काव्यलेखन

कविता

Submitted by -शाम on 31 July, 2013 - 09:06

त्याच्या मनात येते तेंव्हा
तोही लिहतो मातीमध्ये
नांगरलेल्या रेघेवरती
बैलासंगे त्याची कविता

माळावरती गाळावरती
भाळावरती काळावरती
अक्षर अक्षर पेरत जातो
कातडीतली शाई सांडत

वृत्ते यमके छंद मुक्तके
या सार्‍यांच्या पल्याड उगते
संगणकाच्या खिडकीमधुनी
ना दिसणारी हिरवी कविता

भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर

------------------------------शाम

विठ्ठलाचा शेर माझा भाबडा नसतो....

Submitted by वैवकु on 31 July, 2013 - 04:48

कुंपणापर्यंत खोट्याची मजल असते
ब्रम्हही व्यापून सत्याचे प्रतल असते

पॉश स्वप्नांच्या "फरारी"तून* मन फिरते
देह ..मागे धावणारी सायकल असते

वाद होती आमचे संवादण्या जाता
मी विनोदी दाद ती हळवी गझल असते

मी ठरवतो रोज ..दादा कोंडके व्हावे
पण नशीबी व्हायचे अलका कुबल असते

मी नकाशे कुंडल्यांचे वागवत नाही
शेवटी , आयुष्य चुकलेली सहल असते

एक जीवन एक मृत्यू ..वेगळे गुंते
श्वास घेणे हीच दोघांची उकल असते

पाऊस

Submitted by पिल्या on 31 July, 2013 - 04:31

पाऊस

सकाळीचं आज पाऊस भेटला
आज मस्त बॅटिंग करतो म्हणला

दुपारपर्यंत धुंवाधार खेळला
संध्याकाळी मात्र सुर्य त्याची दांडी घेउन गेला

वार्‍यालाही सिक्सर हाणीन म्हणला
अन पानांनाही अलगद झेल देउन गेला

फिल्डवर गरमीलाही पळवतो म्हणला
आणि कंटाळल्यावर थोड्या गाराही देतो म्हणला

गवतालाही उभं राहुन चीअर करु देत म्हणला
मातीलाही ओलं होऊ देत म्हणला

सकाळीचं आज पाऊस भेटला..
पुन्हा येताना आधी वीज धाडुन मगचं येईन म्हणला

अंतप्रहर

Submitted by सई गs सई on 31 July, 2013 - 04:23

हवेत झप्पर उडवुन छप्पर
गेला वारा माळावर तत्पर
शब्दपाण्याचा झोत सारुनी
आत उगवला काळा पत्थर

घेत गिरकी पिसाट भिंगर
जात लयाला हाकेची लकेर
उजाडावरती हिरवट काळी
तरी उगवते आस रानभर

अशाच वेळी टांग जीवाचे
अनाम सुंदर काळे झुंबर
रात्र सजवाया मी गुंफते रे
वांझ स्वप्नांची मंद झालर

काही केल्या होत नसे रे
इंद्रियांची भलावण तत्पर
डोळा पाणी आण नाहीतर
टाक पुन्हा मायेचा मंतर

- सई

शब्दखुणा: 

फुटकळ - २

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2013 - 04:12

अभिप्राय देण्यामुळे घोळ होतो
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो

==========

प्रवास रस्ता घाट बोगदा खड्डे टोल नि गावे
माझ्या एका आयुष्याला किती किती ही नावे

==========

काही यत्ता फार जळफळत तिच्या गव्हाळी रंगावर
नववीमध्ये जाण्याआधी हळद लागली अंगावर

==========

काल नोकरी गेली ज्याची तो का आनंदी दिसला
त्याला घालवणारा होता तोच कसा बंदी दिसला

==========

कितीदा पाहिली बदलून मी वागायची शैली
जगाने रंजनासाठी मला केलेच बदफैली

==========

माळा आवरताना इतके जाणवले की
पुन्हा एकदा आवरायला हवाय माळा

==========

फेसबूक नव्हते तेव्हा जे संपर्कामध्ये नव्हते

शब्दखुणा: 

ये, सखये ये ....

Submitted by अवल on 31 July, 2013 - 02:46

तसे केव्हाच तुला बुडवले
तळ्यात , खोल खोल आत
तुझे गुदमरणे, तुझे हुंदके
अगदी गिळून टाकले कधीचे

तुझ्या जिवंतपणाचे लक्षणी बुडबुडे
वर येऊन फुटू नयेत म्हणून
तळ्यावरच सा-या,
बांधली मोठी कबर;

सणसणीत व्यवहाराची, दिखाऊ, सुबक
त्यावरल माळले कित्येक साज, फुले
तेही शोभेचे,
फुलण्याचा शाप नको म्हणून

हुश्श्य...
मोठा श्वास घेतला,
चला आता काळजी मिटली
एक मोठा उसासा टाकला,

अन झाले,
तू तशीच
पुन्हा वर,
जिवंत

शब्दखुणा: 

खरच तुझा खूप त्रास होतो

Submitted by Trushna on 31 July, 2013 - 00:54

खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तू जवळ असतोस तेव्हा
सर जग माझ्या मुठीत असत
पण तू नसताना मात्र
सार काही भकास भासत
म्हणून खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तुझे शब्द न शब्द मनावर प्रेमाची फुंकर घालतात
पण तू नसताना मात्र ते खूप छळतात
म्हणून खरच तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तू सोबत असतोस तेव्हा
माझ्या जगण्याची मजाच निराळी असते
कारण माझ्या सुखांची तार तुझ्याशीच जुळली आहे
म्हणून तुझा खूप त्रास होतो
केव्हाही कुठेही फक्त तुझा भास होतो
तुझ्या डोळ्यात स्वताला पाहताना
मन माझ भारावून जात

शब्दखुणा: 

कणा ( विडंबन )

Submitted by Trushna on 31 July, 2013 - 00:07

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

शब्दखुणा: 

साय

Submitted by pulasti on 30 July, 2013 - 16:50

ज्याची काठी त्याची गाय
काळ नवा पण जुनाच न्याय

उगाच वाटे 'मी मुख्त्यार'
खरा कधी नसतो पर्याय

कितीकदा येतेच मनात
बाबांचे चेपूया पाय

अजून स्मरतो तो पाऊस
मी, तू, छत्री, कटींग चाय

अंगण, चाफा, आजी, चूल
आठवणींवर आली साय

मला जायचे खोलच खोल
नकोत सस्ते तरणोपाय

गाणे..

Submitted by के अंजली on 30 July, 2013 - 13:42

मी पाहते फुलांना
हासून ती जराशी
रंगात रंगताना
फुलते सुरेल गाणे..

वाटेत या कळ्यांच्या
अडतो खट्याळ वारा
बहरात मग फुलांच्या
खुलते सुरेल गाणे..

शुभ्राळ लाट येता
बाहुंत सागराच्या
पाहून मिलनाला
भुलते सुरेल गाणे..

तो बोलतो मधाळ
ऐकून बोल त्याचे
मोहूनिया मनात
झुलते सुरेल गाणे..

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन