काव्यलेखन

तुझ्या कृपेची किरणे, माझ्यावरती का रुसलेली?

Submitted by सतीश देवपूरकर on 8 January, 2013 - 10:58

गझल
तुझ्या कृपेची किरणे, माझ्यावरती का रुसलेली?
का वाट्याला माझ्या आली? वाट अशी चुकलेली!

मलाच मी देताना खांदा, हाय किती थकलेलो....
ऐन यौवनी सुद्धा माझी पाठ पहा झुकलेली!

हरेक दिवशी घरून निघतो, पुसून माझी पाटी....
घरी परतताना ती असते प्रचंड बरबटलेली!

चार दिवस बाहेर काय मी गावाला गेलेलो....
कळीकळीचा म्लान चेहरा...बाग पूर्ण सुकलेली!

कुणास आता नको तेवणे हे माझे नित्याचे!
मी म्हणजे कंदील जयाची काचच धुरकटलेली!!

रदीफ अन् काफिया छान, पण, चिंतन सखोल नाही!
म्हणून त्यांची गझल वाटते निव्वळ फरफटलेली!!

चुरगळलो मी, सुरकुतलो मी, फक्त चुकांनी काही....

आयुष्य गझल झाली

Submitted by उमेश वैद्य on 8 January, 2013 - 10:02

आयुष्य गझल झाली

आयुष्य गझल झाली मी आळवीत गेलो
मतला ठरीव होता मिसरे रचीत गेलो

जे घातलेस कोडे सुटलेच ना कधीही
तू शिकविले तसे मी ते सोडवीत गेलो

कोणीकडून आला पक्षी कुण्या दिशेचा
हासून क्षेम त्याचे तरिही पुशीत गेलो

आला असाच कोणी भेटीस आज माझ्या
म्हणतात काळ ज्याला, त्याच्या कुशीत गेलो

होते जिवंत त्यांनी मृत्यूस दान केले
यांच्या मुठीमधूनी त्या ओंजळीत गेलो

उ. म. वैद्य २०१२.

जगून घे जरा....

Submitted by बदीऊज्जमा बिराज... on 8 January, 2013 - 08:41

गझल

जगून घे जरा जरा!
फुलून घे जरा जरा!!

समोर आरसा तुझ्या...
नटून घे जरा जरा!

अजून दु:ख यायचे;
हसून घे जरा जरा!

वळीव हा उन्हातला...
भिजून घे जरा जरा!

सुमार हा दुपारचा!
पडून घे जरा जरा!!

नशा जरी पिण्यामधे;
जपून घे जरा जरा!

रुसून नीज जायची;
निजून घे जरा जरा!

बदल स्वत:मधे प्रथम;
करून घे जरा जरा!

न शब्द आठवायचे....
लिहून घे जरा जरा!

ढळू नयेत आसवे!
पुसून घे जरा जरा!!

चिता विझेल तोवरी....
जळून घे जरा जरा!

जिणे शिकायचे तुला;
मरून घे जरा जरा!

बुडायचेच शेवटी!
तरून घे जरा जरा!!

अखेर जिंकणार तू!
हरून घे जरा जरा!!

तिच्या दिठीतली सुधा;

छोटय़ा गोष्टींची आठवण.........................

Submitted by मंदार खरे on 8 January, 2013 - 07:18

खडू आणि ती मण्यांची पाटी
अ आ इ गिरवून झिजलेली

नविन दोन चाकी सायकल
गुडघे फुटे तोवर चालवलेली

छोटासा आरसा खिशात ठेवून
सुर्याची तिरीप डोळ्यांवर मारलेली

गल्ली मध्ये क्रिकेट खेळताना
पहिली ऊंच सिक्स मारलेली

डब्यातले लाडू,वडी, बिस्कीट
आईच्या नकळ्त लंपास केलेली

निळ्या रंगाची जुनी जिन्स
अगदी विटे तोवर वापरलेली

दिवाळीमध्ये छोटा फटाका लावून
जिवाच्या आकांताने धूम ठोकलेली

मजा येते अधुन मधुन
छोट्या गोष्टींची आठवण आलेली

."©मंदार खरे

कविता आणि कवी

Submitted by मंदार खरे on 8 January, 2013 - 04:31

कविता म्हणजे घट कवी गोरा कुंभार
कल्पनांची माती तिंबून देतो त्यास आकार

कविता जर अभंग कवी साक्षात किर्तनकार
भावनांचे करुन निरुपण घडवतो जणु साक्षात्कार

कविता जणु पाउस कवी बनतो मेघ
चिंब करते अनुभुती कवितेतील प्रत्येक रेघ

मनाच्या खोल जखमा, कवि शल्य विशारद
टाके घालतो कवितेचे, फुंकर मारुनी अलगद

कविता असावी प्रकाश कवी काजव्यासम हवा
जगी अंधार दाटता स्वयंस्फुर्तीने दिपावा

©मंदार खरे

शब्दखुणा: 

रुंजी

Submitted by समीर चव्हाण on 8 January, 2013 - 01:24

किती रुंजी अशी तिथल्या तिथे घालत रहावे
नवी क्षितिजे, नवे आकाश धुंडाळत रहावे

कधी हे मौन पडते आपल्या पथ्यावरी पण
शहाण्याने मनाशी वाद नित घालत रहावे

तुझ्या गाण्यात विरघळती व्यथा अवघ्याच माझ्या
तुला ऐकत रहावे बस तुला ऐकत रहावे

तुझ्या डोळ्यांतले गाणे तुझ्या मौनातली धुन
तुला ऐकत रहावे की तुला पाहत रहावे

कधी देशील एखादीच पण परिपूर्ण रचना
किती सौंदर्य तुकड्यांतून न्याहाळत रहावे

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 

.. फ़ुलून घे जरा

Submitted by प्राजु on 7 January, 2013 - 22:06

प्राक्तनाचा फ़ोड कातळ.. रुजून घे जरा
भीड, चिंता सोड तळमळ... जगून घे जरा

पावसाळे वा उन्हाळे.. नको तुला तमा
वाटले आता भिजावे.. भिजून घे जरा

भाळणे हा धर्म आहे.. मना तुझा खरा
सोड अब्रूचे बहाणे.. फ़सून घे जरा

जीवना चढली तुला का.. जगायची नशा?
सांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा

मोगरा प्राजक्त जाई.. जुईच का म्हणे??
होत कोरंटी, अबोली.. फ़ुलून घे जरा

वाट काट्यांची निवड अन.. असाच चाल पण
सावली दिसताच तेथे.. निजून घे जरा

वय कशाला आड यावे.. सजा-धजायला
माळ गजरा, रेख काजळ.. सजून घे जरा

विकृती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

विकृती...

तू जगण्यातली कुरुपता
शोधत जगत असतेस
हतबल करुन टाकतेस
तुझ्या सानिध्यात येणार्‍या
प्रत्येक.. प्रत्येक जीवाला!

तुझ्या पुढे हातपाय टेकतात
सगळे प्रयत्न फोल ठरतात
नरक यातनेचे दर्शन घडवतात
सुखाचे चार क्षण हिरावले जातात!

मिळू नये तुला सोबत कुणाची
तू आधाराला निराधार करणारी!

लाभू नये तुला घरदार
तू अंगणात रक्ताचा सडा शिंपणारी!

येऊ नये तुझ्या वाट्याला नातीगोती
तू नसानसात विष घोळणारी!

फुलू नये तुझा संसार
तू कोवळ्या स्वप्नांना उध्वस्त करणारी!

पाहू नये कधी कुणी तुझी वाट
तू तिष्ठणार्‍याला जळत ठेवणारी!

लागू नये तुझी सावली कुणाला
तू जन्मभर पिच्छा पुरवणारी!!!

प्रकार: 

संध्याकाळ

Submitted by बेधुंद on 7 January, 2013 - 08:01

तुझी वाट् बघण्यात् संध्याकाळ् सरुन् जाते
रोज् माझ्या मनाचे गाणे हवेत् विरुन् जाते

एकटेपणाला सोबत् घे‌ऊन् ही सांज् रोज् मला भेटते
तुलाही येत् असेल् माझी आठवण् उगाच् तेव्हा वाटते

कधी आठवुन् एखादा क्षण् मन् उगाच् कासावीस् होते
तु नसतांना देखील् मन् तुझेच् हो‌ऊन् राहते

रोज् नवी संध्याकाळ् तुझी नवी आठवण् देते
येशील् तु कधीतरी मन् उगाच् ग्वाही देते

सारे काही आलबेल् असते एक् मला सोडुन्
मन् मात्र् वेडं होते तुझी आठवण् काढुन्

सगळा हा खेळ् चालतो फक्त् एक् तुझ्यासाठी
एकांत् हा करत् राहतो मनाला सोबत् प्रेमापोटी

दिवेलागणीला मन् एकट्च् घरी परत् येते

चाहूल

Submitted by -शाम on 7 January, 2013 - 07:43

रोज स्वप्ने पावलांना भूल देती
रोज वाटाही नव्याने हूल देती

भेटता ती बोलणे विसरून जातो
केवढे झोके मनाला डूल देती

ही अघोरी रीत प्रेमाची कळेना
का फुलाला तोडलेले फूल देती

ही कशी आली सुखे घरट्यात माझ्या
सारखी दु:खा तुझी चाहूल देती

जाहले सत्कार माझेही जसे की
राबत्या बैलास कुणबी झूल देती

निर्मुखी जेथून कोणीही न गेला
'शाम' आजीची मला तू चूल दे"ती"

............................................................. शाम

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन