काव्यलेखन

मी तत्वांच्या फुटपाथावर चालत असतो ...

Submitted by सुशांत खुरसाले on 23 November, 2013 - 08:44

जगबाजारी मोहक रस्ता वाहत असतो
मी तत्वांच्या फुटपाथावर चालत असतो

अर्थहीन नात्यांवरती हा जीव उधळला
अर्थपूर्ण नात्यांत दुरावे साधत असतो

कधी वाटते शेर पूर्ण हा करून जावा
जरी स्वतःला अर्ध्यातच मी सोडत असतो

दृष्ट लागते असा शेर मज कसा जमावा
दृष्टीवर मी रोज झापडे बांधत असतो

या जगतावर खूप भाषणे करून झाली
स्वतःवरती बोलाया मी लाजत असतो

पराभवाचे जुने मनोरे समोर येता
जमेल तितका नाविन्यावर भाळत असतो

नजरचुकीने नजर भेटली होती अपुली
नजरचुकीचे आभारच मी मानत असतो

आज रेसकोर्स वर

Submitted by हर्पेन on 22 November, 2013 - 03:01

गुढगे वाईट्ट्ट्ट्ट् दुखत होते, वाईट वाटत होते की आज आपल्याला धावता येणार नाही.
थोडेसेच अंतर धावलो रेसकोर्सवर. आज रेसकोर्सवर जास्तकरून फक्त चाललो.

धुक्याच्या दाट पट्ट्यातून चाललो....धुके हाताला लागतंय का ते पाह्यलं, ओलसर दमट हवेचे संथ खोल श्वास घेतले, सिगारेटच्या धुरासारख्या तोंडातून वाफा काढल्या.

गारठल्यामुळे जाडजूड झालेल्या साळुंक्या एकमेकांना चिकटून बसलेल्या पहिल्या, जोडीने उडणारे धनेश पाहिले. घोड्यांच्या टापांबरोबरच त्यांच्या श्वासाचेही आवाज ऐकले.

तू नसल्याचे मनी रितेपण

Submitted by निशिकांत on 22 November, 2013 - 00:18

गझलेच्या मैफिलीत जेंव्हा
रंग लागतो भरावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

नंदनवनही कवेत होते
तुझ्या सोबती वावरताना
एक निराळी धुंदी होती
पडताना अन् सावरताना
सुवर्णक्षण जे कधी भोगले
तेच लागले रुतावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

अनुभवला स्पर्शात तुझ्या मी
कायापालट जीवनातला
शक्य जाहले अशक्य ते ते
ऋतू भेटला श्रावणातला
अक्षर ओळख नसून सुध्दा
गीत लागलो लिहावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

परीघ अपुल्या स्वप्नांचा तर
क्षितिजाच्या पण पल्याड होता
खाचा खळगे पदोपदी अन्
समोर मोठा पहाड होता
हात घाट्ट हातात असू दे
जमेल तितके चढावयाला

कविता मोडीत बसले

Submitted by सखा on 21 November, 2013 - 19:47

शब्द शब्द सुटा सुटा तोडीत बसले
काही शहाणे कविता मोडीत बसले

लग्ने युती अभद्र सत्तेसाठी नव्याने
लाखो भुजंग मुंगुस गोडीत बसले

खोदला पहाडात कुणी रस्ता एकाने
नामर्द कोपऱ्यात खडे फोडीत बसले

कुणी भविष्य देख उराशी कवटाळले
रडे लक्तरे पुराणी जोडीत बसले

जिगरबाज दर्या फिरून सारे आले
कलमबाज तर्र कागदी होडीत बसले

-सत्यजित खारकर

हल्ली

Submitted by डॉ अशोक on 21 November, 2013 - 13:17

*-------------------------------------*
हल्ली
*-------------------------------------*
तळे आसवांचे राखतो मी हल्ली
राखतो म्हणूनी, चाखतो मी हल्ली
*
पाहिली स्वप्ने जी, मिळून दोघांनी
राख ही त्यांचीच, फासतो मी हल्ली
*
प्रेतयात्रा मीच, काढली माझीच
फुले समाधीवर, वाहतो मी हल्ली
*
सवय बैठकीची, फक्त आहे तरी
भेटण्या मैलभर, चालतो मी हल्ली
*
दु:ख असते सदा, एकट्याचेच पण
गझलेतूनी ते, वाटतो मी हल्ली
*
डॉ. अशोक

शब्दखुणा: 

नपुंसक

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 November, 2013 - 11:55

गल्लीमधल्या काळूचा
वंश कधीच वाढणार नाही
जगण्याशिवाय जगण्याला
त्याच्या काही अर्थ नाही
लहानपणी केव्हातरी
मुन्सिपालटी घेवून गेली
नस त्याची कापून पुन्हा
होती रवानगी केली
आता काळू माद्यांसाठी
कधीच लढत नाही
घुटमळणाऱ्या माद्यांनाही
मुळीच पाहत नाही
गेट जवळील जागा त्याची
कधीच सोडत नाही
जगतो हीच कृतज्ञता
शेपूट हलवून दाखवत राही
अखेर पर्यंत आपले
अस्तित्व सांभाळणे
देहात कोरून ठेवलेले
वंश सातत्य टिकवणे
जीवनाच्या दोन या
मुलभूत संप्रेरणा
परिपूर्ण करीत असती
अवघ्यांच्या जीवना
जेव्हा पाहतो मी काळूला
फक्त फक्त जगतांना
अन माणसांना मुलांचे
लेंढार घेवून चालतांना
एक अपराध भावना

जगामध्येच मी विरघळून गेलो...

Submitted by अ. अ. जोशी on 21 November, 2013 - 11:03

जगाला वाटले ते करून गेलो
जगामध्येच मी विरघळून गेलो

तसे नव्हते मनी पण स्वभाव आहे
जगाशी भांडलो, मग जुळून गेलो

जगाला जिंकले एवढ्याचसाठी
जगासाठीच शेवट हरून गेलो

कुठेही माज ना राखला कधी मी
सहज साऱ्या जगाला मिळून गेलो

सरळ जाणे जिथे त्रास देत होते
कशाला वाद घालू? वळून गेलो

स्वत:चा काढला(मांडला) मी लिलाव होता
कुणाचा ना कुणाचा बनून गेलो

जिथे मज वाटले की जगां मिळावे
तिथे नकळत कुणाच्या पळून गेलो

करा थट्टा कुणीही खुशाल माझी
अरे, मी त्याचसाठी जगून गेलो

नसे आलो तुझी मिळविण्यास टाळी
तुला मी फक्त थोडे थटून गेलो

सुखाशी देह केवळ जुळून आला

तिलांजली

Submitted by समीर चव्हाण on 21 November, 2013 - 01:35

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 

उघडीप

Submitted by सखा on 21 November, 2013 - 01:07

चांद ओला ओला रे
पानं ओली ओली रे
नभ भुई ओलावलं
ओली रेख काया रे

ओली फुलं वाटा रे
ओली ओली धार रे
ओला गंध आला रे
अत्तराचा फाया रे

ओथंबले बघ मन रे
भिजलेले बघ तन रे
उन्हावर पावसाची
ओली ओली साय रे

ओल्या श्रावणात रे
येडं सपान भिजं रे
थंडी गींडी न लागू
धरी झाडी छाया रे

जराशीच उघडीप रे
गपगार रीप रीप रे
लगाबगा रे पहा निघ
ओल्या मोळ्या दोन रे

-सत्यजित खारकर

शब्दखुणा: 

तू आवडण्याला नव्हते काही कारण..

Submitted by रसप on 21 November, 2013 - 01:04

तू आवडण्याला नव्हते काही कारण
तू नावडण्याला देखिल नाही कारण

मी झुरलो प्रेमाच्या ह्या नजरेसाठी
उपकारालाही असेल काही कारण

साचला बर्फ भवताली आयुष्याचा
दे सुटकेसाठी एक प्रवाही कारण

जो योग्य ठिकाणी पोचवायचा रस्ता
आता चकवा देण्याला पाही कारण

लागावा पैसा तिज बघण्यासाठीही
बरबादीला मग मिळेल शाही कारण

तू कितीकदा येण्याचे टाळुन झाले
बघ सुचेल जाण्याचे आताही कारण

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन