काव्यलेखन

काळजाचे पान कुठले फडफडाया लागले?

Submitted by सतीश देवपूरकर on 21 January, 2013 - 12:31

गझल
काळजाचे पान कुठले फडफडाया लागले?
हे पुन्हा पाऊल माझे अडखळाया लागले!

हा तुझा आभास नुसता, की, तुझी चाहूल ही.....
पाखरू माझ्या मनाचे भिरभिराया लागले!

स्वाभिमानी खूप होते, काय त्यांचे जाहले?
ते पहा....जाते जिण्याचे घरघराया लागले!

याच गाण्याने अम्हाला एकदा फाशी दिली...
तेच गाणे लोक आता गुणगुणाया लागले!

साधले त्याने अखेरी, त्यास जे साधायचे;
हे अताशा रक्त माझे सळसळाया लागले!

तू दिली मज दिव्य दृष्टी आणि सृष्टी बदलली....
जागजागी दिव्य देखावे दिसाया लागले!

कंदिलांनो! दु:ख हे तुमच्याच वाट्याला नव्हे;
सूर्य सुद्धा कैक आता काजळाया लागले!

स्री मनाचा तळ

Submitted by संजय४५ on 21 January, 2013 - 11:23

स्री मनाचा तळ

..................................

मी अनुभवलंय

अन अनुभवतोय

स्री शरीरापलीकडचं

एक अदभूत सुंदर जग

मला जाणून घ्यायचं होतं

तिचं खरं मन

जे आजपर्यंत माझ्यासाठी

एक गूढ होतं

विहिरीचं पाणी दिसतं

पण तिलाही तळ असतो

तसाच स्रीच्या मनाचा तळ

शोधायचा होता मला

त्यासाठी मी एक केलं

माझ्यातल्या वासनेला दूर केलं

माझ्या मनाच्या तळाला

अगोदर मी स्वच्छ केलं

न तो मनाचा आरसा घेऊन

उभा राहिलो तिच्यापुढे

तेव्हा ती उभी राहिली

निर्धास्त त्या आरशापुढे

कुठलही भय नाही

पूर्ण विश्वास भरला तिच्यात

तुला बदनाम करणारे तुला बदनाम करताना

Submitted by बेफ़िकीर on 21 January, 2013 - 03:20

हवा होता मला आराम तेव्हा काम करताना
मिळावे काम आता वाटते आराम करताना

कपाळी कोरुनी सारे प्रयत्नांची मुभा देता
मनाचा खेळ देवांनो तुम्ही मुद्दाम करता ना

मना मोक्षाप्रती जाण्यास लाखो जन्म घालवले
तरी नाकी नऊ आले तुला निष्काम करताना

लढाई हारलो प्रत्यक्ष आयुष्यासवे माझी
इथे आभासत्या मुद्यांवरी संग्राम करताना

तुला ते श्रेय द्यावे की सबूरीला स्वतःच्या मी
पुराण्या विभ्रमांनी तू नवा परिणाम करताना

उगा हंसाप्रमाणे चालुनी झुलवायची वेणी
तुला जाणीवही नसणार कत्लेआम करताना

निसर्गाची कसोटी लागली अस्तित्व जपण्याची
ऋतू येईल जो त्याला तुझा हंगाम करताना

शिवार माझे उजाड सारे नकाच येऊ कोणी

Submitted by प्राजु on 20 January, 2013 - 22:23

शिवार माझे उजाड सारे नकाच येऊ कोणी
फ़ुलण्यावर वैशाख पहारे नकाच येऊ कोणी

पहाट झाली स्वप्ने विरली भकास वास्तव बाकी
आशेचे मावळले तारे नकाच येऊ कोणी

माझ्या नशिबावरती रडण्या, किंवा सांत्वन करण्या
तुम्हास करते पुन्हा इशारे नकाच येऊ कोणी

नर्तन नाही अता व्हायचे मेघ पाहुनी देखिल
मिटले माझे मीच पिसारे, नकाच येऊ कोणी

भणंगतेची बाधा झाली, थारा नसे मनाला
उपदेशाचे देत उतारे नकाच येऊ कोणी

मोहरण्याची, हुरहुरण्याची आस न उरली आता
पुन्हा फ़ुलवण्या नवे शहारे नकाच येऊ कोणी

-प्राजु

ती

Submitted by प्रसाद पासे on 20 January, 2013 - 12:58

तिचे अवखळ रुसणे
तिचे निखळ हसणे
नाही थांबवू शकत
माझं तिच्यात हरवणे

तिचे माझे भांडणं
तिचे उगीच रागावणं
नाही मला आवडत
तिचे असं असणं

तिचे अचानक न बोलणे
तिचे असे उगीच चिडणे
नाही विसरू शकत
तिचे हे असे वागणे

तिचे अचानक निघून जाणे
तिचे असे सोडून जाणे
नाही मी माफ करत
तिचे हे असे वागणे

~प्रसाद पासे~

पप्पूला राजकारणी व्हायचंय !!

Submitted by रसप on 19 January, 2013 - 23:36

पप्पूला राजकारणी व्हायचंय
मागच्या-पुढच्या सात पिढ्यांचं
एकाच जन्मात खायचंय..
आमच्या पप्पूला राजकारणी व्हायचंय !

कसाबसा पप्पू १२ वी शिकला
पास-नापासच्या छापा-काट्यात तितपतच टिकला
पुढच्या पुस्तकांचा गठ्ठा मात्र रद्दीमध्ये विकला
१२ वीत पास होण्यासाठी एक क्लास लावला होता
तसंच आता एखादं 'पक्ष कार्यालय' लावायचंय
कारण पप्पूला राजकारणी व्हायचंय !

त्याने ठरवलंय, नोकरी करायची नाही
कारण माहितेय, मेहनत झेपायची नाही !
पण शौक पुरे करण्यासाठी बाप कमाईही पुरायची नाही !
ढुंगण न हलवताही पैसा यायला पाहिजे
म्हणूनच त्याला एकदाच 'मीटर डाऊन' करायचंय

नको उसळूस तू हृदया, तुला झेपायचे नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 January, 2013 - 22:33

गझल
नको उसळूस तू हृदया, तुला झेपायचे नाही!
तिचे साधेसुधे बघणे तुला सोसायचे नाही!!

फुलांचा एकमेकांचा अबोला बोलका असतो!
तुला गंधातले, रंगातले समजायचे नाही!!

तुझी माझी पुन्हा चर्चा कराया लागले तारे....
कितीही मी जरी म्हटले अता बोलायचे नाही!

समुद्री दोन डोळ्यांच्या किती भंडावती लाटा;
किनारी थांबणा-याला कधी उमगायचे नाही!

दिले पहिल्याच भेटीला तुला काळीज मी माझे!
अता तू बोल काहीही मला टोचायचे नाही!!

घेतो जपून आता मी श्वास राहिलेले!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 January, 2013 - 14:15

गझल
घेतो जपून आता मी श्वास राहिलेले!
आहे उधार मजला आयुष्य लाभलेले!!

मी लाविली स्मितांची ठिगळेच जागजागी....
आयुष्य सर्व होते आतून फाटलेले!

केली तुझ्या परीने तूही शिकस्त फुलण्या;
होते वसंत सारे जात्याच बाटलेले!

होते बरेच काही बोलायचे तिच्याशी;
संवाद सर्व झाले ओठात गोठलेले!

हे फार छान झाले, विसरून त्यास गेलो....
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले!

डोळ्यांसमोर माझ्या माझे क्षितीज आहे!
मी चाललो किती ते, अजुनी न पाहिलेले!!

उघडू नकात डोळे माझ्या कलेवराचे;
माझे अतीत सारे मी त्यांत झाकलेले!

हे वासरू मनाचे भारी उनाड झाले!

कळत नाही कधी ........

Submitted by संजय४५ on 19 January, 2013 - 10:29

कळत नाही कधी ........

कळत नाही कधी

मन कसं गुंतत जातं

कुणी असं मनास

वेड कसं लावतं

कुणा मागे मन

कसं फरफटत जातं

कुणा मध्ये मन

कसं गुरफटत जातं ....

कळत नाही कधी

कोण आयुष्यात येतं

काहीच ओळख नसतांना

आयुष्य बदलून जातं

काहीतरी नातं

मनी उमलून जातं

तोच गंध श्वासात

मन घेऊन फिरतं ....

कळत नाही कधी

कसं मन अडकतं

हलकेच हातातन

निसटून कसं जातं

असं कसं कुणी

काळजात शिरून जातं

भेट होता त्याची

हृदय धकधक करतं ....

कळत नाही कधी

जगणं बदलून जातं

आपलं मन त्याचं

गुलाम होऊन होतं

हे प्रेम असंच

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन