काव्यलेखन

अंतरे...

Submitted by मुग्धमानसी on 25 February, 2014 - 04:57

ही अंतरेच सारी माझ्या तुझ्यातली पण
व्यापून अंतरांना उरतेच तू नि मीपण!

मी अंतरात माझ्या मोजीत बैसते रे
पाऊल एकटीचे मापीत बैसते रे
मी पोचते जरा अन् तू पावलात एका
जातोस लंघूनी हे मम भोवतीचे कुंपण...

तू बोललास माझ्या कानी उगाच काही
नसतेच ऐकले तर असते अजुन प्रवाही
पण थबकले तिथे मी, तेथेच थांबले मी
आता वहायचे तर, आहे कुठे ते जलपण?

ती वेळ योग्य होती, संधी सुयोग्य होती
आले उधाणूनी मी, तू वेचलेस मोती...
मोत्यांस वेचताना भिजलास ना जरासा?
ते तेवढेच... बाकी सारेच कोरडेपण!

आता उजाडताना मी रोज साद देते
माझ्यातल्या तुला मी हटकून मात देते
सगळ्याच अंतरांना अलवार जोडणारा

शब्दखुणा: 

गझल- माणूसकी मनाची तेथून दूर टळते

Submitted by विदेश on 25 February, 2014 - 03:17

" माणूसकी मनाची तेथून दूर टळते -"

दु:खात त्यास पाहुन काळीज आत जळते
निर्ढावल्या मनाचा ना काळजास कळते

ती मेनका न येथे ना मी कुणी ऋषीही
भीती मनास माझ्या का नेहमीच छळते

समजावतो मनाला अपुले न येथ कोणी
आशा परी मनाची सगळीकडेच पळते

झाकावयास अंगा घे आवरून पदरा
जाईल तोल माझा मन त्याकडेच वळते

दंगे समोर होता बघती निवांत सारे
माणूसकी मनाची तेथून दूर टळते

.

शब्दखुणा: 

स्वप्न आणि परिस्थिती

Submitted by मंदार शिंदे on 24 February, 2014 - 10:22

आजकाल कोरडे-कोरडे दिसतात ओठ तुझे
कधीकाळी त्यांनीच ऐकवली होती
स्वप्नं मुलायम...
परिस्थितीवर कधीपासून बोलू लागलीस?
आणि का?
ती स्वप्नंच हवीहवीशी वाटत होती
ही परिस्थिती नेहमीच नकोशी...
पण स्वप्नं बदलता येतात, परिस्थिती नाही!
तूच म्हणालीस.. कोरड्या ओठांनी.
पण लक्षात ठेव -
तुझे ओठ परत मुलायम व्हावेत
हे माझं स्वप्न आहे,
आणि माझी स्वप्नं अपूर्ण राहत नाहीत
ही परिस्थिती!

... अन्नपूर्णा ...

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 24 February, 2014 - 08:15

अगदी सहजतेन
जेव्हा कुणी देते फेकून
तयार सुंदर अन्न
मुले खात नाही म्हणून
वा जास्त झाले म्हणून
माझ्या अंगावर येतो शहारा
अस्वस्थ होते मन
कुपोषितांच्या झुंडी
धावतात मनातून
आक्रंदत बुभूक्षितागत
मोठमोठ्याने ओरडत
अन्न अन्न अन्न
संस्कारात जपलेली
अन्नपूर्णा अन
भेदरून उभी असते
कचराकुंडीचा काठ
घट्ट हातात धरून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

प्रांत/गाव: 

जगणे कठीण होता..

Submitted by स्वाकु on 24 February, 2014 - 01:33

जगणे कठीण होता माझ्याच प्रेषिताचे
गेले चुकून ठोके माझ्याच काळजाचे

मी एकटाच होतो कोणी न ओळखीचे
सांगू कसा कुणाला ऐकू अता कुणाचे

नाहीस तू तरीही होतात भास वेडे
हे कोणते कवडसे माझ्याच या मनाचे

मरणे अखेर माझे वाटे हवेहवेसे
पण टाळता न आले मज खेळ जीवनाचे

झिडकारले जगाला सोडून श्वास माझे
केले मला हवे ते ऐकून त्या जगाचे
                          ---

शब्दखुणा: 

सावध...

Submitted by मी मुक्ता.. on 24 February, 2014 - 00:56

इतरांच्या मनाचा विचारच न करणारी
तू नसशील आत्ममग्न स्वार्थी...
आणि तू आताही नाहीयेस,
त्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..
तुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..
पण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..?
विदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,
सावरायची सवडही न देता..
म्हणून म्हणतेय,
सावध हो...
कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ ..
काहीही हो, पण नको होऊ,
कोण्या लेखकाची कल्पना..
कोण्या कवीची कविता..

शब्दखुणा: 

साळुंकी

Submitted by संतोष वाटपाडे on 23 February, 2014 - 21:36

का साळुंकी दारावरती ओरडते ही मला ठाव ना,
का थांबावी डोळ्यावरती आज अनावर भावना...

माहेराचे कुणी अजुनही आले नाही फ़ार दिसाचे,
ए आभाळा आता एकदा आईचा चेहरा दाव ना....

लागे उचकी ठसक्यासरशी सय कुणाची येतसे,
दादा पडला गुडघ्यावरती हळद त्याला लाव ना....

रोज दिसे या झाडावरती घरटे भरले कबुतरांचे,
एकटीच मी दुर कशी मज दिसेच माझा गाव ना...

घरात सारी इथे असूनही नातीमाती आपुलकीही,
तरी उरातुन आजही पुसले माहेराचे नाव ना.....

सांज वितळता माळावरती बसुन रहावे असे वाटते,
वाट जरी ती रोजंच दिसते सरली माझी हाव ना....

कधी कावळा परसामध्ये ओरडला की धावतेच मी,

उध्वस्त

Submitted by जयदीप. on 23 February, 2014 - 06:59

कारणांचे गाव मी उध्वस्त केले
वादळांचे डाव मी उध्वस्त केले

वागताना वागलो माझ्या मनाने
अन् स्वत:चे नाव मी उध्वस्त केले

आठवांची पुस्तके मी बंद केली
आठवांचे ठाव मी उध्वस्त केले

रोज आले मुखवटे लाऊन ते पण
आज त्यांचे आव मी उध्वस्त केले

वादळे घेऊन ते आले तरीही
आठवांचे ताव मी उध्वस्त केले

जयदीप

इच्छा आहे तिथे रस्ता आहे

Submitted by जयदीप. on 22 February, 2014 - 01:25

त्यांचे आपापले धोरण आहे
काच कुणी अन् कुणी दर्पण आहे

'घेण्या'वरती तसे असते सारे
स्वच्छंद कुणी, कुणा दडपण आहे

इच्छा आहे तिथे रस्ता आहे
इच्छा नाही तिथे कारण आहे

सगळ्यांशीच पटते आहे माझे
माझे माझ्यामधे का 'रण' आहे?

नाही आहे मला माझी चिंता
माझ्यावरती तुझी राखण आहे..

रोज बहरतो तुझा प्राजक्त अता
आठवणींचे जिथे अंगण आहे!

जयदीप

वेगळाली

Submitted by अमेय२८०८०७ on 21 February, 2014 - 22:44

दिसते त्याहून खोल काही चालते भोवताली
स्तरा-स्तरांतील जीवनाची गूढता वेगळाली

बरा भावनेला पुरता पारखा होतो कलंदर
संग घडला तुझा नाहक पापणीला ओल आली

फोल क्षणाचे हसणे माझे दुभंगून मालवते
वाहुनही अमर म्हणवती तुझे अश्रू भाग्यशाली

काही बेभान खगांना केवळ उडायचे नसते
पंखांवरुन उजळत न्यायच्या असतात युग-मशाली

तशी सावरुन आता ती जगण्याला रुळते आहे
कधीमधी आक्रोशुन रडते पाहत कमरेखाली 

-- अमेय

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन