काव्यलेखन

तस्वीर तरही : एकट्या वृक्षास नसतो कोणताही आसरा

Submitted by मकरंद.११७७ on 12 February, 2013 - 10:48

एकट्या वृक्षास नसतो कोणताही आसरा
मीहि तैसा एकला अन तूहि तैसा सागरा

सागराच्या गौरवाचे का हवे रे गोडवे
माझिया तृष्णेस पुरतो आड घट अन कासरा

तू कुठे अन मी कुठे हे हा न रस्ता सांगतो
हरवला कोठे न कळले मोर अल्लड नाचरा

बाळ स्वप्ने बाळ डोळे बाळ शाळा आपली
कामधेनू शिक्षणाची दूध पाजे वासरा

कालगंगा फूल अन 'मकरंद' होती तारका
काळ व्यापे चंद्र तारे शून्य करतो अंतरा

स्वप्ने दुमडली, मुडपले मनाला!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 February, 2013 - 09:32

गझल
स्वप्ने दुमडली, मुडपले मनाला!
इतका कसा मी खटकलो जगाला?

हे, प्राण मी सोडताना, समजले....
वैषम्य वाटे कुणाला कुणाला!

दारावरी नाव अद्याप माझे!
भिंती न खिडक्या न छप्पर घराला!!

उलटे न कोणासही बोललो मी;
गेलो न बदलायलाही कुणाला!

आहे असा हा, तसा तो फलाणा....
न्याहाळ आधी स्वत:चे स्वत:ला!

चिंता किती चेह-यावर शवाच्या .....
मेल्यावरीही न शांती जिवाला

इतकीच माझ्याच दु:खास चिंता....
लागू नये द्रुष्ट माझी सुखाला!

हल्ली असे ते भरवती प्रदर्शन....
करतात नुसते उभे नग नगाला!

काळे कशाला करू केस माझे?
बुरख्यात झाकू कशाला वयाला?

आला तुझा फक्त संदर्भ थोडा;

मदिरेचे अभंग

Submitted by अमेय२८०८०७ on 12 February, 2013 - 04:57

वाटते जे जे प्यावे , ते ते दुसर्‍यासी द्यावे
तर्र करूनी सोडावे , सकळजन

दुजाची किंवा आपली, कधीही उघडावी बाटली
लाज कोणा वाटली, वाटो द्यावी

व्हिस्की असो वा रम, काही नसावा नियम
दोन पेगांनी संभ्रम, नाहीसा होतो

कधी प्यावे एकचित्ति, कधी मैतराच्या साथी
गुंग परि त्याने मति, होवो नये

खावे चिवड्याचे बकणे, तैसेचि काही चकणे
शेवटी पिऊन टिकणे, महत्त्वाचे

चालता चालता प्यावे, हाती 'घेऊन' चालावे
नशापाणी व्हावे, मनासारखे

ज्यांना कळे मूलमंत्र, त्यांनाची आकळे तंत्र
स्कॉच अथवा संत्रं, परिणाम देई

कैफियत

Submitted by विजय दिनकर पाटील on 12 February, 2013 - 03:08

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

विहिरीच्या काठावर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 February, 2013 - 02:53

विहिरीच्या काठावर
उभी सोडुनिया दोर
मनातला घाव मागे
गर्द हिरवा अंधार १
किती प्रेम शिंपायचं
किती नातं जपायचं
मन चिंध्या झाल्यावर
कुणा काय सांगायचं २
ठोठावून दार दार
वळ आले हातावर
कुणी कधी ऐकले ना
उरी गारठले स्वर ३
कुठे तरी अंधारात
सारं सारं विसरावं
खोल खोल एकांतात
बंध तोडूनिया जावं ४

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

तो एक दिवस प्रेमचा

Submitted by श्रीराम . on 12 February, 2013 - 02:07

तो एक दिवस प्रेमाचा (व्हालेन्ताएन डे)
तो आणि ती,त्यांनी
प्रेम व्यक्त करण्यासाठी,
या दिवसाची कां वाट पहावी,
कोण सांगेल कां मला ?
प्रेम एकमेकांच्या,
नजरेत दिसत असतां
‘आय लव यू’ या ,
कार्डाची गरज कां भासावी,
कोण सांगेल कां मला ?
प्रेमाचा फुलोरा ,
एकमेकांच्या हृदयात दरवळा असतां,
त्या ‘गुलाबाची’गरज कां भासावी ,
कोण सांगेल कां मला ?
प्रेमाच्या दिनदर्शिकेत,
सारे दिवस सारखेच असतां ,
‘त्या’ दिवसाची गरज कां भासावी,
कोण सांगेल कां मला ?
प्रेम व्यक्त करण्याच्या रित-भातीची
काही केली असल्यास व्याख्या,
कोण सांगेल कां मला ?
जे हृदयातून येते ,
मनां मनात फुलते ,

शब्दखुणा: 

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 12 February, 2013 - 01:25

आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
(मज दोन आसवांना हुलकावता न आले)

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन