काव्यलेखन

तोतो तोतो करु या छान ......

Submitted by पुरंदरे शशांक on 28 November, 2013 - 04:03

तोतो तोतो करु या छान ......

चला चला लौकर तो तो करु
छान छान काजळ-तिटी लाऊ

रडायचं नाही बरं का गं बये
उग्गाच हसून दाखवते काये

डोळे मिटा पट पट पट
साबण लाऊ चट चट चट

नको गं रडू सोनू-बाळा
तो बघ गेला उडाला काव्ळा

आटपा लवकर जायचंय ना भूर्र....
किती बै चाल्लीये हिची कुर्कुर

"अगं ए बये चल लौकर
किती हा खेळ सार्‍या घरभर
स्कूलबस येईल इतक्यात बघ
वाजेल हॉर्न पँ पँ मग....
सोड त्या बाहुलीला ठेव खाली
तोतोचा खेळ खेळा संध्याकाळी..."

सोडुन जाता.....

Submitted by shriya.keskar on 28 November, 2013 - 03:22

पिलांस सोडून जाता
मन होते सैरभैर
आठवून त्या चिमुकल्या
दाटून येतो ऊर....
दिवस संपता संपत नाही
आठवांची रांग लागते
छोट्या छोट्या पैजणांची
छुमछुम उगाच कानी येते...
कान आतुरता तॊ
गोड आवाज ऐकावया
इवल्या इवल्या हातांचा
स्पर्श वाटतो हवाहवा....

का ओहोटी दिसली नाही?

Submitted by निशिकांत on 28 November, 2013 - 00:40

असून आवस आयुष्याची
भरती का ओसरली नाही?
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

पापणीत तुज साठवले पण
तरी ती सदा ओली असते
आठवणींशी कुजबुज करता
हळूहळू गाली ओघळते
स्पंदनातही हवीहवीशी
ऊब तुझी जाणवली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

पक्षी येती, जाती पण या,
आठवणी येतात फक्त का?
आठवणींची वर्दळ असुनी
मना वाटते रिक्तरिक्त का?
एक जमाना झाला माझ्या
कळी मनाची फुलली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

दिवस, रात्र मी ढकलत असतो
काळ असा हा कसा थांबला ?
तुझी वजावट झाल्यापासुन
प्रवासातला वेग खुंटला
तुझ्यात गाडी अशी अडकली !
पुन्हा कधी चौखुरली नाही

प्रेम....

Submitted by राजेंद्र देवी on 27 November, 2013 - 22:48

प्रेम....

खरं तर तुला सांगायचं नव्हतं
पण माझं तुझ्यावर प्रेम होतं

झाडाआडून बघायचं नव्हतं
उगाच गल्लीबोळांतून फिरायचं नव्हतं
देवळात जाण्याचा बहाणा करून
तुला एकटक न्याहाळायचं नव्हतं

शिकवण्या अन वाचनालये
मला अजिबात लावायची नव्हती
होळी अन रंगपंचमी
मला खेळायची नव्हती

मित्र मैत्रिणींना मला
चिडवायचं नव्हतं
पुस्तकात चिठ्ठ्या टाकून
मला तुला अडवायचं नव्हतं

तरी पण मी हे सर्व का केलं होतं
कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

बेड्या

Submitted by निलेश_पंडित on 27 November, 2013 - 18:47

फारा वर्षांनी जेव्हां ती पुन्हा एकदा दिसली
जखम पुन्हा प्रणयाची नकळत ठणक्याने ठसठसली

शब्दही न बोलता मनांना गूज मनींचे कळले
अपूर्ण स्वप्नांचे तांडे अन् भविष्याकडे वळले

हस्तांदोलन झाले आणिक तिथेच खिळले हात
पुन्हा एकदा गुंतत गेली हृदये परस्परांत

देह्मनाच्या कुचंबणेने पित्त खवळले माझे
समाजातल्या रूढींचे मग फक्त वाटले ओझे

परवा जेव्हा पतीस अवचित तिच्या लागली ढास
जीव तिचा अवघा तळमळला जणू लागला फास

अंतर्मुख झालो आम्ही भानावर तेव्हां आलो
मलम लावले जखमांना अन् घरपरतीस निघालो

पतंग रंगित मोहक त्याला कणा चार काड्यांचा
मुक्त भरारीलाही शोभे पाश जरा बेड्यांचा

कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या

Submitted by बेफ़िकीर on 27 November, 2013 - 13:19

कशी नाल्यास यावी सागराची गाज तारुण्या
तुलाही वाटते ना सांग माझी लाज तारुण्या

तुला जोमात आणायास ही खोडे जुनी झाली
नको होऊस म्हातार्‍यांवरी नाराज तारुण्या

अकाली प्रौढ होण्याला नको ठेवूस तू नांवे
मला आलाच नाही रे तुझा अंदाज तारुण्या

तश्याही घ्यायच्या आहेत मरतानाच झोकांड्या
स्वतःही पी हवी तितकी......मलाही पाज तारुण्या

कुठे ती आणि कोठे तू...... कुठे नामानिराळा मी
कसा देऊ तिला आता पुन्हा आवाज तारुण्या

हवा होतो अश्यांना मी नकोसा वाटतो आता
कसे फेडू तुझे हे व्याज मी निर्व्याज तारुण्या

प्रवासातील टप्पा एक ज्याला पूजती सारे
कशाचा नेमका आहे तुला हा माज तारुण्या

नोंद

Submitted by निलेश_पंडित on 27 November, 2013 - 02:46

काय देऊ संयमाची मी तुला आता हमी
पाहताना केस ओले, मोकळे अन रेशमी

का असा घायाळ होतो मी अचानक नेमका
काजळाने माखलेल्या लोचनांनी नेहमी

हाय का ना मोजती स्वप्ने कुणी विरहातली
मी तुला मग पाहण्याची नोंद होइल विक्रमी

बोट-पदराचा असा चाळा सखे नाही बरा
या तुझ्या अस्वस्थतेचा अर्थ घ्यावा काय मी

राग-रुसवा … त्यात मिसळे हासणे अवखळ तुझे
खेळ हा साधा तुला पण टाकतो मज संभ्रमी

आठवांचा भार नाही पेलणे सोपे जरी
एकटे जगण्यास त्यांची नित्य होते बेगमी

- निलेश पंडित

' घाव '

Submitted by -शाम on 27 November, 2013 - 00:06

हा जन्म म्हणू की जोग
अभागी भोग
जाळतो छाती
वक्षातुन चळते
स्वप्न चुरडते राती

आसक्त क्षणांचे फेर
तमाच्या पार
उसळती लाटा
शिणलेला निथळे
देह निचेत करंटा

सोसते दिशांचे बोल
पापणी ओल
घाव घन गहिरा
निकलंक हिर्‍यावर
वांझपणाचा कचरा

-----------------------------------शाम

तू किती लपणार आहे शेवटी?

Submitted by मानस६ on 26 November, 2013 - 21:50

तू किती लपणार आहे शेवटी?
आरसा दिसणार आहे शेवटी..!

धाडसी गमज्या जरी मी मारतो..
नोकरी करणार आहे शेवटी !

चालु द्या, तुमच्या नृपांनो वल्गना!
राम ती वरणार आहे शेवटी!

शेवटी बघशील तू देवाकडे...
अन कुठे बघणार आहे शेवटी..?!

बांध रे बिनधास्त मजले आणखी..
वैधता मिळणार आहे शेवटी!

शेवटी उरतात वेडे मोजके..
मी तिथे रमणार आहे शेवटी

थांब ना थोडी, जरा प्रतिमेमधे..
रंगही भरणार आहे शेवटी

कोळसा आहे तरी, पाहून घ्या..
मी हिरा बनणार आहे शेवटी!

मी जरी नाकारतो मृत्यो तुला
सामना घडणार आहे शेवटी

शेवटी जगशील तू माझ्याविना,
मी कसा जगणार आहे शेवटी?

मी असो, वा हा दिवा खोलीतला

तू

Submitted by जयदीप. on 26 November, 2013 - 12:56

मला पाहताना तुला पाहतो मी
तुला पाहताना खुळा भासतो मी

तुझ्या पावलांची मला हाक येते
मला सोडुनी का ...असा धावतो मी

तसे आज आहे हवे ते मिळाले
तुझे स्वप्न होण्या खरे मागतो मी

तुझा स्पर्श करतो मला आपलासा
असा पाहुणा का ....मला वाटतो मी

तुला लाजताना..जसे पाहतो मी
नवे अर्थ प्रेमा...तुझे जाणतो मी

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन