काव्यलेखन

देहावर मोहरली रिमझीम सावरिया

Submitted by श्यामली on 14 February, 2013 - 02:14

देहावर मोहरली रिमझिम सावरिया
अधरावर गुणगुणली थरथर सावरिया

लगबग बघ न्यासांची
तगमग या श्वासांची
स्पर्श स्पर्श छेडती; राधा सावरिया
न्यासांना, श्वासांना साज दे सावरिया...
साज दे सावरिया

खोल खोल अंतरात
दीप चेतले कितीक
रात्र राही थांबुनी; आता सावरिया
चेतवल्या स्वप्नांना साद दे सावरिया...
साद दे सावरिया

हे गाण माझ्या चांदणशेला या अल्बममधे महालक्ष्मी अय्यरनी गायलं आहे.

तुझाच मी !

Submitted by रसप on 13 February, 2013 - 23:58

माझा मीच न आता उरलो, तुझाच मी
तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

अनेक प्रेमाच्या शब्दांना तूच उधळले
मी तर केवळ वेचुन-वेचुन त्यांस जमवले
तू कविता मी कवी जाहलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

जुन्या-जुन्या दु:खांनी होतो गलितगात्र मी
तू येण्याच्या आधी होतो शून्यमात्र मी
माझ्या नकळत तुला गवसलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

इथून पुढचा प्रवास अपुला बराच आहे
तुझी साथ हा एक दिलासा खराच आहे
तुझ्या प्रकाशामधे उजळलो, तुझाच मी
........... तुझ्यात बघता मला, समजलो - तुझाच मी !

....रसप....
व्हॅलेन्टाईन्स डे, २०१३

आठवण

Submitted by PANDURANG WAGHAMODE on 13 February, 2013 - 23:15

विसरु शकनार नाही मी तुज्यावरच प्रेम
त्या मोहक चेहर्य़ावरती रुललेली केसांची लड़
अनं ती पडलेली गालावरची खली, सांग -
कशी विसरु शकेन मी. आठवतय का बघ तुला,
आपण लहानपणी असताना कित्ती स्वप्ने रचायचो.
नदीकाटी असताना सोनेरी वाल्लुत घरे बांधायचो ,
तुला चांगलं घर बांधता आलं की,मी पाड़ायचो.
अनं तू रडत बसायचीस मग मी पोट धरून हसायचो.
पण खरं सांगू ? मला त्यावेली तूजी इतकी कीव-
यायची की ,आतुन त्याचेच उबाले यायचे .
मी तुला घर बांधून द्यायचा प्रयन्त करायचो.
पण तू ऐकून घ्यायच्या प्रयतनयात नसायचीस.
तोपर्यंत सांज पाण्यात कलंड़लेली असायची.
मग एकमेकाना न बोलता घरी परतायचो,

शब्दखुणा: 

फक्त तुझ्याचसाठी...

Submitted by Sangeeta Kulkarni on 13 February, 2013 - 22:49

....फक्त तुझ्याचसाठी....

आकाशात असशील तर
चांदणे होवून चमकत राहीन....

देव्हा-यात असशील तर
दिवा होवून जळत राहीन....

ह्र्दयात असशील तर
श्वास होवून जगत राहीन....

मनापासुन प्रेम करते
तुझीच सावली बनुन राहीन....

आली कितीही संकटे
तरी सोडणार नाही साथ
फक्त तुझीच बनुन राहीन....
फक्त तुझीच बनुन राहीन....

शब्दखुणा: 

आरती - संत वॅलेंतिनची

Submitted by मामी on 13 February, 2013 - 13:55

आज एक जागतिक सण साजरा केला जातो. भारतातल्या लोकांनी या सणाचा वसा उशीरा का होईना मनोभावे घेतला आहे आणि तो दरवर्षी यथाशक्ती पार पाडत आहेत. या सणाचा देव, संत वॅलेंतिन याच्या आराधनेकरता खालील आरती तयार केली आहे. भक्तांनी / इच्छुकांनी या आरतीचा आनंद घ्यावा ही विनंती. आरतीतल्या चुका माझ्या, मात्र आरतीचा कर्ताकरविता तो संत वॅलेंतिन आहे याची मला नम्र जाणीव आहे.

जय देव, जय देव, वॅलेंतिनी संता, हो प्रेमाच्या संता
कृपा जगावरी आदि पासूनी अंता, जय देव जय देव ||

येता फेब्रुवारी १४ तारीख, जरी महिना बारीक
भेटवस्तूंचा हा वाहे महापूर
खास व्यक्तींकरता याद्याही होत अन खरेद्या होत

(तस्वीर-तरही) : जीवना केलीस शाळा...

Submitted by हर्षल_चव्हाण on 13 February, 2013 - 08:25

तस्वीर तरहीत माझाही सहभाग... गझल झाली नसल्यास जाणकारांनी कळवावे Happy

चित्रं इथे आहेत

मेघ काळोखे, तळ्याशी झाडही निष्पर्ण झाले,
सांज होता आठवांचे अन् झरे दाटून आले...

गोड होते खूप पाणी, आड होता खोल थोडा,
गाव जिंदादिल् तयांचा, जे जगा पाहून आले...

बंद झाले मार्ग सारे, हात तू सोडून जाता,
काय सांगू मी मनाला? ते तुझ्या मागून आले...

जीवना केलीस शाळा; हे सुखाचे चार मोके,
कोवळ्या माझ्या वयाला, का असे टाळून आले...

कोण आहे मी कुणाचा, काय माझे ठाव आहे?
तारकांनी झाकलेले, दु:ख तेजाळून आले...

शब्दखुणा: 

(तस्वीर-तरही)..जिणे निष्पर्ण झाडागत..

Submitted by वैवकु on 13 February, 2013 - 06:33

जिणे निष्पर्ण झाडागत...मला बहरायचे आहे
फुलोर्‍यांच्या तळ्यामध्ये मला डुंबायचे आहे

शिवाराचा दुकाळी हिरवळीचा हट्ट ; माझाही....
जरी आडात ना पाणी मला शेंदायचे आहे

नशीबी एक रस्ता पण ठिकाणे दोन टोकांना
मला इकडे तुला तिकडे निघत गाठायचे आहे

मला हे माहिती नव्हते शिकवताना तुम्ही बाई
उद्या आयुष्य ह्याच्यातुन मला घडवायचे आहे

इथे अब्जावधी तारे तरी अंधार का सगळा
मनातुन विठ्ठला.. .काळ्या ...तुला काढायचे आहे

________________________

(तस्वीर - तरही) खोळंबुनी सागरकिनारी

Submitted by बेफ़िकीर on 13 February, 2013 - 05:43

या चित्रांनुसार ही गझल आहे.

खोळंबुनी सागरकिनारी वृक्षसुद्धा वाळतो
पण मी तुला भेटायचो ती वेळ अजुनी पाळतो

थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो

सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो

निर्व्याजतेवरती किती जमलेत थर कळते तिथे
शाळा बघितली की कुणी माझ्यातला ओशाळतो

घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्‍यासारखा मी चांदण्या न्याहाळतो

शेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता

Submitted by रसप on 13 February, 2013 - 05:13

शेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता
थवा आठवांचा डोळ्यातच दडला होता

रोज सकाळी जगास वाटे 'उजाडले की!'
लपलेला अंधार तेव्हढा दिसला होता

छान वाटले आरश्यास बोलून तुझ्याशी
तो माझ्याशी गप्पा मारुन थकला होता

मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता

कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता

'जितू' चेहरे हरलेले तू नकोस पाहू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता

'' तस्वीर तरही'' ---एकटा---

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 13 February, 2013 - 01:51

वृक्ष ही नि:शब्द आहे,शांत सागर एकटा
आत खळबळ माझिया का, मी असे जर एकटा?

झुंबडी उडतात बाया बापड्यांच्या एरवी
आड-दोरा- पोहरा,जल संपल्यावर एकटा

तूच माझे विश्व सारे,तूच माझी जिंदगी
हात हातातून होतो सोडल्यावर एकटा

सर्व शिक्षण्,प्रौढ शिक्षण्,लाख झाल्या योजना
वेतनावाचून शिक्षकजन खरोखर एकटा

लाख लुकलुकतात तारे,गर्द आभाळामधे
पण तरी ती और शोभा उजळल्यावर एकटा

--डॉ.कैलास गायकवाड

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन