काव्यलेखन

गझल लिहिताना किती होतात सांगू यातना!

Submitted by सतीश देवपूरकर on 29 December, 2012 - 16:14

गझल
गझल लिहिताना किती होतात सांगू यातना!
जीव घेणा-या कळा अन् ठणकणा-या वेदना!!

जे बरे वाईट घडते, पोचते हृदयामधे......
अंतरंगी एक जागृत दिव्य होते चेतना!

कैक हौशी लोक लिहिती गझल जोमाने किती!
मात्र गझलेची कुणाला समजली संकल्पना?

माणसांमधल्या पशूचे केवढे थैमान हे!
राहिल्या आहेत कोठे मानवी संवेदना?

आज जो तो ओरबाडू पाहतो जे जे हवे;
कोठले आर्जव, कशाची कोण करतो याचना?

चालला व्यवहार नुसता एकमेकांच्यामधे.....
आपलेपण, प्रेम, आस्था, कोणती ना भावना!

घेवुनी पोटास चिमटे, घास दुस-यांना दिले......
पदरमोडीच्या कपाळी मात्र आली वंचना!

R.I.P.?

Submitted by खारुताई on 29 December, 2012 - 10:28

तू मेलीस म्हणून वाईट वाटून घ्यावे..
की सुटलीस एकदाची प्रचंड यातनांतून
म्हणून एक सुस्कारा टाकावा..
न कळण्याइतपत मन बधिर झालंय..
तुझ्या आत्म्याला शांती मिळेल का हा प्रश्न असला तरीही,
आमच्या आत्म्यांना देखील हि शिक्षाच आहे..
पावलो-पावली घडणाऱ्या बलात्काराच्या बातम्या वाचत
न्यायाची वांझोटी स्वप्नं बघत जगण्याची शिक्षा..
-शिल्पा

शब्दखुणा: 

उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 December, 2012 - 05:10

धाडू नको आमंत्रणे, बेभानता नाही खरी !
उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी

माझ्या-तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभा-यातला मी देवळाची पायरी !

तारूण्य, चुंबन वा मिठी... यातील काहीही नको
नुसत्या खयालांनी तुझ्या आरक्त व्हावी शायरी

घालू नको घेवू नको, शपथा निरर्थक वाटती
आजन्म देण्या साथ तू घे जन्म एखादातरी

जे व्हायचे असते जसे होवून जाते ते तसे
तेव्हा तसे का वागलो सांगू नको आत्तातरी

नाणे नकाराचे तुझ्या सर्रास तू खपवू नको
नाण्यास असती दोन बाजू एक झाकावी तरी !

-सुप्रिया.

ती बट का झुलते गालावरती?

Submitted by रसप on 29 December, 2012 - 02:48

ती बट का झुलते गालावरती? प्रश्न मला पडताना
हृदयाचा चुकलेला ठोका पायाशी घुटमळताना
दिलखेच नजर ती नकळत माझ्या नजरेसोबत भिडली
मी अजून लोकांना दिसतो नजरेला सोडवताना
.

.

माझी ही धडपड शून्यामधली तुला उमगली नाही
अन पुन्हा नव्याने प्रेमासाठी हिंमत उरली नाही
तो चुकला ठोका अजूनही मी शोधत वणवण फिरतो
तू तहान म्हण जी मृगजळवेडी शमता शमली नाही

डोक्यावर तळपे सत्यसूर्य जो रात्रीपुरता विझतो
मी शांत मनाच्या अंधाराच्या तळास जाउन निजतो
तू गंध रातराणीचा लेउन अवचित वेळी यावे
ह्या कल्पनेत मी चकोररूपी पहाटवेळी भिजतो

सारे केशर-केशर होते अन मी बघतो क्षितिजाला

लागल्या पोटी कळा मध्येच.. हे झाले बरे? (विडंबन)

Submitted by विडंबनराव on 28 December, 2012 - 12:58

प्रा. सतीश देवपूरकर यांची गझल आणि त्यातील शब्द पाहिल्यानंतर मना राहविलेच नाही म्हणून एक विडंबनाचा छोटासा प्रयत्न करीत आहे...

लागल्या पोटी कळा मध्येच.. हे झाले बरे?
व्हायच्या आधीच सुटला पेच, हे झाले बरे!!

गंध मी उधळीत होतो, भानही नव्हते मला.....
नाक वेळेवर तिचे दबलेच, हे झाले बरे!

निसरडा रस्ता, बघ्यांचा घोळका, मी घसरलो...
फक्त थोडे शेकले कुल्लेच, हे झाले बरे!

एवढे रांगूनही आले न याला चालता...
आज तो पचकून गेला तेच, हे झाले बरे

लागल्या पोटी कळा मध्येच.. हे झाले बरे? (विडंबन)

Submitted by विडंबनराव on 28 December, 2012 - 12:58

प्रा. सतीश देवपूरकर यांची गझल आणि त्यातील शब्द पाहिल्यानंतर मना राहविलेच नाही म्हणून एक विडंबनाचा छोटासा प्रयत्न करीत आहे...

लागल्या पोटी कळा मध्येच.. हे झाले बरे?
व्हायच्या आधीच सुटला पेच, हे झाले बरे!!

गंध मी उधळीत होतो, भानही नव्हते मला.....
नाक वेळेवर तिचे दबलेच, हे झाले बरे!

निसरडा रस्ता, बघ्यांचा घोळका, मी घसरलो...
फक्त थोडे शेकले कुल्लेच, हे झाले बरे!

एवढे रांगूनही आले न याला चालता...
आज तो पचकून गेला तेच, हे झाले बरे

लागली आताच मजला ठेच, हे झाले बरे!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 December, 2012 - 10:51

गझल
लागली आताच मजला ठेच, हे झाले बरे!
व्हायच्या आधीच सुटला पेच, हे झाले बरे!!

गंध ती उधळीत होती, भानही नव्हते मला.....
ती इशा-याने म्हणाली वेच, हे झाले बरे!

निसरडा रस्ता, बघ्यांचा घोळका, चंचल हृदय.....
संपली वेळेत रस्सीखेच, हे झाले बरे!

एवढे घोकूनही आले न जे मज सांगता;
आज ती बोलून गेली तेच, हे झाले बरे!

रोज दिसतो निरनिराळा रंग दुनियेचा मला!
चित्र माझे राहिले अर्धेच, हे झाले बरे!!

कारण असावं लागतं...

Submitted by मुग्धमानसी on 28 December, 2012 - 05:02

प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...

माझं रडणं, माझं हसणं,
कधी खुप बोलणं तर कधी गप्प बसणं.
फुलासारखं कधी गदगदून बहरणं,
कधी गुदमरुन आतल्याआत झुरणं...
कुणालाच सांगायचं नसलं तरी स्वतःला ते सांगावं लागतं...
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...

एक फळ जेंव्हा झाडापासून तुटतं,
झाडावरुन नेमकं ते खालिच का पडतं?
चंद्र जेंव्हा पौर्णिमेला ऐन रंगात येतो,
समुद्र अंगात आल्यासारखा बेभान का होतो?
कमळाचं फुल नेहमी चिखलातच का फुलतं?
किरणांच्या हिंदोळ्यांवर सुर्यफुल का झुलतं?
सगळ्या प्रश्नांचं आपल्यापुरतं उत्तर आपण शोधावं लागतं,
प्रत्येक गोष्टीला काहितरी कारण असावं लागतं...

शब्दखुणा: 

बेबंद फुलताना...

Submitted by विजय दिनकर पाटील on 28 December, 2012 - 04:26

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

सरत्या वर्षाचा हिशोब आता कशाला चाळायचा

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 28 December, 2012 - 04:11

सरत्या वर्षाचा हिशोब आता कशाला चाळायचा
hishob.jpg

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन