काव्यलेखन

नमस्काराय..

Submitted by कमलाकर देसले on 9 November, 2012 - 06:50

नमस्काराय ..

सुखाची दु:ख ही माय;
दुधावरची जणू साय ..

पळाया सांगतो, मस्त ;
कुणाचे तोडुनी पाय ..

दुधाने पोसला.आणि ;
कसायाला दिली गाय ..

झुकावे रोज हे शीर ;
कुठे गेले असे पाय ?

कुणी सांगेल का ,फक्त ;
चितेच्याही पुढे काय ?

धरेने मारता हाक ;
बरसते तेच आभाय ..

तुझी सत्ता खरी एक ;
नमस्काराय कालाय ..

शब्दखुणा: 

मला न कळले

Submitted by निशिकांत on 9 November, 2012 - 02:48

सखे जरी ते माझे आहे मला न कळले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

दगडाचे मन माझे आहे भाग्यवान तू
नाव कोरले तुझेच त्यावर नीट जाण तू
आल्या गेल्या कैक, कुणी ते पुसू न शकले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

बावरते मन तुझ्याविना का ठाउक आहे?
एकलपणचे दु:ख तयाला घाउक आहे
वठल्या माझ्या मनास अंकुर कधी न फुटले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

निघून गेली वळ नको ना अता इशारे!
मृगजळात का कुणी पाहिले कधी फवारे?
आनंदाला लिलावात मी कालच विकले
तुला वाटते मनास माझ्या तू ओळखले

नदी आटली तरी किनारी कसे बसावे?
झुळझुळ सरली भळभळ आली कसे हसावे?
ठसठसणार्‍या दु:खालाही मी पांघरले

दिसावयाला हरेक माणूस संत आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 November, 2012 - 23:14

गझल
दिसावयाला हरेक माणूस संत आहे!
दिलास तू हात त्यामुळे मी जिवंत आहे!!

सुपूर्त एकेक स्वप्न केले तुझ्याकडे मी;
हरेक मर्जी तुझी मलाही पसंत आहे!

चहूकडे पाहतो सडा मी तुझ्या फुलांचा....
मलाच आले न वेचता हीच खंत आहे!

न एकटा मी तुझ्या सुधेचा तहानलेला;
तुझ्या सुगंधात नाहला आसमंत आहे!

सुरात त्यांनी पुन्हा सुरू कावकाव केली....
कसे म्हणू कोकिळे तुझा हा वसंत आहे?

मला पुन्हा घ्यायची न शोभा करून माझी;
तुझा खुलासा भले जरी शोभिवंत आहे!

पुन्हा पुन्हा मी गुन्हा करावा जगावयाचा!
अखेर माणूस एक मी जातिवंत आहे!!

विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे...

फुले किती बागेत उमलली

Submitted by पुरंदरे शशांक on 8 November, 2012 - 22:28

फुले किती बागेत उमलली

फुले किती बागेत उमलली
गोड गोडशी कितीतरी
फुलपाखरु होउनी जावे
गुंजत र्‍हावे फुलांवरी

रंग वेगळे किती किती ते
देतो यांना कोण बरे
वा-यावरती डोलत असता
भान हरपुनी मी निरखे

जाई जुई पांढरी शुभ्रसी
जास्वंदी ही लाल किती
केशरदेठी पारिजात हा
गंधित झाला परिसरही

गर्द जांभळी गोकर्णी ही
गुलाब फुलले कोमलसे
शेवंतीही पिवळी पिवळी
उन कोवळे पसरविते

ऊंचाउनिया मान केवढी
निशीगंधही उभा दिसे
मंद सुगंधी झुळका येता
मन मोहवुनि टाकतसे

तुझीच वाट पाहत होते

Submitted by amol_koli on 8 November, 2012 - 17:10

मेघांची गर्जना झाली,
काळोखाची साथ त्यास मीळाली.
नयनी अश्रु थांबत न्हवते
मी तुझीच वाट पाहत होते

श्वास तुजा मला जाणवतो
स्पर्श तुजा असह्य होतो
तुज्याच मीठीत मी जगत होते,
आज तुझीच वाट पाहत होते

जसे आठवताना चुंबण तुजे
शहारुण गेले अंग अंग माझे
मण कासावीस आज का होते ?
ते तुझीच वाट पाहत होते

स्वप्नातिल जग हे आपले,
आज कसे कोमेजुनी गेले
एकांताचा दुरावा सोडवीत ते
जसे तुझीच वाट पाहत होते

ती चांदनी रात आठवतेय का तुला?
मी तुझ्याचं खुशीत निजले होते
सोडूनी जान्या आधी तु मजला,
मी तुझीच वाट पाहत होते.

असा दुरावा नको रे मला,
बोलव ना जवळ माझ्या मनाला.
एकटिच आंधारात उभी होते

उडदामाजी काळे गोरे.... (अतिजलद....हझल)

Submitted by अ. अ. जोशी on 8 November, 2012 - 08:56

उडदामाजी काळे गोरे

(साहित्य सम्मेलनावर झालेल्या माबोवरील चर्चेतूनच पहिली ओळ मिळाली आणि २० मिनिटात जमली तशी...)

उडदामाजी काळे गोरे
उधळत फिरती टवाळ पोरे

त्यांस मिळाल्या शाली, श्रीफळ
ज्याचे पाटी-पुस्तक कोरे

चिमटा बसता आला उठुनी
तोवर उघडाबंब्या घोरे

मते मिळाली त्यास मिळाली
असोत जोशी किंवा मोरे

चड्डी बांधा नीट अगोदर
नसे इलॅस्टिक; देऊ दोरे

मते कशी एवढी वाढली
कुठून आणले होते खोरे..?

माहित नव्हते ज्यांना डॉक्टर
दिसतिल बघ त्यांचेही तोरे

पानगळ चक्क वाजवी होती

Submitted by बेफ़िकीर on 8 November, 2012 - 05:35

पानगळ चक्क वाजवी होती
त्याच भावात पालवी होती

पूर्ण रस्ता मुशायरा बनतो
जे तुला पाहती...... कवी होती

आज होती जुनीच दु:खे पण
आजची कारणे नवी होती

रोज कोमेजणे फुलत होते
रोज सुकण्यात टवटवी होती

काल काही निमित्तही नव्हते
काल मी घ्यायला हवी होती

जन्म सुरुवात फक्त मृत्यूची
लावणे सूर...... भैरवी होती

त्यातले आपले नसो कोणी
बालके सर्व लाघवी होती

पाळले तेवढे कटाक्षाने
ज्या सलोख्यात यादवी होती

-'बेफिकीर'!

ताटात मिळते डाळ इथे गार हल्ली (हजल)

Submitted by A M I T on 8 November, 2012 - 04:11

जनतेच्या खिशावर पडे भार हल्ली
खुलेआम होतो इथे भ्रष्टाचार हल्ली

पेट्रोल आताशा इतुके महाग झाले
परवडत नाही आम्हां कार हल्ली

'गॅस'वर आम्हां धरलयं गॅसनेही
ताटात मिळते डाळ इथे गार हल्ली

नोटा मोजुनी जलद देवास भेटा
किंवा करा रांगेत इंतजार हल्ली

वानवा आहे इथे विद्यालयांची
गल्लोगल्ली दिसतात इथे बार हल्ली

पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली

बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली

* * *

मिळते सुखाचे गाजर हल्ली (हजले पर्यंत मजल)

Submitted by डॉ. बंडोपंत on 8 November, 2012 - 02:42

भेटतो कुठे असा आधार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

सगेसोयरे असे दूरदूर वसलेत
क्षणोक्षणी हवा समाचार हल्ली

सभागॄहाचा होतो आखाडा
जो-तो वागतो का? बेडर हल्ली

आजचे काम आजच होईल
मिळेल कुठे असा दिलदार हल्ली

नशीबात असो नसो तरीही
मिळते सुखाचे गाजर हल्ली

वाढली किती अश्लीलता चोहीकडे
झाकते कोण कुठे उभार हल्ली

शब्दखुणा: 

मी तिच्या पत्रातला मजकूर होतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 November, 2012 - 02:29

गझल
मी तिच्या पत्रातला मजकूर होतो!
भेटण्यासाठी तिला आतूर होतो!!

मायना लिहिताच लिहिणे ठप्प झाले.....
मी तिच्या चिठ्ठीतली हुरहूर होतो!

मीच गंधाळून, तेजाळून गेलो!
मी तिच्या श्वासातला कापूर होतो!!

मी तिचा एकांत इतका व्यापला की,
वाटले नाही तिला मी दूर होतो!

चूक ती माझी, तुझी, की, त्या वयाची?
एकमेकांच्यात दोघे चूर होतो!

मोठमोठ्यांची उडाली पार त्रेधा.....
मी अवेळी लोटलेला पूर होतो!

घेतला आलाप अन् टाळ्या मिळाल्या;
मी जगाला भावलेला सूर होतो!

खेळले आयुष्य माझ्याशी असे की,
सूरपारंबीतला मी सूर होतो!

.............प्रा.सतीश देवपूरकर

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन