काव्यलेखन

मित्राची गोष्ट

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 October, 2012 - 14:40

जुना मित्र भेटला भर भरून बोलला
जुन्या आठवणींना मिळाला उजाळा ..
इतिहासाच्या बाईंचे राजकीय विचार
जीवशास्त्राच्या बाईंनी दिलेला मार ..
परफेक्ट नोट्स देणारे भौतिकचे सर
न कळे कसे झालेले आमचे हेडमास्तर ..
पुन्हा जणू सारे झाले होते गोळा
काळ जणू होता हळूच मागे सरकला ..
मित्रांच्या आठवणी परीक्षेच्या आठवणी
मधल्या सुट्टीत गाईलेली गाणी ..
मग हलकेच तो म्हणाला ती मेघा कुठे असते रे ?
सहज आठवले म्हणून विचारले रे !
त्या वेळी त्याचा आवाज झाला होता वेगळा
डोळ्याच्या कोपऱ्यात भाव होता भिजला ..
त्या क्षणी तो नव्हता जणू या जगात
खोल खोल आत होता काही पाहत..
पाहता पाहता लगेचच सावरला

कुणी नसणार आई....

Submitted by वैवकु on 16 October, 2012 - 12:33

कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला

'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्‍या साकारणीला

कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला

शब्दखुणा: 

'शिवराय"

Submitted by अनिल तापकीर on 16 October, 2012 - 12:25

अवनी वरती नृप जाहले, अगणित आजवरी ।
परी शिवरायांसम नाही जाहला कोणी नृपकेसरी ॥

अगणित आले अगणित गेले नसे काही गणती ।
अमर जाहले शिवराय केली अघटित ऐसी कृती ॥

कड्या कपारी फिरूनी एक एक सवंगडी शोधीला ।
अमोघ वाणीने त्यांच्यातील मराठी बाणा जागविला ॥

शुन्यातूनी विश्व निर्मिले दिली झुंजार कडवी झुंज ।
टक्कर देऊनी महासाम्राजांशी उतरविला दुष्टांचा माज ॥

रयतेचा वाली गरिबांचा राजा सज्जनांचा कैवारी ।
ऐसी ख्याती शिवरायांची दुमदुमते भूवरी ॥

॥जय शिवराय, जय जिजाऊ ॥

काव्य्-नृत्य-नाटिका `अंबा'

Submitted by उमेश वैद्य on 16 October, 2012 - 11:09

ही काव्य-नृत्य-नाटिका असून यात काव्याबरोबच नृत्यांना अतिशय महत्व आहे. या मधील संवाद काव्य रूपात असून ते शास्त्रीय तालांवर म्हणता येतील. पात्रांचा रंगमंचावरील वावर हा संपूर्णपणे नृत्यातच आहे. त्या अनुषंघाने मुद्रा-अभिनयाला सुध्द्दा महत्व आहे. शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ही नृत्यनाटिका बसवता येईल. त्यातील काव्याचा भाग चांगल्या आवाजाच्या पुरूष-स्त्री गायकांकडून म्हणून घ्याव्यात व पात्रे हावभाव करीत असताना पडद्यामागून म्हणावा.

शब्दखुणा: 

मीरा

Submitted by राजेंद्र देवी on 16 October, 2012 - 07:08

मीरा

घेऊन एकतारी
गाते रे मुरारी
प्रेमात तुझ्या हरी
झाले मी निलाजरी

देई विषाचा प्याला
राणा हा संसारी
नाम घेता श्रीहरी
अमृत होई अधरी

मनमोहक रुप तुझे
शेला हा भरजरी
लेऊन धवल वस्त्रे
आळवते मी वैखरी

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

चालला अद्याप श्वासोच्छ्वास आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 October, 2012 - 06:30

गझल
चालला अद्याप श्वासोच्छ्वास आहे!
जीवनाचा और अट्टाहास आहे!!

जाग नाही, झोपही नाही जिवाला;
कोण जाणे, हा कशाचा ध्यास आहे!

गीत गाणा-या गळ्याला ज्ञात नाही....
रेशमी असला तरी, हा फास आहे!

तू इथे आहेस या खात्रीमुळे मी;
घेतला मागून कारावास आहे!

काय मी मृत्यू, तुला सांगू खुशाली;
जीवनाचा जीवघेणा त्रास आहे!

व्हायला नुसत्या इशा-याने शहाणा,
एवढा कोठे मला अदमास आहे!

पाहतो जो जो मला तो, हेच म्हणतो.........
मी जिता आहे खरे? की, भास आहे?

वाळवंटातील माझ्या तूच मृगजळ!
सोबतीला हा तुझा आभास आहे!

आज जी काही कमाई कनवटीला;
ती नका समजू विनासायास आहे!

धुंद होते रातराणी

Submitted by प्राजु on 16 October, 2012 - 02:43

धुंद होते रातराणी चांद जातो मोहरुनी
गूज वारा सांगतो सार्‍या जगाला दर्वळूनी

लावते मी सांजवाती अंगणी माझ्या मनाच्या
स्पंदनी झंकारती तारा नव्याने आठवांच्या
आणि ओठी आगळा मकरंद जातो पाझरूनी
गूज वारा सांगतो सार्‍या जगाला दर्वळूनी..

रोमरोमातून भिनते प्रेम श्वासा सोबतीने
काय झाले कोण फ़िरते, बोलते माझ्या वतीने?
मी अशी स्वप्नात की सत्यात? गेले गोंधळूनी
गूज वारा सांगतो सार्‍या जगाला दर्वळूनी

तू आणि ती

Submitted by shuma on 16 October, 2012 - 02:14

तू काय किंवा तुझी आठवण काय
तुम्ही दोघेही आयुष्यात पुरते मुरलायत माझ्या
एखादं लोणचं मुरावं ना अगदी तस्सं!

विचार न करताही अधुन मधुन
डोकावत असता अनाहूत पणे
आणि संदर्भारहित हिंडत रहाता
माझ्या विचारांच्या वर्दळीत

कुठलंही पान उघडा आठवणींचं
आयुष्याच्या पानापानांतून
जपलेल्या गुलाब पाकळीगत
गळून पडता माझ्या समोर टपकन

आणि मी देखिल वेडी मग
भान हरखून निरखत बसते तुम्हाला
मला समोर दिसत असते फक्त एक
ताजी टवटवीत गुलाबाची पाकळी
न वाळलेली.........

कदाचित अगदी कधीच न वाळणारी....???

शमा

शब्दखुणा: 

तिने केला सुगंधाचा असा अभ्यंग शिडकावा!

Submitted by सतीश देवपूरकर on 15 October, 2012 - 12:32

गझल
तिने केला सुगंधाचा असा अभ्यंग शिडकावा!
जणू काट्यांसही वाटे जरासा गंध उधळावा!!

तिच्या पाऊलस्पर्शाने लकाकू लागली धरणी!
जणू गर्भात धरणीच्या विजेचा लोळ उतरावा!!

तिच्या गज-यामधे बघुनी फुलांच्या ऎवजी तारे;
अरे, तो चंद्रही म्हणतो.....तिचा मुखचंद्र कवळावा!

अशाही चोरपायांनी सरी येतात स्मरणांच्या.....
पडावे ऊन्ह अन् तेव्हा जसा पाऊस बरसावा!

तशी येतील पेलाया अशी मी पाहिली स्वप्ने!
जरी सोशीक मी होतो, कितीदा बेत बिनसावा!!

मला सूर्यास्तही आता पहाटेसारखा वाटे!
जणू रंगात संध्येच्या उषेचा रंग मिसळावा!!

जगावे मोकळे कैसे कळाया लागले मजला....

जातो जेव्हा तुला सोडुनिया दूर....

Submitted by मी मधुरा on 15 October, 2012 - 11:59

जातो जेव्हा तुला सोडुनिया दूर,
भटकते जीवन गाणे विना शब्द विना सूर
आठवणींना तुझ्या जाळतो मी पुन्हा पुन्हा
मग मनात साठतो तयांचाच धूर ....

क्षणोक्षणाला वाढते वेदना विरहाची
वादळ भावनांचे अन विचारांचा पूर ....
लिहावया घेतो पत्र जेव्हा होऊन आतुर ,
शाई आटूनिया जाते हरवतो मजकूर....

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन