काव्यलेखन

प्रवाहवेडी...

Submitted by सुशांत खुरसाले on 11 March, 2013 - 12:01

उंबर्याला चाहूल नवी
दिशांना अन् भूल नवी
स्वप्नांनाही झूल नवी
ती येत आहे.....

मखमलीतले गाणे गाऊन
दिशादिशांचे थवे तरारून
पण मातीचे शब्द लपेटून
ती येत आहे.....

संकरातले शब्द तरीपण
ओंजळीतले तिच्या उरे मन
प्रवाहवेडी नाजूक खणखण
ती येत आहे....

अगम्य झेले तरी झेलवी
प्रतिकातले शब्द बोलवी
गमे मनाची चैत्रपालवी
ती येत आहे......

तिच्या मनीचे व्याकूळ प्याले
ओतून दिधले गोकूळ झाले
व्यर्थ जरी रे श्रेय मिळाले
ती येत आहे.....

लेडी मॅकबेथ

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 11 March, 2013 - 11:46

मॅकबेथ
तुझी संदिग्धता सूर देतेय
माझ्या स्वराला.
तुझ्या घराचे वासे
अधोगामी आहेत.
तेही, नेमाने
ढासळत चाललेत.
प्रारब्धाला अंतरल्यासारखे.

लेडी मॅकबेथच्या
काळजात दडलेल्या,
एका विशाल पोकळीवर
तू लोंबकळतो आहेस
आणि
तुझ्या दु:खाशी मी!
टिप टिप गळणार्‍या
वेदनेनं
भांबावलीये माझी संवेदना.

आशेची आंधळी किनार
घेऊन तु धडपडतोयस
माकडीणीच्या पिलागत,
तुझ्या भूतकाळाला.
गच्च धरुन,

सभोवताली होती हिरवळ स्वप्नांची

Submitted by प्राजु on 11 March, 2013 - 09:39

सभोवताली होती हिरवळ स्वप्नांची
आता वाटे उगाच अडगळ स्वप्नांची

देहामध्ये वहात होती स्वप्ने अन
जखम जराशीच... आणि भळभळ स्वप्नांची!

स्वप्न नेसते स्वप्नच खाते-पिते सुधा
असते चालू नुसती चंगळ स्वप्नांची

किती लपेटू तरी हुडहुडी भरते का?
जणू फ़ाटकी माझी वाकळ स्वप्नांची!

सत्याची गंभिरता ना त्यांच्या अंगी
अखंड चालू असते खळखळ स्वप्नांची!

हलका वारा येता कडकड तुटते बघ
तुझी डहाळी इतकी पोकळ स्वप्नांची!

वास्तवातही आणू 'प्राजू' स्वप्ने अन
लिहूच गाथा तुझ्याच मंगळ स्वप्नांची

-प्राजु

गंधार

Submitted by आर.ए.के. on 11 March, 2013 - 02:41

येतीलही जातीलही,
ते अश्रु तुझ्या दु:खातले!
बनतीलही फुटतीलही,
ते बुडबुडे हास्यातले!

पेटतीलही विझतीलही,
ते पथदिवे मार्गातले!
सुटतीलही तुटतीलही,
ते बंध घुंगरु पायातले!

जिंकतीलही हारतीलही,
ते व्दंव्द तुझ्या मनातले!
नि:शब्द होतीलही, सांगतीलही,
ते गुज तुझ्या ह्र्दयातले!

भेटतीलही सुटतीलही,
ते मित्र तुझ्या जीवनातले!
थांबतीलही जातीलही,
ते सखे सोबती वाटेतले!

थकवेल ना तुला कधी ही,
तो ओंकार सूर्यकिरणातला!
अडवेल ना तूला कधीही,
तो हूंकार ओल्या मातीतला!
विझणार ना कधीही,
तो चंद्र हिवाळी थंडीतला!
संपणार ना कधीही,
झंकार माझ्या मैत्रीतला!
देईल उत्साह कारंजे तुला,

आरती प्रभू

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 March, 2013 - 02:35

आरती प्रभू नावाची
एक गूढ गोष्ट आहे
कधी कळणारी तर
कधी नच कळणारी
कधी कळतेय असे
वाटत असतांनाच
आपणा भोवळणारी
हरवून टाकणारी
हि गोष्ट घेवून जाते
आपल्याला धुंदावत
हिरव्यागार रस्त्याने
पाखरांच्या गाण्यातून
झऱ्याच्या नादामधून
सुमधुर स्वप्नातून
आळूमाळू रूपातून
हळू हळू आपणही
आत जातो नादावून
एका अनाकलनिय
अनोख्या दुनियेत
अन तिथे ती गोष्ट
आपल्याला एकदम
एकटे सोडून जाते
मग जाणवतात
मोहक वाटणाऱ्या त्या
वृक्षांच्या फांदी फांदीत
लपलेले अजगर
हिरव्या पानामागील
काळा काळा अंधार
पायाखाली सळसळ
झुडूपात वळवळ
उरतो केवळ एक

शब्दखुणा: 

हंबरून वासराले चाटते जवा गाय

Submitted by अभय आर्वीकर on 11 March, 2013 - 02:35

हंबरून वासराले

हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामधी दिसते माही माय

आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय

बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं
बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं
शिकून शान आता कोणता मास्तर होणार हायं?
तवा मले मास्तरमधी दिसते माही माय

काट्याकुट्या येचायाले जाये माय रानी
पायात नसे वाह्यना तिच्या फ़िरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचे मानतं नसे पायं
तवा मले काट्यामधी दिसते माही माय

माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी

दु:ख

Submitted by समीर चव्हाण on 11 March, 2013 - 02:28

निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे

जसा रस्ता धुक्याने वेढलेला
उदासी घेरुनी आयुष्य त्याचे

व्यथा थैमान घालाव्यात हृदयी
चहूबाजूंस वारे वेदनांचे

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे

कधीची सोडली आशा तुझी मी
न आता दु:ख साथीला कशाचे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

"आभास"

Submitted by अमेय२८०८०७ on 11 March, 2013 - 02:10

दिशा उगवत्या होता तारे विझती क्रमाने
श्वासांत मेघमालांच्या भिजते रक्त नव्याने
वाहत्या नदीच्या भाळी मळवटलेल्या लाटा
दवभाराने थिजलेल्या सूर्यफुलांच्या वाटा
आवेगांच्या वाऱ्याने थकलेली रातकहाणी
आर्त धुक्याने सजते घावांची शुद्ध विराणी
हा स्वप्नांमधला खेळ की असे जागृतीभास
जे घडूनी आहे गेले त्याचाच पुन्हा आभास ?
स्वप्नांमधल्या खेळाच्या अर्थाने येई शहारा
जाणिव- सीमेवरती अश्रूंचा खडा पहारा

गोड गोड हसायचे..

Submitted by पुरंदरे शशांक on 10 March, 2013 - 23:30

गोड गोड हसायचे..

गुब्बु गाल कोणाचे
नक्टे नाक सोनाचे

केस कुरळे माऊचे
बोळके हसू सांडायचे
(टकलू कसे आमचे
छान छान चमकायचे)

डोळे मोठे बाळाचे
काय काय पहायचे

आई गेली कुठे कुठे
जोराने रडायचे
भुर्र येताय का म्हण्ताच
गोड गोड हसायचे ...

शब्दखुणा: 

हा खेळ सोंगट्यांचा....

Submitted by बागेश्री on 10 March, 2013 - 15:05

आयुष्याच्या पटावरचा,
हा खेळ सोंगट्यांचा....

डाव खेळताना चाली मात्र माझ्या...
कधी डौलातली सरळ,
कधी बेरकी तिरकी,
कधी एक दोन अडीच,
तर कधी एकच सावध पाऊल.....

कधी अचानक कळतं!
मांडलेला डाव तुझाच...
चालही तुझीच,
पायाखालची काळी-पांढरी घरं,
नुसताच आभास!

सोबतीच्या सोंगट्यांचा आधार,
तो खरा?
रंगातच गल्लत होते,
आपल्या परक्यांची!

पट माझा नव्हता,
डावही,
चालही नाही अन
ज्याच्या संरक्षणासाठी डाव मांडला,
तो ही माझा नाही....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन