काव्यलेखन

गझले चिकार झाली...

Submitted by किरण कुमार on 13 March, 2014 - 09:34

शिस्तीत चालणारी पोरे टूकार झाली
कवितेच्या चालीमध्ये गझले चिकार झाली...

भयभीत श्वान जेथे समजती शेर आता
घर राखण्यातही सारी काम चूकार झाली...

कोरड्याच अर्थपंक्ति जे फेकित चाललेले
कोणा कसे कळेना नुसती कतार झाली.........

मज लिहावे वाटले गझल जेव्हा जेव्हा
सूंदरशी कविताही का पान उतार झाली..............

मी नाव कोरतो मग उगाच अंतिम शेरी
एवढी माझी प्रतिमा कुठे पसार झाली........

जो तो मला म्हणाला रस्ता कठिण आहे
कि माझीच ती संधी नियमा नुसार झाली......

बाळाची शर्यत

Submitted by विदेश on 13 March, 2014 - 08:17

'

एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .

तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .

पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .

सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .

नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.

शब्दखुणा: 

II सजन माझा II

Submitted by PANDURANG WAGHAMODE on 13 March, 2014 - 07:36

II सजन माझा II

सांज बाई
बुडुनी गेली
स्वयंपाक सारा
करुनी झाला

गेला कुठे
सजन माझा?
रोज येतो
नाही आला .

वाट पाहत
दारात उभी
कधी येतो?
चिंता कपाळी.

कुत्राही बाई
नाही झेपावला
निपचित दारात
पडून राहिला.

काळीज माझं
चिरू लागलं
काय केल्या
मन गळालं

कधी आला
कुठे कळालं
पदरात रडू
गेली झोपाई.

कुशीत शिरुनी
आसवे पुसाली
जाग नाही
आली सकाळी …।

पांडुरंग वाघमोडे (जत जि.सांगली)

शब्दखुणा: 

पाहिले चालून त्याच्या सोबतीने

Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2014 - 03:41

पाहिले चालून त्याच्या सोबतीने
मात्र केला घात काळाच्या गतीने

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

टाळतो सल्ले स्वतःचे मीच आता
बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने

वाटले नव्हते असे उलटेल सारे
मी तुला जे जे म्हणालो गंमतीने

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने

-'बेफिकीर'!

आई तू गेल्यावरच

Submitted by PANDURANG WAGHAMODE on 13 March, 2014 - 02:34

आई तू गेल्यावरच का गं हे सगळं व्हावं,
आत्ता बालपणीच्या मनाला बहर यावा -
नि त्यावेळचं क्रोधी मन खाक व्हावं.

आई का गं माझ्या उदासवृत्तीतच उमटूनि दिसती ठसे,
सांग तुझ्या हृदयरुपी मनात गं कित्ती मने ?

सांग आता आई तुजविना कसे वाटेल गं मला हायसे,
मग तुजविना या जीवावर उदार का व्हायचे ?

आई कधीच न लागणार मजला संसाराची भूक,
असून गं नसल्यापारी तुझ्या चरणात माझे मन मूक .

त्यावेळचं माझं मलाच गोंजारणारं मन का गं दूर जावं
मग तू नसल्यापारी या जीवाची घालमेल का गं व्हावी .

आई हृदयात दगदग फार मनाची,तुझ्याकडे धाव घ्यायची
मग ती सानुली असो वा छकुला तिच्या आईकडेच सोडून द्यायची .

सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची (तरही)

Submitted by जयदीप. on 12 March, 2014 - 23:03

माझ्या कुवतीप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे..वैभवजी.. तुमच्या या सुंदर मिसर्याला शोभतील इतके छान शेर मला नाही जमले आहेत. त्यासाठी क्षमस्व. पण मी प्रयत्न करतच असतो.

या सुंदर ओळीसाठी पुन्हा एकदा आभारी आहे.

पुन्हा होतील आता लक्तरे त्यांच्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची

हजेरीखोर असणे आजही जमते जमान्याला
कशाला ऎकशी तू सांत्वने खोट्या विचारांची

पुन्हा संपून गेली उत्तरे माझ्या तुझ्यासाठी...
पुन्हा राहून गेली पूर्तता ताज्या विचारांची

तुला लपवून आहे ठेवले माझ्या मनामध्ये
तुला लागू नये आता नजर परक्या विचारांची

शिडे सांभाळ आता वादळे आली तुझ्यापाशी

कोकणात आहे मी

Submitted by वैवकु रीटर्न्स on 12 March, 2014 - 09:38

पापण्यांमधे लपल्या श्रावणात आहे मी
आजही तुझ्या घरच्या अंगणात आहे मी

मी मना तुला कुठले कर्ज मिळवुनी देवू
ह्या भिकार श्वासांच्या तारणात आहे मी

आरश्या तुला माझी साक्ष द्यायची आहे
की तिच्याच हातांच्या कंकणात आहे मी

मी पुन्हा पुन्हा त्याचा शोध घेत का जातो
शोध घेत जाण्याच्या कारणात आहे मी

गुटगुटीत दैवाला पाहुनी मला कळले
ते अश्यामुळे आहे ..शोषणात आहे मी

जन्म तो बरा गेला चर्मकार होतो मी
आज हा कशासाठी ब्राम्हणात आहे मी

केव्हढी जुनी व्याधी , पाय ..पण बरा केला !
त्या कुडाळशास्त्र्यांच्या ह्या ऋणात आहे मी

काल मी कुठे होतो मी उद्या कुठे आहे

काजू चघळत जातो (मुक्तविडंबन)

Submitted by A M I T on 12 March, 2014 - 06:53

डॉ. कैलासरावांच्या दारूवर आमचा उतारा.

कातरवेळी अंग आंबते... 'तिकडे' नकळत जातो
नुसती दारू घसा जाळते...काजू चघळत जातो

कोण प्रकारची दारू सांगा तीव्र एवढी आहे?
वेड लागावे तसाच हल्ली मीही बरळत जातो

दुर्गंध येतो तोंडाला हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?

फुटेल हे कपाळसुद्धा काळ्या दगडावरती
सावरणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

किती जरी तू चुकवशील बेवड्या वाट अड्ड्याची
बार दिसताक्षणी मनीचा इरादा बदलत जातो

* * *

काली ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 March, 2014 - 06:22

विशाल डोळ्यात क्रुद्ध
वडवानळ अंगार
रूधीर स्नान झालेली
हाती नग्न तलवार |
विश्व सारे थरारले
आधार डळमळले
नर पशूच्या शिरांनी
रण अवघे व्यापले |
रक्त हेच वस्त्र देही
रक्ताचीच आभूषणे
रक्ताचा शृंगार तिचा
रक्त ओठी प्यायलेले |
कृष्णकांती कालरात्री
रक्तबीज जिव्हेवरी
तीक्ष्ण घोर शस्त्र हाती
बेफान तांडव करी |
समोर ठाकले तया
स्वाहा करीत चालली
क्रोध त्वेष चीड देही
वीज होवून वादळी |
दुष्टांवरी बरसली
देह फाडीत सगळी
वधेविन त्यांस गती
न अन्य म्हणे कुठली |
खदाखदा हसे उच्च
रक्तमद्य घेत घोट
नर सुरसुरा उर
भये होते धडाडत |
ये ग माय माझ्या देशी
पुन्हा अशी अघोरशी

शब्दखुणा: 

हळवा सूर आहे

Submitted by निशिकांत on 12 March, 2014 - 02:12

सोडलेला गाव माझा दूर आहे
लागली हळव्या मना हुरहूर आहे

टेकड्या शहरातल्या हरवून गेल्या
लॉन टिचभर वाटते भरपूर आहे

झोपडीतुन भूक जळते; गोपुरी पण
नांदतो का सोनियाचा धूर आहे?

धूप, चंदन. तेल, काजळ बंद झाले
राखण्या सौंदर्य डव, संतूर आहे

जाहिराती केवढ्या! लपवावयाला
वास्तवाचे चित्र जे भेसूर आहे

वाटते नेत्यांस, आहे शांत जनता !
अंतरी आक्रोशते काहूर आहे

"टाक मत झोळीत" म्हणती सर्व नेते
भीक ग्रहणी मागणे मंजूर आहे

लाचखोरी अश्वमेधाला निघाली
अश्व त्यांचा दौडतो चौखूर आहे

गीत गा "निशिकांत" अंती ईश्वराचे
लागलेला आर्त हळवा सूर आहे

निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन