 - 08:54

हवा एक पाऊस

मला गाफिल पाहुन
अवचित बरसणारा...
लटक्या रागावर माझ्या
लडिवाळ हसणारा...

हवा एक पाऊस

ओळखीच्या खुणांवर
उगीचच रेंगाळणारा...
ओल्या वाटांवरल्या
पाउलखुणा जपणारा...

हवा एक पाऊस

बेधुंद उत्कट सरींनी
मला वेढणारा...
घेऊनी मिठीत मजला
अलवार शहारणारा...

हवा एक पाऊस

दूर माळरानात
रातराणीस छेडणारा...
मालवून चांदण्या सार्‍या
रात्र नशावणारा...........

हवा एक पाऊस

फक्त माझ्या अन
माझ्यासाठीस झरणारा
पसरलेल्या आभाळातुन
ओंजळीत विसावणारा.........

सारे धुवून नेले बेभान पावसाने

Submitted by बेफ़िकीर on 10 July, 2013 - 03:50

ही आणखी एक जुनी कविता! १५.०६.२००९ रोजी इतरत्र प्रकाशित केलेली! वाचकांना आवडेल अशी आशा असल्यामुळे घाबरत घाबरत येथे प्रकाशित करत आहे, कृपया सांभाळून घ्यावेत. Happy

==========================

सारे प्रदान केले बेभान पावसाने
सारे धुवून नेले बेभान पावसाने

दुलईत जाग येणे, आई मिठीत घेणे
ते शब्द कौतुकाचे, फिटणार ते न देणे
मग दूध, बिस्किटे अन् तो रेडिओ सिलोनी
ठेका धरीत सारे खरखर वजा करोनी
बाबा मधेच म्हणती आवर पटापटा तू
शाळेत जायचे ना? बसलास का असा तू?
बाहेर पावसाची रिपरीप वाजणारी
हृदयास आळसाने व्यापून टाकणारी
अंधारल्या पहाटे खिडकीमधे उभा मी
'बुडवून टाक शाळा' सुचवायचो नभा मी

रसीले मरण

Submitted by भरत. on 10 July, 2013 - 03:36

माझिया कंठात गझले तू रुळावे
मी तुला गे, फ़क्त तुजला आळवावे

पदरस्पर्श तेवढ्या अश्रूस व्हावा
थेंब जरि, त्या मोल मोत्याचे मिळावे

येथल्या सार्‍या चुली विझल्या कशाने?
भाकरीस्तव हे हवे तर घर जळावे

आठवांनी मी तिच्या कंटाळलेला
आजच्यापुरते तिने मजला स्मरावे

श्वास शेवटचा तुझ्याच कुशीत घ्यावा
मरणही असले रसीले मज मिळावे

(कतिल शिफाई यांच्या अपने होठों पर सजाना....या गझलेच्या स्वैर अनुवादाचा प्रयत्न)

हे सखी (गजलेचा स्वैर अनुवाद- एक प्रयत्न)

Submitted by अज्ञात on 10 July, 2013 - 01:19

मूळ गझलेच्या स्वैर अनुवादाचा एक प्रयत्न. गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी.

क़तील शिफ़ाई यांची मूळ गजल

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ |

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ |

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ |

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ |

आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ||

या आधी दोनदा दुरुस्त केली पण समाधान झाले नव्हते. आता शेवटची दुरुस्ती करून टाकली आहे.

मृत्युही गझलीय यावा.. (भावानुवाद - अपने होंठों पर सजाना चाहता हूँ..)

Submitted by रसप on 10 July, 2013 - 00:54

वाटते ओठांवरी तू हास्य व्हावे
जन्मभर केवळ तुला मी गुणगुणावे

एकदा तर एक अश्रू तू टिपावा
पापणीने मोतियाचे दान द्यावे

खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी
'मी तुला स्मरतो' असे तूही स्मरावे

स्वप्न काळोखात माझे हरवलेले
वास्तवाचे दीप आता पेटवावे

श्वास शेवटचा तुझ्या डोळ्यांत घ्यावा
मृत्युही गझलीय* यावा, मी जगावे

मुळ गझल : अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
मूळ गझलकार : क़तील शिफ़ाई
भावानुवाद : ....रसप....
९ जुलै २०१३

मूळ गझल :-

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ

ओढ

Submitted by सचिनकिनरे on 9 July, 2013 - 16:15

तिला घरट्याची ओढ
त्याचे कामाला जुंपणे.
तिचे मन तुटे तीळ,
दिस रिताच संपणे.

बाळ तान्हुला सोनुला,
घरभर शोधे फिरे.
बाबाच्या आठवाने,
तोही मनी हुरहुरे.

ती बाळास निजवे,
याची उद्याची तयारी.
याच्या वाटेकडे मन,
उगीचच भास होई.

बाळा बोलता येईना,
माये सांगता येईना,
भरल्या घरीदारी,
अश्रू ढाळता येईना.

असा कशाले जगतो,
कुणासाठी रे खपतो,
कुठल्या ध्येयामागे,
टाहो फोडुन धावतो.

शब्दबेवडा

Submitted by अभय आर्वीकर on 9 July, 2013 - 12:07

शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीतेला शोधणे विसरलो! लंकेमध्ये रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो

आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना

अनुवाद : अपने होंठों पर सजाना...

Submitted by वैवकु on 9 July, 2013 - 09:58

(अनुवाद समवृत्तीय करण्याचा प्रयत्न )
________________________________________

माझिया ओठी सजवणे इच्छितो मी
ये , तुला गाणे बनवणे इच्छितो मी

एक अश्रू ढाळुनी पदरावरी तव
थेंब तो मोती बनवणे इच्छितो मी

आठवूनी तुज किती थकलोय आता
याद तव होवून बसणे इच्छितो मी

पसरते आहे उभ्या वस्तीत हे तम
पेटुनी घर मम , उजळणे इच्छितो मी

प्राण मांडीवर तुझ्या माझा सुटावा
मरणही गझलियत् असणे इच्छितो मी
________________________________________

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ

तुझ्याआधी

Submitted by पारिजाता on 9 July, 2013 - 09:55

दिवसभर वेगवेगळ्या वाटांनी,
एकमेकांपर्यंत भावना पोचवून,
सगळं अवकाश मालवल्यावर पुन्हा,
मी दिवसाच्या हिशोबाला लागते.
तासा-मिनिटा-क्षणांचे रकाने.
आवेग, रुसवे, तक्रारी, वचनं,
भावना, ठराव आणि कबुल्या
यांच्या असंख्य ओळीनी..
भरत जातात मनाची पानं.

सुखावते रोजच मी या जमाखर्चानंतर.
फक्त..
ते मन आणि डोळे मिटतानाच्या
त्या क्षणी एकच विचार करते.

कशी जगत होते मी?कसे होते दिवस त्यावेळी?
तू येण्याआधी.
तू येण्याआधी..
या मोरपंखी, अफाट वेळाचं..
आणि या अथांग भावनांच्या खेळाचं..
मी नक्की करायचे काय?

शब्दखुणा: 

फूल हे आले कसे?

Submitted by निशिकांत on 9 July, 2013 - 06:44

वृक्ष असुनी पिंपळाचा
फूल हे आले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

मी व्यथा माझ्या मनीची
मांडतो ना मांडली
वेदना अन् घाव भळभळ
हीच माझी कुंडली
प्रेम शिडकाव्यात माझे
अंग हे न्हाले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

मी जरी छातीस होते
माझिया धरले पुढे
वार का पाठीत केले
आपुल्यांनी एवढे?
आज ते पाठीवरोनी
हात का फिरले असे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

सूर माझा हरवलेला
आज आहे लागला
मैफिलीला तूच सखये
ये अता खुलवायला
चाहुलीने फक्त तुझिया
रंग हे भरले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

हात हाती तू दिला अन्
वाटते जग खास हे

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन