काव्यलेखन

मातीमधूनी तूही उरावे..........

Submitted by किरण कुमार on 16 December, 2013 - 05:17

न संपलेचि शब्द कधी, न कंपलीही स्पंदने
ना अंत अनंताचा कधी, न बांधलेली बंधने

गीत ते तुझेच मी, ऐकले जे तुझ्यासवे
सांग मजसाठी का,अर्थ जसे होते नवे

मी न कधी रंगलो,रंगहीन विश्वापरी
धावलोही न कधी,आठवांच्या अश्वावरी

गुढ कोणते अनामिक मांडलेल्या भांडणांचे
जरा मिळाले कारण ते तारुण्याला सांडण्याचे

फिके जाहले रंग आता, प्रारब्धाच्या वेलीवरचे
नको दाखवू ओघळ तू भंग होउनी गालावरचे

आता वाटे वाट सोडूनी, माझ्यासंगे तूही झूरावे
मातीचा तो गंध घेवूनी, मातीमधूनी तू ही उरावे

प्रश्न

Submitted by UlhasBhide on 16 December, 2013 - 03:27

प्रश्न

प्रश्न नसती कूट इतके, क्लिष्ट जितकी उत्तरे
सोडवीण्याऐवजी सोडून द्यावे हे बरे

तू तिथे मी, मी तिथे तू.... साथ जन्माची तरी
योजने चालूनही का कापली ना अंतरे ?

आरत्या, उपचार, पूजा नित्य घडती राउळी
पाजळूनी दीपही का काजळावी अंतरे ?

मायभूमीच्या नशीबी का अशी स्थित्यंतरे ?
विकृतीने टांगलेली संस्कृतीची लक्तरे

एक अंतर, दोन कप्पे…. त्यांत ना एकात्मता
सूर त्यांचे वेगळे, का वेगळाले अंतरे ?

क्लांत मन होता जरासे शांत पहुडू पाहते
त्याचवेळी जागती का आठवांचे कोपरे ?

का नुरे सौहार्द ? का एकात्मतेची वानवा ?
ना शहर, ना गाव..... उरली चार भिंतींची घरे

नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)

Submitted by विदेश on 16 December, 2013 - 02:17

( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...)

नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव
उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ |

कुणी आपटे 'तो' फरशीवर
कुणा वाटते फुटे भिंतीवर
फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१|

'काळ' मम मुखी लाडू घरचा
जबडा न कळा सहतो वरचा
हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२|

जितुके लाडू तितुकी नावे
हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे
मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव .. |३|
.

शब्दखुणा: 

झाले गेले पुसले आहे

Submitted by जयदीप. on 16 December, 2013 - 01:53

झाले गेले पुसले आहे
माझे मी पण सरले आहे

माझे येणे नक्की नव्हते
माझे जाणे ठरले आहे

थोडे पटते, थोडे सलते
आता जगणे कळले आहे

नशीब पिळते तेव्हा कळते
कोणी कितपत मुरले आहे

कुणास वाटे कल्पित सारे
लिहितो मी जे घडले आहे

नकोस काढू खपली आता
मी जखमांना भरले आहे

आलेख

Submitted by अज्ञात on 16 December, 2013 - 01:00

अक्षर अक्षर ओघळताना झुळझुळणारे शब्द कवीता
हृदयाचा आकार मनातील सुप्त सुकोमल भाव कवीता
आशय गर्भित गूढ कथानक विश्लेषक तळ ठाव कवीता
कळणारी न कळणारीही अंतरातली धाव कवीता

कोण कुणाचा कधी न होता होता नव्हता डाव कवीता
आस जनाची कणव जगाची गाभार्‍यातील घाव कवीता
मेघजळातिल गुदमरलेल्या सहवासाची हाव कवीता
विलय पावलेल्या पर्वातील हळवा क्षणगुंजारव कविता

सखी सोयरी जन्म तारिणी दु:ख हारिणी सरिता कविता
दाहक पावक श्रावक वाहक बखर जन्म जन्मांची कविता
आले गेले मुक्त जाहले मुक्त मौक्तिकांचीही कविता
एकांतातील एकांताचा, द्वैताचा आलेख कवीता

गज़ल - प्यालो नसेन आज मी (बदलून)

Submitted by शरद on 15 December, 2013 - 23:39

धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे! धागा संपादित केला आहे!

जगणं...एक देहहोम.....!

Submitted by राजीव मासरूळकर on 15 December, 2013 - 21:34

जगणं . . . . . . . . . . . !

जगणं
वटवाघळासारखं
उलटं लटकून ,
सोडून गेलेल्या
पिलांसाठी
चित्कारत भटकून,
दशदिशांचा वेध घेत
आंधळ्यासारखं
उडणं . . . . . . .

जगणं . . . . . . . !

जगणं
गटारातल्या अळ्यांसारखं
वळवळत,
अंधारवाटा चिवडत,
सगळा दुर्गँध पोटात घेऊन
वेश्येसारखं
कळवळत
सडणं . . . . . . .

जगणं . . . . . . . !

जगणं
बैल होऊन
ओटीपोटी
चिकटलेले गोचिड
कुरवाळत,
चिमूटभर अनुभव,
मुठभर पत्रावळ्यांच्या
बुजगावण्यांसमोर
लाळ गाळत
रांगणं . . . . . . .

जगणं . . . . . . !

जगणं
आपल्याच माणसांची
पोटं तुडवून,
छात्या बडवून,

भास

Submitted by जयदीप. on 15 December, 2013 - 13:12

का मला मी शोधण्याचा ध्यास होतो?
जिंकल्यावर हारल्याचा भास होतो...

प्यायलो कोळून माझ्या आसवांना
वेदनांना आज माझा त्रास होतो

पोचलो पोचायचे होते जिथे मी..
का मला मी पोचल्याचा भास होतो?

वेदनांना संपताना पाहिले मी
संपण्याला गर्व थोडा बास होतो

टाळतो उल्लेख आता मी चुकांचे
मी तसा माझ्या चुकांचा खास होतो

तू मला नेलेस माझ्यातून आता
मीच माझी शेवटीची आस होतो..

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 14 December, 2013 - 18:32

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे

''खंबीर''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 14 December, 2013 - 03:24

आसवांना रोखण्याचा धीर नाही
एवढा मी शूर नाही ,वीर नाही

सौख्य नाचू लागते वेड्याप्रमाणे
दु:ख म्हणजे ठार वेडापीर नाही

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही

निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही

वेदना हसतात हल्ली खदखदूनी
हासणे ''कैलास''चे गंभीर नाही

--डॉ.कैलास गायकवाड

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन