काव्यलेखन

मनालि

Submitted by मण - मानसी on 18 February, 2014 - 05:56

तुला जायचे होते तु गेलिस,
तुला जायचे होते तु गेलिस,
मला गमवयचे होते मि गमवले,
तुला जायचे होते तु गेलिस,
मला गमवयचे होते मि गमवले,
फरक एव्डाच कि तु,
तुझ्य आयुश्यतला एक क्शन गमावलस,
आनि मि एका क्शनात सारे आयुश्यच गमावले!

शब्दखुणा: 

मनालि

Submitted by मण - मानसी on 18 February, 2014 - 05:56

तुला जायचे होते तु गेलिस,
तुला जायचे होते तु गेलिस,
मला गमवयचे होते मि गमवले,
तुला जायचे होते तु गेलिस,
मला गमवयचे होते मि गमवले,
फरक एव्डाच कि तु,
तुझ्य आयुश्यतला एक क्शन गमावलस,
आनि मि एका क्शनात सारे आयुश्यच गमावले!

शब्दखुणा: 

खळखळ आली संपत माझी

Submitted by जयदीप. on 18 February, 2014 - 04:26

खळखळ आली संपत माझी
खोली आहे वाढत माझी

एकलकोंड्या रस्त्यावरती
होते आहे सोबत माझी

मी कोणाशी भांडत नाही
माझ्यापाशी हरकत माझी

मोजत बसलो रोज तरीही
'वाढत' नाही ऎपत माझी

विकलो गेलो नाही तेव्हा
ठरली नव्हती किंमत माझी

मिळतो आहे मान मरातब
'ओळख' आहे संगत माझी

जयदीप

अपूर्ण आयुष्यगान.. (अजून दोन शेर)

Submitted by रसप on 18 February, 2014 - 02:18

तुझा कळस आकाश असो, मला एक चौथरा हवा
जिथे तुझी सावली वसे, तिथे मला आसरा हवा

तुझ्या कलाने हळूहळू जगायचे मी शिकीनही
जमून येईल तोवरी, जगायला कोपरा हवा

जुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी
तसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा

जुळून आल्या सुरावटी, जमून आलेत शब्दही
अपूर्ण आयुष्यगान हे, तुझा एक अंतरा हवा

कसे टाळलेस तू प्रिये मला पाहणे शिकव जरा
नको चेहरा जुना मला नवा नवा चेहरा हवा

जराजरासे जगायला, जराजरासे मरायचे
अशी व्यथा अनुभवायला 'शहर' नाम पिंजरा हवा

नवीन क्षितिजांस शोधण्या उडत रहा तू पुढे पुढे
तुझी स्वत:ची अशी नसे कुठेचही पाखरा 'हवा'

धग

Submitted by बाळ पाटील on 18 February, 2014 - 01:37

विजेरि तारेवर
गारवेल तगला आहे
इथला प्रत्येक जीव
आतून धगला आहे

काळोखाच्या राखेत
दडलेले जग आहे
वरवरची उब पण
आतून धग आहे

निर्मोही

Submitted by अज्ञात on 17 February, 2014 - 08:41

अंशात तुझ्या वसलो मीही
वाहिले हवे ते निर्मोही
समिधा सुखदा अक्षत ग्वाही
आतंक मनी कुठला नाही

मन अबोलसे स्वर विकलांगी
प्रतिमा न कधीही एकांगी
ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी
हृदयात वलय लय शतरंगी

लाटेस काठ हळवा म्हणुनी
खेळते किनाऱ्यावर पाणी
भरती ओहटते ओघळुनि
डोहात माणकांच्या खाणी

………अज्ञात

पाडलेली कविता (?)

Submitted by UlhasBhide on 17 February, 2014 - 01:21

पाडलेली कविता (?)
(थोडी गंमत)

गेल्या काही दिवसांत फेबुवर काही रचना वाचनात आल्या.
त्यावरून कविता लिहिणे कित्ती सोप्पे आहे असे वाटायला लागले.
या अशा वाटण्यातूनच ही पाडलेली कविता.

(अशा कवितांना शेकडो 'Like' आणि ’सुंदर’, ’अप्रतिम’, ’क्लास अपार्ट’ अशा स्वरूपाचे प्रतिसाद फ़ेबुवर मिळतात.
माबोकरांनी प्रतिसाद देताना आखडता हात घेऊ नये इतकीच माफक अपेक्षा Wink Proud )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

का असे शिरजोर आहे ?
हे कुणाचे पोर आहे ?

बहरल्या झाडावरी का
आंबलेले बोर आहे ?

स्त्रीजन्म (मंदारमाला वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 16 February, 2014 - 21:51

ओठावरी दुःख माझ्या जरीही तरी हासते मी सदा सर्वदा,
स्त्रीजात माझी म्हणोनी जगाने मला टोकले व्यर्थही कैकदा....
संसार माथ्यावरी ठोकलेला उरी व्याप आहे मनाचाच का
गोठ्यात बांधावया आणलेली जशी गाय भोळी तशी मीच का.....

जन्मास यावे कशाला उगा मी इथे सुख नाही कुठेही मला,
बापास आईस ओझे जसे मी उपेक्षा नशीबी मिळावी मला...
झाकायचे अंग मी रक्षणाला तनाच्या लिलावी स्वतः बैसते,
सौंदर्य ठेवून दारात सारे प्रतिक्षा परिक्षा भली मांडते....

कौमार्य माहेरवासात देते विवाहात प्रत्यार्पणी ठाकते,
घासून देहास मातीवरी मी कुशीतील सार्‍या कळा सोसते....
ज्याच्यासवे घेतले सात फ़ेरे मला तो रिपूही कधी वाटतो,

स्त्रीजन्म (मंदारमाला वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 16 February, 2014 - 21:50

ओठावरी दुःख माझ्या जरीही तरी हासते मी सदा सर्वदा,
स्त्रीजात माझी म्हणोनी जगाने मला टोकले व्यर्थही कैकदा....
संसार माथ्यावरी ठोकलेला उरी व्याप आहे मनाचाच का
गोठ्यात बांधावया आणलेली जशी गाय भोळी तशी मीच का.....

जन्मास यावे कशाला उगा मी इथे सुख नाही कुठेही मला,
बापास आईस ओझे जसे मी उपेक्षा नशीबी मिळावी मला...
झाकायचे अंग मी रक्षणाला तनाच्या लिलावी स्वतः बैसते,
सौंदर्य ठेवून दारात सारे प्रतिक्षा परिक्षा भली मांडते....

कौमार्य माहेरवासात देते विवाहात प्रत्यार्पणी ठाकते,
घासून देहास मातीवरी मी कुशीतील सार्‍या कळा सोसते....
ज्याच्यासवे घेतले सात फ़ेरे मला तो रिपूही कधी वाटतो,

आठवांची तार आली

Submitted by जयदीप. on 16 February, 2014 - 20:36

आठवांची तार आली
अन् हवाही गार आली

फार उडल्या आज ठिणग्या
पण जिभेला धार आली

ना कुणाला सांगते 'पण'
सोसुनी ती वार आली

मी जरासा शांत पडलो
न्यावयाला घार आली

तू दिलेली हाक आता
काळजाच्या पार आली

आठवण तर येत असते
आसवेही फार आली

जयदीप

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन