काव्यलेखन

तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !

Submitted by रसप on 2 November, 2012 - 02:56

तुझ्या प्रत्येक स्वप्नाला दिली मी मूठमाती
रिकामे भाळ घेउन धाय मोकलतात राती

कुणासाठी कुणी मेले तरीही नाव नसते
पतंगाचे दिव्यावर प्रेम, जळती तेल-वाती !

स्वत:चे स्वप्न आवडते मला तुकड्यांत बघणे
म्हणुन आलो तिच्या लग्नात मी वेडा वराती !

कुणी मुलगा, कुणी दासी, कुणी तर प्रेयसीही
तुझ्या सगळ्याच भक्तांची तुझ्याशी भिन्न नाती !

नको तू भेदभावाला 'जितू' मानूस कुठल्या
तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !

....रसप....
१ नोव्हेंबर २०१२

http://www.ranjeetparadkar.com/2012/11/blog-post_2.html

============================

टीप:-

बस डे!! (मु.पो.पुणे)...

Submitted by अ. अ. जोशी on 2 November, 2012 - 02:23

बस डे!! (मु.पो.पुणे)

काल निघताना सर्वांचाच
चेहरा होता हसरा
काल झाला ना पुण्यात
बस डे साजरा

चौकाचौकात पोरे पोरी
होती बसची वाट पहात..
आत मात्र आली नाहीत
घोषणा देउन तिथेच रहात

घोषणा देत पर्यावरणाच्या
काही पोरे आत शिरली
वनस्पतींच्या बिया देउन
पुन्हा सगळी खाली उतरली

चढण्यासाठी बसथांबा
उतरायला कुठेही थांबा
चालक, वाहक रागवत नव्हते
म्हणाल तसे करत होते

रोज रोज लोम्बकाळणारा
आज भरपूर हसला
बस डे मुळे निदान
एकदा तरी 'बसला'

सूट, बूट , टाय लावून
काही चढले बसमध्ये
आजपासून पुन्हा असतील
आपापल्या स्टेटसमध्ये

बसनेच प्रवास करा
म्हणून संदेश दिला होता

चित्त पावन बासरी....

Submitted by बागेश्री on 2 November, 2012 - 01:51

चित्त पावन बासरी
जरा वाजव मुरारी,
आर्त भाव खोळंबू दे
तुझ्या माझ्या ह्या नजरी..

व्हावे तुजला स्वाधीन
येत तुजला शरण,
साद घाल वेणूतून
स्वीकारून हे नमन...

मोरपीस रंग दावी
जगण्याचे नवे नवे
दोन डोळे मोहणारे
वेड कसे न लागावे?
कसे खेळ खेळलेस
काय कपट केलेस,
मला काय घेणे देणे
माझी भक्ती तू झालास!

नाद तुझ्या रे बोलांचा
माझ्या कानी ह्या गुंजावा,
एकरूप होत जावे
ध्यास तुझाच असावा...

लुब्ध मन तुझ्या ठायी
मला जाण काही नाही
आता स्वप्न, खरे खोटे
तमा उरलीच नाही...

शब्दखुणा: 

हत्तीदादा....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 November, 2012 - 01:40

हत्तीदादा....

हत्तीदादा हत्तीदादा झुलता कित्ती छान
हालतात कसे मोठ्ठे मोठ्ठे सुपाएवढे कान

सोंड वळवळ करते ती कित्ती ती सापासारखी
कुठं बरं ठेऊ हिला शोध्ता का जागा सारखी ?

दात तर तोंडाबाहेर असले बिनकामाचे ?
ब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे ?

पाय ते केवढे मोठ्ठे आहेत नुस्ते खांबासारखे
दिस्ता कसे तुम्ही अगदी काळ्याशार डोंगरासारखे

शेपूट मात्र तुमची ही कित्ती बारीक एवढुशी
भल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी छोटीशी.....

शब्दखुणा: 

मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 1 November, 2012 - 23:17

गझल
मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!
फासावर चढता चढता गुणगुणणे सोपे नाही!!

आजन्म राहिली माझ्या पायात मुलायम बेडी;
रेशीमगाठ प्रेमाची सोडवणे सोपे नाही!

लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा;
आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!

हिंडती चोरपायांनी बगळ्यांच्या नजरा जेथे;
नादात आपल्या तेथे वावरणे सोपे नाही!

आयुष्य वेचले अवघे शिंपले वेचण्यासाठी....
लाखात एकही मोती सापडणे सोपे नाही!

छेडली तार त्याने अन् धडधडू लागली हृदये...
मैफलीस इतक्या सहजी मंतरणे सोपे नाही!

लावली चूड हातांनी, पाहिली राख डोळ्यांनी!
आपलीच स्वप्ने आपण सावडणे सोपे नाही!!

नवनाथ पोथी वाचल्यावर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 November, 2012 - 10:51

नाथाप्रती प्रीती मनात होती
जरी नव्हती वाचली पोथी
कसला गूढ असावा संकेत
नाही उमजत आज मज
वाचला पंथ दडला कथेत
वरील उलटीत रंजक प्रसंग
साधने विन न मिळे ज्ञान
सद्गुरू वाचून न होये सोय
मागील जन्माची असून शिदोरी
या जन्मी परी लागे कष्टावे
इतुके पक्के ठसले मनात
झालो शरणागत नाथापायी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

दोन क्षणांचा प्रवास जीवन...

Submitted by हर्षल_चव्हाण on 1 November, 2012 - 05:56

आपण आपले भले बुरे,
हवे कुणाला हार तुरे?

उभ्या रहिल्या भिंतीना,
प्रेमाचा आधार पुरे...

घरट्यामधले पिलू मोकळे,
आभाळाची कास धरे...

रोख कुणाचा कसा असावा,
कुणी सांगावे; काय बरे?

गोंधळ जगती फार जाहला,
कानी कोण हे गूज करे?

अफलातून ही दुनिया रे,
खोट्याचेही करे खरे...

दोन क्षणांचा प्रवास जीवन,
जगता जगता सहज सरे...

म्हणून जगणे समजून घ्यावे,
सरल्यावरती काय उरे?
------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१/११/१२ - दु. ३.२०)

शब्दखुणा: 

एक वॉचमन एक झाड थोडीशी ये जा

Submitted by बेफ़िकीर on 1 November, 2012 - 03:08

एक वॉचमन एक झाड थोडीशी ये जा
दुपार झेलत उभी आमची रुक्ष इमारत
आसुसलेला सजीव मी निर्जीव व्हायला
शुष्क अर्भकाच्या ओठांना कविता पाजत

सध्या या सृष्टीला ते म्हणतात संस्कृती
मी तर याच्यापेक्षा प्रदीर्घ टिकलो आहे
कधी इमारत कधी वॉचमन कधी प्रकृती
जो मी नाही तो होणे मी शिकलो आहे

रुपांतराच्या भीतीला कवितेचा कठडा
डोळे मिटुनी दूध पिणारी मांजर ठरते
सवाल हा नाही की शिंपी कोण असावा
सवाल हा की काय कशाचे अस्तर ठरते

बडबडगीत...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 02:12

बडबडगीत...

एक छान चिऊताई
उड्या मारत दाणे खाई
चिवचिवाट उगा करत
अंगणभर नाचत जाई

एक कावळा काळा काळा
हाक मारी माझ्या बाळा
काव काव उठा उठा
खाऊ लौकर आणा मला

एक पिल्लू गोजिरवाणं
भू भूचं वेडं सोनं
शेपूट हल्वून करी ऊं ऊं
किती थांबू आणा खाऊ

म्याँव म्याँव मनीमाऊ
जर्रा झोप मोडा पाहू
वास येता खासम् खास
उड्या मारी मासेखाऊ

शब्दखुणा: 

कविता(!)

Submitted by श्यामली on 1 November, 2012 - 01:47

चंद्र कवितेतला
कोजागिरीही कवितेतलीच
आकाश तेही अर्थात तिथलंच
मग तिथे अवेळी येणारा पाऊस,
सगळ काही विस्कटून टाकणारी वादळं
त्यात फरफटत जाणारे आपण
शब्दही, आणि अर्थही तिथलेच
सगळ्या भावना, सगळी दु:ख
सगळा आनंद तिथलाच; असं जरी असलं आणि
आयुष्य म्हणजे एक कविताच असं म्हटल
तरी एक कविता म्हणजे सगळं आयुष्य नसतं
नाही का?
~~~

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन