गंधित गाणी

शब्दांचे गुंजन गीत

Submitted by पुरंदरे शशांक on 25 June, 2021 - 08:16

शब्दांचे गुंजन गीत

पेरीत थेंब शब्दांचे
खळखळली गंधित गाणी
ओघातून चमकत होते
अर्थाचे अवखळ पाणी

काठावर झुकली तेव्हा
लवलवती लोभस पाती
दर्पणात पाहून घेती
हिरव्याशा निर्मळ ज्योती

झरझरती निर्झर छकुले
बेधुंद स्वैर तालात
लय विभ्रम मोहून टाकी
शब्दांचे गुंजन गीत

Subscribe to RSS - गंधित गाणी