काव्यलेखन

माकडाची मज्जा

Submitted by पुरंदरे शशांक on 29 November, 2013 - 00:24

माकडाची मज्जा

माकडभाऊ हूप हूप हूप
झाडावर बसले जाऊन चुप

बघायला जमली गर्दी खूप
मुले ओरडली शेपटीला तूप

वेफर्स वाजता कुर कुर कुर
उतरले खाली सुर सुर सुर

वेफर्स घेतले हातातून ओढून
ठेवले गालात नीट दडवून

पहातात नीट निरखून निरखून
ठेवलाय का खाऊ कोणी लपवून

गंमत एक झाली अशी
फुटला फुगा फटदिशी

आवाज ऐकून मोठासा
घेतला झाडाचा आडोसा

फुटता फुगे फटाफाट
पळाले भाऊ धूम चकाट

मुले ओरडली थांबा ओ.. भाऊ
अजून थोडे वेफर्स देऊ ????

शब्दखुणा: 

एक "दे" बोलगाणे

Submitted by कविन on 28 November, 2013 - 23:36

थेंब थेंब मुरू दे
माती मधे जिरू दे
बी त्यात रुजू दे
कोंब त्याला येऊ दे

कोंब असा वाढू दे
पान त्याला फुटू दे
माझ्या उंची येव्हढी
फांदी त्याची वाढू दे

फांदी फांदी नटू दे
फुलांनी हसू दे
थोडी फूलं देवाला
थोडी मला मिळू दे

(लेकीला - बी ते झाड हा सायन्स मधला पाठ शिकवताना गंमत म्हणून रचलेली कविता. ही म्हणून बघता बघता तिच्या पटकन लक्षात राहिली आणि मग तो प्रश्न आमचा फार प्रयास न करता लक्षात राहिला.)

(पूर्वप्रकाशीतः बालनेटाक्षरीचा ई दिवाळी अंक - धम्म धमाका -२०१३)

शब्दखुणा: 

मीच नाही उरलो

Submitted by आकाशस्थ on 28 November, 2013 - 22:57

नाही सांगण्याचा वारसा माझ्याकडे
मीच नाही उरलो फारसा माझ्याकडे

फाटले जेंव्हा आभाळ, तारांगणे
आल्या वसतीला तारका माझ्याकडे

दे‌ऊ कशी झिंग माझी मदिरे तुला
हट्ट नको ना सारखा माझ्याकडे

फेकले जेंव्हा मुखवटे आकाश मी
पहात राहीला आरसा माझ्याकडे

आकाश..........

शब्दखुणा: 

फुलांचा इथे क्रूर व्यापार झाला

Submitted by जयदीप. on 28 November, 2013 - 22:42

कुणी थोर तो आज लाचार झाला
सुखाला सुखाचाच का भार झाला

किती घुसमटावेस आता सुखा तू..
तुला नेमका काय आजार झाला?

किनारा नकोसाच नावेस आता
तयाचा कुठे फार आधार झाला?

कळेना तुला कोण सामील आहे
नशीबा तुझा हेर का यार झाला

अश्या का उदासीन या वृक्ष- वेली
फुलांचा इथे क्रूर व्यापार झाला

नको धाक घालूस कलत्या वयाचा
मला जन्म इतकाच चिक्कार झाला

सर्कस

Submitted by सखा on 28 November, 2013 - 12:52

वेशीवर तसाच रुसतो मी
वळून पापण्या पुसतो मी

सापशिडी खेळ जगण्याचा
गारुडी बनूनी हसतो मी

मी न दिली तुला फोल वचने
कळेना का खोल फसतो मी?

सलती काटे दिवसभराचे
रात्र सारी लिहित बसतो मी

सर्कस हा खेळ जगण्याचा
असा मजेत बघत असतो मी

लुभावतात मज सूर दैवी
मेहफिलीत तशा दिसतो मी

-सत्यजित खारकर

सस्नेह आमन्त्रण

Submitted by प्राजु on 28 November, 2013 - 12:38

पुन:श्च एकदा माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मनापासून आमंत्रण ... रविवारी तुम्हा सर्वांची वाट बघते आहे. मला शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला नक्की याल अशी आशा आहे...
वेळ : ६.००
दि. : शनिवार, ३० नोव्हेंबर
स्थळ : पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ , पुणे.

माफ़ करा...! यामध्ये माझे मित्र वैभव देशमुख हेही मुशायर्‍यामध्ये सहभागी होणार आहेत.. नजर चुकीने त्यांचे नाव राहून गेले. वैभव, मोठ्या मनाने माफ़ करशिल अशी आशा आहे. !!

मऊ मऊ बाळ

Submitted by सखा on 28 November, 2013 - 10:27

छोटी छोटी बोटं
कापसाची शेतं

पिटी पिटी डोळे
सोनुले सोनुले

चिंगु मिंगु नाक
किती पहा राग

गब्बू गब्बू गाल
कसे लाल लाल

मऊ मऊ बाळ
मोत्याची माळ

-सत्यजित खारकर
बोबो नावाचा रोबो पुस्तकातून

प्रार्थना एक सोपी

Submitted by सखा on 28 November, 2013 - 09:55

स्वर तुझे गीतास लाभूदेत आता
एक दास्ता जगास ऐकूदेत आता

तप्त निखारे न इथे सावली कणभर
दाह्ले पाय क्षणभर निवूदेत आता

कासावीस फुले कितीक केविलवाणी
हसरी गाणी मनात फुलूदेत आता

पहा एक मंदिर म्हण प्रार्थना सोपी
शांतता जन मनास लाभूदेत आता

भेटीले मज ध्यास आजन्म घेतला
भरूनी डोळे मजला पाहूदेत आता

-सत्यजित खारकर

तू कसा आहेस?

Submitted by राजेंद्र देवी on 28 November, 2013 - 05:34

तू कसा आहेस?

छेदल्या हृदयास काय विचारते
तू कसा आहेस?
विदीर्ण असूनही तुझ्यासाठी
जगण्याचा प्रयास आहे

स्वप्नांना काय सांगू
रात्र उदास आहे
कसा विसरू आठवणींना
जागोजागी तुझा भास आहे

नशिबात माझ्या
वैफल्याचे चांदणे आहे
विझलेल्या सुर्यास
ढगांचा शाप आहे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

तोतो तोतो करु या छान ......

Submitted by पुरंदरे शशांक on 28 November, 2013 - 04:03

तोतो तोतो करु या छान ......

चला चला लौकर तो तो करु
छान छान काजळ-तिटी लाऊ

रडायचं नाही बरं का गं बये
उग्गाच हसून दाखवते काये

डोळे मिटा पट पट पट
साबण लाऊ चट चट चट

नको गं रडू सोनू-बाळा
तो बघ गेला उडाला काव्ळा

आटपा लवकर जायचंय ना भूर्र....
किती बै चाल्लीये हिची कुर्कुर

"अगं ए बये चल लौकर
किती हा खेळ सार्‍या घरभर
स्कूलबस येईल इतक्यात बघ
वाजेल हॉर्न पँ पँ मग....
सोड त्या बाहुलीला ठेव खाली
तोतोचा खेळ खेळा संध्याकाळी..."

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन