काव्यलेखन

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते...."©मंदार खरे"!!!

Submitted by मंदार खरे on 30 January, 2013 - 23:52

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते
पण त्याचे आणि तिचे same नसते

त्याचे प्रेम हे धसमुसळं, धांदरट
तिचे प्रेम हे लज्जित, घाबरट

त्याचे प्रेम हे घरच्यांना झुगारुन
तिचे प्रेम हे घरच्यांना सावरुन

त्याचे प्रेम हे बंद डोळ्यांनी आसक्‍त
तिचे प्रेम हे बंद ओठांनी अव्यक्‍त

त्याचे प्रेम हे मित्रांमध्ये चर्चा
तिचे प्रेम हे मैत्रिंणींमध्ये इर्षा

त्याचे प्रेम हे मनापासून निस्‍सिम
तिचे प्रेम हेही निर्व्याज आसिम

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते!!!!
शेवटी कसेही असले तरी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असते!!!

सांग तुला हे जमेल का ?

Submitted by रसप on 30 January, 2013 - 23:24

कधी मिळावे तुझे तुलाही
तुझ्याकडुन जे मला मिळाले
मनात वादळ, उरात कातळ
पाझरणारे अबोल छाले..

सांग तरीही माझ्यासम तू
उधार हासू आणशील का ?
एकच मोती गुपचुप माळुन
'सडा सांडला' मानशील का ?

फसफसणाऱ्या लाटांनाही
खळखळणाऱ्या सरिता बनवुन
अवघड असते हसू आणणे
डोळ्यांमध्ये समुद्र झाकुन

समजा जर हे तुला मिळाले -
'कातळ, छाले, वादळ-वारे'
कविता, स्वप्ने, हळवे गाणे
परत मला दे माझे सारे

सांग तुला हे जमेल का ?
सांग तुला हे कळेल का ?
व्याकुळलेली शून्यनजर ही
तुला जराशी छळेल का ?
........सांग तुला हे जमेल का ?
........सांग तुला हे कळेल का ?

....रसप....
३० जानेवारी २०१३

हे मला कळून चुकले.......

Submitted by गोपिका on 30 January, 2013 - 14:01

सुगन्ध वार्‍या सन्गे वाहुन गेले
फूल एकटेच राहुन गेले
त्याचि वाट पाहतच,फूल कोमेजले
पण सुगन्धाला हे कधिच न कळले......

मे ही व्याकुळलेलि त्या पुष्पा परी
येशिलच ना तु......कधितरी
तुझिच आस नेहमि असते
माझ मनाचा अन्तरी

सुगन्ध फुलाचा कधिच नसतो
हे फुलाला कधि नाहिच कळले
तु माझा कधिच नव्हतास
हे मला कळून चुकले......

रेशीमगाठी..

Submitted by Sangeeta Kulkarni on 30 January, 2013 - 13:00

....रेशीमगाठी....

प्रेमात असतो विश्वास
असतं अतुट बंधन ..

सहवास असतो हसता खेळता
त्याच्यासाठी नही व्याख्या..

असतात त्या रेशीमगाठी
थंडगार स्पर्श करणारी..
पहाटेच्या दवासारखी

तनामनात सुगंध पसरवणारी.. केवड्यासारखी
मनाला नवचैतन्य देणारी.. सुर्योदयासारखी
तावुन सुलाखून चमचमणा-या.. सोन्यासारखी

शब्दखुणा: 

फक्त तुझीच....

Submitted by Sangeeta Kulkarni on 30 January, 2013 - 12:43

फक्त तुझीच...

माडाच्या बनात तुझ्याजवळ उभी होते
अलगद तुझ्या मिठीत विसावले होते..

प्रीतित आकंठ बुडाले होते
मन मात्र बेभान झाले होते..

तुझ्या मिठीत सारे जग विसरले होते
क्षणाचा विलंब न करता --

...फक्त तुझीच झाले होते
...फक्त तुझीच झाले होते

शब्दखुणा: 

चिमणी, चिमणी ....... अग्दी शाणी

Submitted by पुरंदरे शशांक on 30 January, 2013 - 12:09

चिव चिव चिमणी ........ ये ना राणी
अंगणात ठेवलंय ....... दाणा पाणी

का गं अशी ...... रुसल्यावाणी
खा ना जरा ..... मऊशी कणी

टिपते हळुच ....... इवली कणी
बघते कशी .... दचकल्यावाणी

चिव चिव करीत ....... गाते गाणी
उड्या मारते ....... पायावर दोन्ही

पायात बांधा ...... घुंगुर कोणी
घुंगराच्या तालावर ...... नाचेल राणी

चिमणी, चिमणी ....... अग्दी शाणी
म्मं म्मं संपली ...... पटाक्कनी

किती गं बाई ...... शोनू/मोनू/बंटी गुणी
गागू करा .... पाखरावाणी .....

आता कुठे जिण्याची आली जरा उभारी!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 January, 2013 - 11:23

गझल
आता कुठे जिण्याची आली जरा उभारी!
इतक्यात नावपत्ता मृत्यू मला विचारी!!

दु:खांमुळेच झालो सोशीक एवढा की,
मी सोसले सुखाचे आघात ते जिव्हारी!

आकाशही दिले तू, मज पंखही दिले तू....
नाही मलाच आली घेता कधी भरारी!

होते सुरू अचानक ये-जा तुझ्या स्मृतींची;
जेव्हा मला खुशाली माझीच मी विचारी!

आयुष्य सर्व गेले, शोधीत फक्त जागा....
मरणा! उभाच आहे घेवून मी पथारी!

मथळ्यांवरून येतो अंदाज बातम्यांचा;
वाचायच्याच आधी येते किती शिसारी!

चढवा भले कितीही श्रीमंत साज त्यांना;
कळतेच खानदानी आहेत ते भिकारी!

सोडून चोर संन्याश्यालाच होय फाशी!

ती आली पुन्हा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 January, 2013 - 09:37

ती आली पुन्हा
आज अचानक
हवेच्या झुळकी गत.
मनी गारवा
एक हवासा
हलका पसरवत.
रूढ रोकडा
होता व्यवहार
थोडी ओळख त्यात.
कसे काय ते
बोलही वरवर
झाले न झाल्यागत.
कितीतरी पण
वर्षानंतर तार
थरथरली आत.

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 

माझ्या गावात कधी आता -

Submitted by विदेश on 30 January, 2013 - 08:00

माझ्या गावात कधी आता
माझा मामा रहात नाही -
आजोळी जाण्याचा त्यामुळे
प्रसंग कधी येतच नाही......

धूर सोडणारी झुकझुक गाडी
साधे झाडही दिसत नाही
शहरात राहिला मामा आता
त्याला नोकरी मिळत नाही ...

वेळ नसल्यामुळे तो
मला कधी बोलवत नाही
मामी सुगरण आहे का
त्यामुळेच माहित नाही...

वर्षात कधीतरी एकदाच
शिकरण-पोळी खाते म्हणे -
एवढे मात्र ऐकून आहे
बाकीच काही ठाऊक नाही...

मामाची रंगीत गाडी नाही
मामाची उंचउंच माडी नाही
लपली काळाच्या पडद्याआड
आजी बरळते काहीबाही....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन