माझी व्यथा

माझी व्यथा

Submitted by राजेंद्र देवी on 9 August, 2021 - 22:51

माझी व्यथा

क्षण झरता झरता रात्र सरली
आठवण तुझी परी न सरली

वृंदावन शोधीत वणवण फिरलो
चतकोर परी ना सावली मिळाली

विसरणेच आता विसरून गेलो
आठवण तुझी अजून ओली

लोटून दिले भले बुरे क्षण
शोधीत आहे प्रेमाची खोली

जखमाची मज तमाच नव्हती
नाही घातली कुणी फुंकर ओली

माझी कथा ना महाकाव्य परी
आज व्यथा मम गज़ल झाली

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझी व्यथा