काव्यलेखन

मुद्दल सोडा, व्याजच अजुनी फिटले नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 January, 2013 - 13:48

गझल
मुद्दल सोडा, व्याजच अजुनी फिटले नाही!
ग्रहण कधी कर्जाचे माझ्या सुटले नाही!!

कळ्या कोवळ्या, फुलण्याआधी खुडल्या गेल्या....
तरी कुणाचेच आतडे का तुटले नाही?

सत्संगाची जरी वानवा सभोवताली;
तुझी कृपा! पाऊल कधी भरकटले नाही!

चिखल चहूबाजूंनी सारे उडवत होते.......
कोणाचे चारित्र्य सांग बरबटले नाही?

तारायाला खुद्द देव मग कसली भीती?
कैक जाहले ठार...मला खरचटले नाही!

आमच्यातला तोच एकटा हुशार होता!
म्हणून नाते अजूनही फिसकटले नाही!!

जागोजागी फक्त शायरी त्यांस मिळाली;
मग चोरांनी काहीही उचकटले नाही!

वादळ सुद्धा चकीत झाले मला पाहुनी,

पाउलास ओढ लागली मॉलाची

Submitted by श्यामली on 16 January, 2013 - 08:04

सेल लागलासे एक दिवसाचा
पाउलास ओढ लागली मॉलाची

वाटे आगत्याचे आम्हा आमंत्रण
स्वारीच्या खिशास बसू दे चाट

फिरताना दिसती आणखिन सेल
कसा हा टाळावा सांग मोह

मधेच आठवे, पर्स ना मॅचिंग
डिझायनर चप्पल खूणावते

ड्रेसास, पर्स, पर्सेला, चप्पल
मनास चंचल म्हणोनिया झाले

ज्वेलरीही आता जंकच घेऊ
ख-याची दुनिया राहिली नाही!!!

गझल

Submitted by मंदार खरे on 16 January, 2013 - 06:53

मदिरेचे ते प्याले कधी स्पर्शीलेच नाही
तुझ्या नशेने शुद्धीत कधी ठेवलेच नाही

कित्येकांनी तुज उचलेले सहज चाखलेही
माझे कधी ते धैर्य झालेच नाही

कधी स्पर्श होता लाजून गेलीस तू
जशी आधी कधी तशी भेटलीच नाही

दिसलीस सजुन नुकतीच बसलेली सांजवेळी
सौंदर्य ते करंट्या डोळ्यात साठलेच नाही

दिलीस खंत परी प्रेमास मी का पात्र नाही
कित्येक केल्या रचना पण तू गवसलीच नाही

शब्दखुणा: 

चित्र

Submitted by वैशाली अ वर्तक on 16 January, 2013 - 04:46

चित्र
हाती आले चित्र जुने ,
मन गेले मागे मागे,
काहूर दाटले मनीं आठवांचे.
मन रमले भूतकाळाते .
सहज आला विचार मनी ,
चित्राची किती कृपा जगावरी ,
नव्हते शब्द वा भाषा अधरी ,
चित्र वाच्य करि संभाषणी
दिसते नयनांना ते दृष्य असे,

शेंदूर

Submitted by निंबुडा on 16 January, 2013 - 04:02

शेंदराने माखलेली मूर्ती पाहिलीत का कधी?
लेपावर लेप..
पुटांवरती पुटं..
आणि मग झाकले जाते
आतल्या मूर्तीचे मूळ रुप, रंग
सुंदर, रेखीव आकाराचे रुपांतर होते
एका ओबढ धोबड आकारात
..
..
..
तसाच वेदनांचा शेंदूर फासत जाते नियती
आणि तुम्ही मला विचारता,
आधीची 'तू' कुठे हरवलीस?

शब्दखुणा: 

मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही

Submitted by -शाम on 16 January, 2013 - 03:48

चष्म्यामध्ये पुर्वीइतके पाणी साचत नाही
मी गेलेल्या आयुष्याला आता वाचत नाही

बंद घरातच बडबडगाणे थकून झोपी जाते
खांद्यावरती चिमणे घेउन अंगण नाचत नाही

घुसमट होते,पाणी झरते आणि उदासी उरते
आठवणींचे पोते कोणी उगाच टाचत नाही

नात्यांचा की कर्तव्यांचा, हे ही कळते कोठे
दोर नेमका कुठला काचे कुठला काचत नाही

कातर होवो सांज कितीही वा बरसूदे श्रावण
निकरट झाले की मग काही काही जाचत नाही

निंदेनेही कोपेना 'तो' भक्तीने पावेना
'शाम' वाटते आता काही माणुस वाचत नाही

..................................................................शाम

प्रकाशओझे

Submitted by रसप on 16 January, 2013 - 03:30

ही रोज सावळी रात्र मला मोहवते
सागर तमसाचा पापणकाठी बनते
मौक्तिक-रत्ने मज तेथ लाभती रोज
निर्व्याजपणे ही एकच रंगी सजते

गंधास रातराणी पसरे भवताली
वारा पांघरतो नव्या मखमली शाली
आशेच्या पंखांवर सजती मग तारे
मज दिसत नसे की काय राहिले खाली

खिडकीतुन झिरपे रोज नवा अंधार
आकाश उद्याचे घरात घे आकार
कोऱ्या पटलावर मी लिहितो मन माझे
संतप्त वेदना पडते निपचित गार

जो काळ हवासा वाटे, थांबत नाही
रात्रीस पाउले असती, चालत राही
स्वप्नांस असावा शाप कटू सत्याचा
हे प्रकाशओझे मिळे दिशांना दाही

दिसतात सावल्या वठलेल्या झाडांच्या
ओघळतो अश्रू गालांवर रस्त्यांच्या

वाढला संचार येथे

Submitted by निशिकांत on 16 January, 2013 - 01:46

कौरवांचा वाढला संचार येथे
द्रौपदीला ना मिळे आधार येथे

खूप किंचाळ्या तिच्या ऐकून, बहिरे
मर्द सारे शोधती कासार येथे

काय किमया आश्रमी बाबागुरूंची !
नार भाकड राहते गर्भार येथे

लाजही लाजून खाली मान घाली
बेशरम राजेच झाले फार येथे

काम सरकारी निघाया व्यर्थ चकरा
निर्णयांचे थाटले बाजार येथे

फोडली वाचा गुन्ह्यांना, हा गुन्हा का?
मी कशाला आज ताडीपार येथे?

मृगजळामागे पळावे, ध्यास इतका
वास्तवांचे मोडले संसार येथे

सूर्य भित्रा का असा ढोलीत लपला?
अश्वमेधाला निघे अंधार येथे

मंदिरे होती कधी का ईश्वराची?
भरवती बडवे सदा दरबार येथे

तत्व का "निशिकांत" सोडावे जगाया

१ फेब्रुवारीपासून गुलमोहरात झालेले बदल

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 14:47

दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.

लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः

आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)

गाय वासरू छाप गोमुत्र

भारतीय

डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)

गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)

देवपूरकर

या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.

==========================

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन