काव्यलेखन

हत्तीदादा....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 November, 2012 - 01:40

हत्तीदादा....

हत्तीदादा हत्तीदादा झुलता कित्ती छान
हालतात कसे मोठ्ठे मोठ्ठे सुपाएवढे कान

सोंड वळवळ करते ती कित्ती ती सापासारखी
कुठं बरं ठेऊ हिला शोध्ता का जागा सारखी ?

दात तर तोंडाबाहेर असले बिनकामाचे ?
ब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे ?

पाय ते केवढे मोठ्ठे आहेत नुस्ते खांबासारखे
दिस्ता कसे तुम्ही अगदी काळ्याशार डोंगरासारखे

शेपूट मात्र तुमची ही कित्ती बारीक एवढुशी
भल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी छोटीशी.....

शब्दखुणा: 

मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 1 November, 2012 - 23:17

गझल
मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!
फासावर चढता चढता गुणगुणणे सोपे नाही!!

आजन्म राहिली माझ्या पायात मुलायम बेडी;
रेशीमगाठ प्रेमाची सोडवणे सोपे नाही!

लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा;
आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!

हिंडती चोरपायांनी बगळ्यांच्या नजरा जेथे;
नादात आपल्या तेथे वावरणे सोपे नाही!

आयुष्य वेचले अवघे शिंपले वेचण्यासाठी....
लाखात एकही मोती सापडणे सोपे नाही!

छेडली तार त्याने अन् धडधडू लागली हृदये...
मैफलीस इतक्या सहजी मंतरणे सोपे नाही!

लावली चूड हातांनी, पाहिली राख डोळ्यांनी!
आपलीच स्वप्ने आपण सावडणे सोपे नाही!!

नवनाथ पोथी वाचल्यावर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 November, 2012 - 10:51

नाथाप्रती प्रीती मनात होती
जरी नव्हती वाचली पोथी
कसला गूढ असावा संकेत
नाही उमजत आज मज
वाचला पंथ दडला कथेत
वरील उलटीत रंजक प्रसंग
साधने विन न मिळे ज्ञान
सद्गुरू वाचून न होये सोय
मागील जन्माची असून शिदोरी
या जन्मी परी लागे कष्टावे
इतुके पक्के ठसले मनात
झालो शरणागत नाथापायी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

दोन क्षणांचा प्रवास जीवन...

Submitted by हर्षल_चव्हाण on 1 November, 2012 - 05:56

आपण आपले भले बुरे,
हवे कुणाला हार तुरे?

उभ्या रहिल्या भिंतीना,
प्रेमाचा आधार पुरे...

घरट्यामधले पिलू मोकळे,
आभाळाची कास धरे...

रोख कुणाचा कसा असावा,
कुणी सांगावे; काय बरे?

गोंधळ जगती फार जाहला,
कानी कोण हे गूज करे?

अफलातून ही दुनिया रे,
खोट्याचेही करे खरे...

दोन क्षणांचा प्रवास जीवन,
जगता जगता सहज सरे...

म्हणून जगणे समजून घ्यावे,
सरल्यावरती काय उरे?
------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१/११/१२ - दु. ३.२०)

शब्दखुणा: 

एक वॉचमन एक झाड थोडीशी ये जा

Submitted by बेफ़िकीर on 1 November, 2012 - 03:08

एक वॉचमन एक झाड थोडीशी ये जा
दुपार झेलत उभी आमची रुक्ष इमारत
आसुसलेला सजीव मी निर्जीव व्हायला
शुष्क अर्भकाच्या ओठांना कविता पाजत

सध्या या सृष्टीला ते म्हणतात संस्कृती
मी तर याच्यापेक्षा प्रदीर्घ टिकलो आहे
कधी इमारत कधी वॉचमन कधी प्रकृती
जो मी नाही तो होणे मी शिकलो आहे

रुपांतराच्या भीतीला कवितेचा कठडा
डोळे मिटुनी दूध पिणारी मांजर ठरते
सवाल हा नाही की शिंपी कोण असावा
सवाल हा की काय कशाचे अस्तर ठरते

बडबडगीत...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 02:12

बडबडगीत...

एक छान चिऊताई
उड्या मारत दाणे खाई
चिवचिवाट उगा करत
अंगणभर नाचत जाई

एक कावळा काळा काळा
हाक मारी माझ्या बाळा
काव काव उठा उठा
खाऊ लौकर आणा मला

एक पिल्लू गोजिरवाणं
भू भूचं वेडं सोनं
शेपूट हल्वून करी ऊं ऊं
किती थांबू आणा खाऊ

म्याँव म्याँव मनीमाऊ
जर्रा झोप मोडा पाहू
वास येता खासम् खास
उड्या मारी मासेखाऊ

शब्दखुणा: 

कविता(!)

Submitted by श्यामली on 1 November, 2012 - 01:47

चंद्र कवितेतला
कोजागिरीही कवितेतलीच
आकाश तेही अर्थात तिथलंच
मग तिथे अवेळी येणारा पाऊस,
सगळ काही विस्कटून टाकणारी वादळं
त्यात फरफटत जाणारे आपण
शब्दही, आणि अर्थही तिथलेच
सगळ्या भावना, सगळी दु:ख
सगळा आनंद तिथलाच; असं जरी असलं आणि
आयुष्य म्हणजे एक कविताच असं म्हटल
तरी एक कविता म्हणजे सगळं आयुष्य नसतं
नाही का?
~~~

रान...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 00:16

रान...

रान मनात वसलं
पान पान तरारलं
रंग हिरवा लेऊन
सारं काळीज दाटलं

काळी भुई होती साधी
जरा बरड बरड
थेंब येता अवकाळी
कोंब उगवलं ग्वाड

निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून

उन्हा वार्‍याचा तो जोर
देतो जोम जगण्यास
हिरवाई जपताना
उगा मानावा का त्रास....

शब्दखुणा: 

ही तुझ्या कृपेची किमया...लाभली मुक्याला वाणी!

Submitted by सतीश देवपूरकर on 31 October, 2012 - 22:16

गझल
ही तुझ्या कृपेची किमया...लाभली मुक्याला वाणी!
जी दिलीस दु:खे मजला त्यांचीच जाहली गाणी!!

ना तरंग सुखदु:खांचे, ना ओढ कुठे झरण्याची....
दुनियेच्या डोहामधले मी म्हणजे निश्चल पाणी!

दरवळू लागली आहे श्वासात कस्तुरी माझ्या;
ही तुझ्याच अस्तित्वाची समजावी काय निशाणी?

बघ तुझी लोचने सुद्धा हिंदळू लागली आता...
बहुतेक सारखी आहे दोघांची प्रेमकहाणी!

वैराण वाटते मजला ही वर्दळ शहरामधली;
वाराही छेडत आहे तळमळती एक विराणी!

उधळीत राहिलो नुसता मी रंगगंध हातांनी;
व्यवहार समजला नाही, ना कळली देणीघेणी!

का स्तुतीमुळे हुरळू मी? का निंदेने कचरू मी?

"वेडाबाई"

Submitted by -शाम on 31 October, 2012 - 11:50

उरी अमृताचा पान्हा गोड गळ्यात अंगाई
देवा साऱ्यांना मिळू दे माझ्या आईवानी आई....|

वितभर पोटासाठी जायी तुडवीत रान
मोळी घेऊन यायची दरी डोंगरामधून
गंध तापल्या रानाचा तिच्या घामातून वाही.....|

दंड घातल्या साडीचा घेई नेटका पदर
लावी रुपया एवढे कुंकू गोऱ्या भाळावर
कधी सोन्यानाण्यासाठी डोळा पाणावला नाही...|

धान उसनं-पासनं अर्ध्याराती दळायची
नावं घेत लेकरांची ओवी ओवी घुमायची
घास भरवी पिलांना एक चिऊ वेडाबाई...........|

नाही कधी जुमानलं तिने दुखणं-खुपणं
घरट्याच्या सुखासाठी दिलं उधळून जिनं
सोसलेल्या दुःखापोटी बोल कडू झाला नाही.....|
.
.
.

जन्मोजन्मी तुझ्यासाठी कुस तुझीच मागेन

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन