काव्यलेखन

अंधाराचा राजदूत मी

Submitted by बेफ़िकीर on 11 December, 2013 - 02:39

मूक शिवालय, सळसळ पाने, वेडे पक्षी, एक प्रवासी
पिंडीवरती युग ओघळते गाभार्‍याची खोल उदासी
चिरंतनाच्या अस्तित्वावर क्षणभंगुरतेच्या कागाळ्या
निर्माल्याची ओल जगवते धर्माधर्मांच्या लाथाळ्या

काय हेलपाटा पडला हा, हे तर डोंगर दुरुन साजरे
अंधाराचा राजदूत मी, मी स्वीकारू तेज का बरे
शून्यामधल्या प्रसववेदना गूढ, निराकारी, बहुपदरी
इथले फेरे या हृदयाच्या निर्हेतुकश्या अफरातफरी

-'बेफिकीर'!

अंधार

Submitted by रसप on 11 December, 2013 - 00:00

ऊब देण्यास असमर्थ शाल
काही बोचऱ्या शब्दांची उशी
पुन्हा पुन्हा कूस बदलणे
मनात बेचैनी अखंडशी

अशीच एक रात्र पुन्हा येणार आहे
आजही माझी तयारी कमी पडणार आहे

घडयाळाचा काटा डोळ्यांत टिकटिकत राहील
वेळ कूर्मगतीने पुढे सरकत राहील
तरी वेळ बदलणार नाही
अंधार ओसरणार नाही..

....रसप....
११ डिसेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/12/blog-post_11.html

माझे असून नसणे...

Submitted by जयदीप. on 10 December, 2013 - 22:04

सुप्रियाजींची गझल वाचून 'काही' ही रदीफ घेऊन गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

माझे असून नसणे करते उरात काही
आतून आरशाच्या सलते मनात काही

घेऊन दूर गेलो माझे मला असे मी
आहे न ठेवले मी माझे कुणात काही

माझा न राहिलो मी ऎकून एक गाणे
होते मनात थोडे, होते सुरात काही

नि:शब्द वादळांचे देतोस तू तडाखे
आहे तुझ्या नशीबा मौनात बात काही

माझे तुझे न होणे होते ठरून गेले
संदर्भ देत आहे माझाच हात काही

आवाहन...

Submitted by बागेश्री on 10 December, 2013 - 09:08

जमिनीच्या भूर्जपत्रावर
झाडांच्या लेखणीतून,
आकाशाच्या कोर्‍या पाटीवर
भरजरी किरणांतून...

उग्र थंडीत
गारठल्या बोटांतून,
भर उन्हात
कोवळ्या झुळूकांतून,

रखरखत्या भुईच्या
भेगा भेगांतून,
गच्च दाटल्या
काळ्या मेघांतून..

तू उमल,
तू बहर...

आकाशगंगेला कवेत घे,
नात्यांना उशाशी..

कधी रणरागिणी
कधी प्रेयसी,
कधी बंडखोर
कधी श्रेयसी..

ये,
हर रूपात साकार हो...
हे कविते,
अलिंगन दे!

का बांधून ठेवले आहे मला????

Submitted by मी मधुरा on 9 December, 2013 - 23:12

का बांधून ठेवले आहे मला? ? ? ?
माझे पंख तर केव्हाच छाटून टाकलेले आहेत तुम्ही.....
आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्नसुद्धा पडत नाहीत मला आजकाल.....

झाडाच्या फांदीवरचे घरटे,
ते हवे तिथे हवे तसे उडण्याचे स्वतंत्र.....
सारे काही कधीच हिरावून घेतलेले आहेत....

एक मात्र समाधान आहे,
आता काहीच नाही उरलेलं माझ्याजवळ गमावण्यासारख....
काहीच नाही....

पण मला अजुनी कळत नाही हो.....
मी जागचा हलूही शकणार नाही अशी खात्री झाली तरीही...
तरीही अजून का बांधून ठेवले आहे मला? ? ? ?

चालायचेच माझे हे वागणे दिवाणे

Submitted by जयदीप. on 9 December, 2013 - 14:56

चालायचेच माझे हे वागणे दिवाणे
मी आरशामधेही शून्यातले पहाणे

हे गौण की मला तू नेले कुठेच नाही
मी चालवून घेतो- माझे कुठे न जाणे!

मी राखतो पुरेशी आता जमीन माझी
जमिनीत पेरले मी शब्दाळले बियाणे

वाटे नशीब आहे भलते हुशार झाले
फेटाळते कसेही, देते नवे बहाणे!

वाचून घे अता तू शब्दात ना असे जे
वाचू नको असे तू हे नेहमी प्रमाणे.....

अतृप्ती-एक चिरंतना

Submitted by अत्रुप्त आत्मा on 9 December, 2013 - 06:39

अतृप्त असावे सारे
मन तृप्तीतूनच पाही
तृप्ती'ही असते क्षणिका
अतृप्ती चिरंतना'ही

मानवास जन्मी एका
नीज सांगे ति ही काही
मन क्षणात चाखे तिजला
अन् क्षणात काही नाही

सारा हा जन्म तरिही
का धावे तिच्याच पाठी
मरणाही भेटी येता
अतृप्ती उरते गाठी

ऐश्या या अतृप्ती'ला
मी देतो एक सलाम
मन तृप्तीचे ना वैरी
अतृप्तीचे न गुलाम
==०==०==०==०
*************
अत्रुप्त
*************

शब्दखुणा: 

घरटं नि पिल्लू ...

Submitted by पुरंदरे शशांक on 9 December, 2013 - 04:25

घरटं नि पिल्लू ...

ये लौकर इकडे बघ
एक भारी गम्माडी
घरटं कसं तयार होतंय
जोडून काडीला काडी

बोलू नकोस काही आता
पहात रहा जरा नीट
आण्तो काड्या चोचीत कशा
बुलबुलराव मोठा धीट

काड्या गुंतवत एकात एक
घरटं होईल गोल छान
घाल्तील मग बुलबुलबाई
अंडी त्यात ल्हान ल्हान

काळजी घेतील दोघे मिळून
काही दिवस पहा वाट
पिल्लू येता अंड्यातून
सुरु होईल कलकलाट

पिल्ले भारी अधाशी
सार्खी म्हणे आणा खाऊ
आईबाबा आण्तात किती
किडेबिडे धाऊ धाऊ

इवलाले फुट्तील पंख
पिल्लांना नाजुकसे
बोलावतील आईबाबा
घरट्याबाहेर जरासे

घाबरत घाबरत उड्या मारत
पिल्लू येईल बाहेर जरा
पंख हलवत छोटुकले ते

हास्य कविता.....

Submitted by मी मधुरा on 8 December, 2013 - 11:07

तुझ्याशिवाय मला
करमतच नाही गडे
जरी सारखा कडेला
टीव्ही बडबडे

तू गेल्यापासून गिरवतोय
स्वयंपाकाचे धडे
कांदा, बटाटा मधेच
उगा कारलं कडमडे

दारी पडती जेव्हा
कचऱ्यांचे सडे,
तुझी आठवण
मजला घालते साकडे

उघडतो कपाट जेव्हा
पडती खाली कपडे
घर आवरून आवरून
झालेत हातपाय वाकडे

तुझी आठवण येते जेव्हा
तांदळात निघती खडे
अन कांदा चिरताना
नकळत येवू लागते रडे

ये परतुनी तुला पाहुनी
मन आकाशी उडे
कॅलेंडरवर मीही मोजतो
रोज रोज आकडे

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन