इतर प्रकार

सांडगे (भेंडी + गवार)

Submitted by सायु on 26 May, 2014 - 02:27
लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवार शेंगा : एक कीलो
भेंडी : १/२ कीलो
हिरव्या मिरच्या : ५ -६
जिरे : २ चमचे (चहाचा)
धणे पुड : ४ चमचे (चहाचा)
मिठ : अंदाजे

क्रमवार पाककृती: 

गवार, भेंडी स्वच्छ धुवुन, पुसुन घ्या... गवारी च्या शेंगाचे देठ खुडुन एका शेंगेचे दोन तुकडे असे प्रतेकी करुन (वीळीने चिरल्या तरी चालतील) मिक्सर मधुन भगराळ गिरवुन घ्या... प्रत्येक घाण्यात थोडया शेंगा दिसल्या पाहिजेत...
आता भेंडी जशी भाजीला चिरतो तशीच चिरायची.. पहीला घाणा गिरवतांनाच ५, ६ मिरच्या घालुन भेडी
बारिक गिरवुन घ्या. चांगला लगदा तयार झाला पाहिजे.. उरलेली भेंडी मात्र जाडसर गिरवायची...

सगळे गिरवलेले जिन्नस परातीत काढुन घ्या... त्यात जीरं, धणे पुड, मिठ घालुन व्यवस्थीत कालवुन घ्या.
ताटाला तेल लावुन त्यावर मोठे वडे टाकावेत, ताटावरच त्याला आकार दयावा,(पातळ/ चपटे नको, मोठे फुगीर हवेत+ हातावर सांडगा घालु नये)३,४ तासानी सराटयानी उलथवुन दुसर्‍या बाजुने उन दाखवावे... दुसर्‍या दिवशी सांडगे बर्‍यापैकी वाळ्लेले असतात ते परातीत काढुन दिवस भर उन दाखवावे... चांगले वाळले की बंद डब्यात ठेवावे..

तळतांना मात्र तेल चांगले गरम झाले की गॅस बंद करुन द्यावा आणि मग एक एक सांडगा तळुन काढावा... (सांडगा नाजुक असतो म्हणुन लवकर जळायची भीती असते)

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु
अधिक टिपा: 

या सांडग्यांसाठी शेंगा/ भेंडी कोवळीच पाहिजे असे नाही... जरड किंवा आठवडी बाजारातुन भाजी आणली आणि
करायला झाली नाही... तर विल्हेवाट लावायची एक उत्तम तर्‍हा आहे... नेहमीच्या गाजर, पानकोबी, पपई,टोमाटो
पेक्षा हा प्रकार कमी कष्टाचा आणि रुचकर आहे....

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
ऑफीस मधली मैत्रिण सौ.माधुरी गेडाम

Enchilada (एंचिलाडा) - मेक्सिकन मेनू (फोटोसहित)

Submitted by गोपिका on 16 May, 2014 - 19:57
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१. Corn Tortillas (तॉर्तियास)
२.चेडर चीझ

स्टफिंग साठि :
१. बरीक चिरलेलि शिमला मिर्चि - २ कप
२. बारिक चिरलेला कांदा - १ कप
३.शिजवलेला राजमा - १.५ कप
४. चवीपुरते मीठ
५.तेल - २ चमचे

सॉस बनवण्यासाठि
१. मैदा - २ चमचे
२.जिर्‍याचि पूड - १ चमचा
३.लाल तिखट पूड किवा पॅप्रिका - १.५ चमचा
४.चिपोत्ले सॉस - १.५ चमचा (पॅप्रिका न वापरता फक्त लाल मिर्चि पूड वापरत असल्यास.नाहि तर गरज नाहि)
५.लसणाचि एक पाकळि - चिरून किंवा ठेचून
६.ओरेग्नो(oregano) - ३/४ चमचा
७.थाइम (Thyme) - ३/४ चमचा
८.टोमेटो क्रश - १ कप
९. मीठ चवीपुरते

क्रमवार पाककृती: 

प्रथम कॉर्न तॉर्तिया भाजून घ्यावे (हे म्हणजे मक्याचि भाकरीच )
स्टफिंग :
कढईत तेल घालून्,मध्यम आचेवर ठेवावे.तेल थोडे तापले कि चिरलेलि शिमला मिर्चि व कांदा त्यात परतायला ठेवावा.दोन्हि नीट शिजल्यावर त्यात शिजलेला राजमा (पाण्यासकट) घालाव,मीठ घालावे अजुन १० मिनिटे उकळू द्यावे.नंतर गॅस बंद करून झकून ठेवावे.

सॉस
मध्यम आचेवर कढई ठेवावि.त्यात मैदा भाजायला सुरुवात करावि.(करपणार नाहि याचि काळजि घ्या).मैदा होत आला कि त्यात जिर्‍याचि पूड घालावि.म्हणजे तीहि भाजलि जाते.लगेच पाणि घालावे(साधारण पाऊण लिटर).त्यात वर दिलेल्या सगळे साहित्य घालून चांगले शिजवून घ्यावे.सॉस जरा दाट असूद्या

आता अवन ३५० फॅ ला प्रीहीट करायला ठेवावे.
एका अवन सेफ ट्रे मध्ये थोडा सॉस ओतुन ठेवा.
दुसर्‍या एका उथळ भांड्यात थोडा सॉस घ्या,प्रत्येक तॉर्तिला त्यात बुडवून घेऊन मग त्यात स्टफिम्ग भरून जोडलेलि बाजु तळाला असेल असे ट्रे मध्ये ठेवा.असे एकाबाजूला एक असेंबल करतजा.
सगळे तोर्तियास बुडतील इतक सॉस परत ओता.
त्यावर चेडर चीज वरून घाला.
आता ३० मिनिटांसाठि अवनमध्ये बेक करायला ठेऊन द्या.

तीस मिनिटानंतर बाहेर काढून सर्व्ह करा

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठि
अधिक टिपा: 

१.नॉनवेज स्टफिंग करू शकता
२.वरच स्टफिंग बनवताना,१/४ कप वाईन घातलि कि अजून छान लागत.
३.चेडर चीझ नसल्यास्,मोझरेला चीझ वापरू शकता
४.तॉर्तियास उपलब्ध नसल्यास मक्याचा किंवा ज्वारिचा छोट्या भाकर्‍या(घरीच बनवलेल्या) बिंधास्त चालतात
४.कृति मोठि वाटत असलि तरी खूप सोपि रेसिपि आहे
५.फोटो प्रतिसादामध्ये देत आहे

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
माझि मैत्रीण अनीशा

परपल प्लम आईस्क्रीम

Submitted by सावली on 12 May, 2014 - 12:00
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुध - १ वाटी/कप
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप
जांभळे - १५/१६
साखर - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

सुरी वापरुन बियांच्या बाजुचा गर काढुन घेतला.
बाकी सर्व कृती मुग्धटलीच्या 'नॅचरल्स आइस्क्रीम' इथल्या प्रमाणेच करावी.

अधिक टिपा: 

जांभळाचा अतिशय सुरेख रंग आणि तितकीच सुरेख चव येते.
जांभळाला खरेतर ब्लॅक प्लम असे म्हणतात पण जांभळा रंग छान दिसतोय म्हणुन परपल प्लम असे नाव.
त्याच कृतीचा वेगळा फ्लेवर , पण नंतर शोधायला सोपा जावा म्हणुन इथे देत आहे

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
मायबोलीवरची मुग्धटलीची रेसिपी

कूकिज् एन् क्रिम आईसक्रिम

Submitted by मंजूडी on 12 May, 2014 - 01:02
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप दूध
२ कप मिल्क पावडर
१ कप अमूल फ्रेश क्रिम
ओरीओ बिस्किटांचा व्हॅनिला फ्लेवरचा मोठा पुडा (२० रुपयेवाला)
चवीप्रमाणे साखर
२-३ थेंब व्हॅनिला एसेन्स

क्रमवार पाककृती: 

दूध आणि मिल्कपावडर एकत्र करून एकदम गुळगुळीत ब्लेंड करून घ्या. ओरीओ बिस्किटं एकेक उघडून त्याचं क्रिम काढून या मिश्रणात घाला. ब्लेंड करा. आता अमूलचं फ्रेश क्रिम आणि व्हॅनिला इसेन्स घालून मस्तपैकी पाच-सहा मिनिटं ब्लेंड करा. मिक्सरपेक्षा ब्लेंडरने केलं तर आईसक्रिमचा पोत जास्त छान येईल. मिश्रणाची चव बघून आवडीप्रमाणे साखर मिसळा. ओरिओ बिस्किटांचा ओबडधोबड चुरा यात घालून चमच्याने ढवळून डीप फ्रिजमधे सेट व्हायला ठेवा. थोडा चुरा वरून टॉपिंगसाठी घाला.

सेट झाल्यावर गारेगार क्रिमी आईसक्रिम चाटूनपुसून खा. हा फ्लेवर अगदी अमूलच्या कूकिज् एन् क्रिम फ्लेवरसारखा लागतो.

cookies n creme.jpg
वाढणी/प्रमाण: 
अमूलचा एक लिटर आईसक्रिमचा टब भरून आईसक्रिम होते.
अधिक टिपा: 

मुग्धटलीच्या लोकप्रिय धाग्यावर प्रतिसादांनी ४०० चा टप्पा ओलांडलेला आहे. तिथे प्रतिसादात ही पाककृती लिहिली तर पुढच्या प्रतिसादांमधे हरवून जाईल. आणि मग मागची पानं शोधत बसावी लागतात. म्हणून हा वेगळा धागा. बाकीचेही मायबोलीकर जे असा वेगळा फ्लेवर करून पाहतील त्यांनी स्वतंत्र धाग्यावर त्याची पाककृती लिहावी ही विनंती.

मी पहिली बॅच केली तेव्हा त्यात फ्रेश क्रिम घातलं नव्हतं. त्यामुळे ते सेट व्हायला खूपच (२४ तास) वेळ लागला. मग पुढची बॅच केली तेव्हा कविन, मेधा२००२ सावलीने सुचवल्याप्रमाणे फ्रेश क्रिम घालून केली आणि ती फारच छान झाली.

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
मुग्धटली - http://www.maayboli.com/node/45309

सुरनोळे

Submitted by शैलजा on 6 May, 2014 - 10:20
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कलिंगडाच्या सालीचा आतील पांढरा गर - १ वाटी
तांदूळ - १वाटी
चिरलेला गूळ - २ टेस्पू
खवलेले खोबरे - साधारण पाव वाटी, थोडे कमी असले तरीही चालेल.
चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

पूर्वी आज्जी असताना काही अगदी टिपिकल पाकृ ती बनवत असे. कलिंगड आणले की एकदा तरी हे सुरनोळे बनत असत. असेच परवा कलिंगड आणले आणि ही पाकृ आठवली. नीटशी आठवेना म्हणून रसचंद्रिका ह्या पुस्तकाचाही आसरा घेतला. साधारण तशीच कृती पुस्तकातही दिलेली आहे. तर, ही कृती -

१. एक वाटी तांदूळ ४-५ तास भिजत ठेवावे. सकाळी तांदूळ भिजत घातले की धिरड्यासाठीचे पीठ संध्याकाळी वाटता येईल.

२.. कलिंगडाच्या सालीच्या आतील पांढरा गर काढून घेऊन अगदी बारीक चिरावा वा किसणीवर किसून घ्यावा. हा गर कापून घेताना अगदी सालीलगत कापू नये, तसे कापले की हिरव्या सालीचा कडूसरपणाही त्या गरात उतरेल आणि मग धिरडी कडू व्हायची शक्यता असते.

३. वाटताना, कलिंगडाचा गर, तांदूळ व ताजे खोबरे एकत्र वाटावे. त्यात गूळ घालावा व रात्रभर पीठ झाकून ठेवावे.

४. डोश्यासाठी पीठ असते तसे सरसरीत करावे. वाटताना खूप पाणी घालायची गरज नसते, कारण कलिंगडाच्या गरालाही भरपूर पाणी सुटते. ते वापरावे व नंतर गरजेप्रमाणे पाणी घालावे. चवीपुरते मीठ घालावे.

५. दुसर्‍या दिवशी धिरडी काढावी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

गूळ घालून गोडसर बनवतात तसेच आले, हिरवी मिरची घालून तिखटही बनवता येईल.

रसचंद्रिकामधील टिपा -

१. थंडीच्या दिवसांत अर्धा कप दूध व अर्धा कप ताक मिश्रणात घालावे.
२. याचप्रमाणे काकडीची धिरडी बनवता येतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक व रसचंद्रिका हे पुस्तक.

किन्वा बिर्याणी

Submitted by मीपुणेकर on 30 April, 2014 - 21:17
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१>किन्वा - ३ वाट्या
२>खडा मसाला : तमालपत्र -१, जीरे- फोडणीचा चमचा भरुन, दालचीनी- पेरभर २ तुकडे, मसाला वेलची -१ मोठी, काळीमिरी - ४,५ दाणे भरडून
३>जीरे धणे पावडर - प्रत्येकी एक चमचा, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला - १ चमचा
४>आलं, लसुण, मिरची वाटून किंवा अगदी बारीक चिरून - प्रत्येकी एक चमचा
५>भाज्या - १ लहान कांदा, १ टोमॅटो + बीन्स, गाजर, लाल/हिरवी सिमला मिरची, फ्लॉवर चे तुरे, बटाटा, मटार, मक्याचे दाणे (या पैकी सर्व किंवा आवडतील त्या भाज्या एकूण ३ वाट्या)
६>फोडणीसाठी तेल - २ चमचे,
७>लिंबाचा रस - २ चमचे, पाणी - ५ वाट्या
८>हळद - अंदाजाने,मीठ - अंदाजाने
बारीक चिरलेली भरपूर कोथींबीर बिर्याणीवर घालायला

क्रमवार पाककृती: 

१>सर्वप्रथम किन्वा पाण्यात स्वच्छ धुवून मग त्यात किन्वा बुडेल ईतके पाणी घालून भिजत ठेवावा (१५ मि.) तोपर्यंत बाकीची तयारी करुन घ्यावी.
२> कांदा उभा बारीक चिरुन घ्यावा, ईतर सर्व भाज्या चिरुन घ्याव्या.
३>फोडणीचे तेल तापत ठेवावे, तेल तापले कि जीरे व ईतर खड्या मसाल्याचे साहित्य एकेक करुन घालून किंचीत परतून घ्यावे.
४>मग बारीक पातळ चिरलेला कांदा फोडणीत टाकून परतून घ्यावा.
५>आलं लसूण्,मिरचीचा ठेचा फोडणीत घालून परतून घ्यावा.
६>कांदा सोनेरी ब्राऊन झाला कि भिजवलेला किन्वा घालून २ मि. परतावा ( त्या आधी किन्वा छान निथळून घ्यावा, किन्वा भिजवलेले पाणी बागेत झाडाला घालावे Wink )
७>त्यात सिमला मिरची व टोमॅटो सोडून बाकी भाज्या घालून हळद, जीरे धणे पावडर घालून २ मि. परतावे.
८> आता पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे, बिर्याणी मसाला/गरम मसाला व लिंबाचा रस घालावा.
९> पाण्याला उकळी आली की मिश्रण नीट हलवून झाकण लावून मंद गॅसवर १५ मि. ठेवावे.
१०>१५ मि. ने झाकण काढून त्यात सिमला मिरची, टोमॅटो घालावे. एव्हाना बिर्याणी शिजत आली असेल . अजून थोडा वेळ ~१० मि. मंद गॅस वर शिजवावी.
११>तयार बिर्याणी चिरलेली बारीक कोथींबीर घालून ताक /दही /रायता /पापड /लोणचं बरोबर सर्व करावी.

वाढणी/प्रमाण: 
जर हाच पदार्थ मुख्य जेवण म्हणून असेल तर ३,४ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. बिर्याणीमध्ये मऊसर पडलेली सिमला मिरची मला आवडत नाही, जरा क्रंची छान लागते. टोमॅटो पण रस न होता अखंड तुकडा दिसेल ईतपतच वाफवलेले आवडतात, त्यामुळे ते खूप वेळ शिजवलेले नाहीत. पण तशी काही अट नसेल तर ईतर भाज्यांबरोबर या घालता येतील Happy
२. बिर्याणी मुरल्यावर दुसर्‍या दिवशी जास्त छान लागते.
३. ही बिर्याणी नेहेमीच्या साग्रसंगीत बिर्याणीपेक्षा खूप कमी वेळात होते, चवीला अतीमसालेदार होत नाही.
४. यामधे बाकी ऐच्छीक मालमसाला (पुदीना, तळलेला कांदा, काजू ई) वगैरे आवडीनुसार वापरुन बघता येइल.
५. शेवटी भाताची बिर्याणी ती भाताची बिर्याणीच, ही किन्वा बिर्याणी काही चवीत त्याची १००% रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. Happy पण किन्वा पोटात जाण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या पदार्थात हा प्रकार आवडीने खाल्ला गेला.

माहितीचा स्रोत: 
खरतर सुरवातीला नेहेमीची भाताची बिर्याणी करतो त्याप्रमाणे तांदुळाऐवजी किन्वा वापरला. मग दरवेळी किरकोळ फेरफार करत जसे की मसाल्याचे प्रमाण, किन्वा पूर्ण शिजून पण मोकळा रहाण्यासाठी पाण्याचे प्रमाण, पदार्थ शिजण्याचा वेळ ई आता या प्रमाणे करते.

चवळ भाजीचे कोफ्ते

Submitted by निलीमा on 28 March, 2014 - 03:48
लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चवळ भाजी १ पाव (बारीक पानावाली)
कांदे ३ बारीक चिरलेले
हिरवी मिर्ची ४ बारीक कापुन
मुठभर तुरीची व मुगदाळ (सोल) गॅसवर भाजुन घेऊन बारीक करावी
थोडेसे बेसन
चविला तिखट मिठ
रस्स्यासाठी
टमाटे ३
लसुन , आले थोडे, आवडता मसाला

क्रमवार पाककृती: 

चवळ भाजी बारीक चिरून त्यात चिरलेला कांदा, भाजलेया डाळी व थोडे बेसन यांचे मिश्रण करुन वडे थापा, हे वडे इडली कुकरमधे वाफऊन घ्या.

आता टमाटे, लसुन, आले मिक्सर म्धुन पातळ होईतो बारीक करुन घ्या व तेलात भाजीचा रस्सा करतात तशी फोडणी ध्या. थोडे घट्ट होईतो गॅसव्रर ठेवा.

आता पोळीसोबत वाढायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी पुरते.
अधिक टिपा: 

वडे रस्स्यात सोडु नये, स्वतंत्रपणे वाढावे

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

चिक्कड छोले ,भटुरे आणि शिरा(फोटोसहित)

Submitted by देवीका on 28 March, 2014 - 00:55
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

test.jpg

चिक्कड छोले हा एकदम लज्जत्दार प्रकार आहे. थंडीच्या दिवसात हा नाश्ता अगदी मस्त आहे.
चिक्कड म्हणजे चिखलासारखा(अगदी हाच अर्थ आहे). बर्‍याच वेळ मंद आचेवर ठेवून जे मिळून येतात ते चिक्कड दिसतात. चवीला अफलातून लागतात.

शिरा तर आपल्या घरोघरी बनतो म्हणून त्याची कृती इथे देण्यात वेळ वाया घालवत नाही.
चिक्कड छोले जिन्नसः
१)
१ वाटी काबुली चणे भिजवून,
पाव वाटी लाल मसूर डाळ भिजवून
२ पेला उकळलेला चहा(बिनसाखरेचा)
२)
१ वाटी दही,
चिक्कड मसाला: धणे, जीरं, बडीशेप, डाळींब पूड(प्रत्येकी २ चमचे); २-३ चहा वेलची, काळं मीठ(चवीनुसार), १ मसाला वेलची, ३-४ लवंग दाणे, पाव इंच दालचिनी तुकडा,तेजपत्ता,पाव चमचा कलौंजी,चिमूटभर केशर,जायपत्री. हे सर्व वेगवेगळे भाजून वस्त्रगाळ पूड. ह्यात गरम मसाला व लाल मसाला एकत्र दह्यात घोटून ठेवा.
३)
१ बारीक चिरलेला कांदा
१ मोठा टोमॅटो उकडून वाटलेला
आल लसूण पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
चिरलेली कोथींबीर

भटुरे:
१ वाटी मैदा
पाव वाटी कणीक,
२ चमचे रवा,
२ चमचे साखर,
मीठ
२ चमचे दही
२ चमचे ड्राय यीस्ट
तेल लागेल तसे.

क्रमवार पाककृती: 

सर्वात आधी भटुरेची पीठं व इतर जिन्नस एकत्र करून लागेल तसे पाणी घालून जरा घट्टच भिजवावे व तेलाचा हात लावून झाकून ठेवावे.

छोले करायला घ्या
१)जिन्नस १ एकत्र करून , त्यात चहा टाकून कूकरला उकडून घ्यावे तीन ते चार शिट्या काढून.
२)त्यातले पाणी काढून दही मसाला मध्ये घालून ठेवा.
३)जिन्नस ३ पदार्थ वापरून खालील प्रमाणे फोडणी करावी.
मुख्य कृती:
तेल टाकून (सढळ हाताने टाकले तरी चालेल) त्यात आधी कांदा परतून घेवून मग हिरवी मिरची,टोमॅटो रस व आलं लसूण पेस्ट टाकून तेल सुटेतोस्वर परतावे.
आता छोले टाकून थोडया वेळ परतून झाले की पाण्यासकट भिजलेला मसाला टाकून मंद आचेवर शिजवत ठेवावे. मधून मधून जरासे घोटावे. आच एकदम मंद करून वीस मिनीटे ठेवून द्यायचे.
मग चिरलेली कोथींबीर टाकून आच बंद करावी.

त्या वीस मिनीटात शिरा करून घ्यावाआणि मग भटुरे करावे. भटुरे हे जरा जाडसर लाटून तळून घ्यावे. सर्व पदार्थ एकत्र खायला घ्यावे. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

मंद आचेवर ठेवले असताना जर पाणी कमी वाटत असेल तर एकदाच थोडं गरम कढत पाणी टाकून मंद आचेवर ठेवावं.
चहा बनवताना फक्त त्यात खिसलेले आलं,एखाद लवंग व वेलची दाणा घालून उकळून गाळून घ्यायचा.
लाल मसाला म्हणजे कोणताही घरी असते ते लाल तिखट. साजुक तुपात परतले छोले तर आणखी छान लागते, मसाला मस्त फुलतो.
काळं मीठच वापरावे. त्याला एक वेगळी चव असते.
मी फक्त कणीक,रवा घेवून सुद्धा केलेत भटुरे, चांगले लागतात.

प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
पडोस की अस्मा

दोसा

Submitted by प्रीति on 14 March, 2014 - 10:55
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दोसा-
२ वाटी ब्राऊन/बासमती तांदुळ
१ वाटी उडद दाळ
१/४ टि.स्पुन मेथ्या
मीठ

चटणी -
१:१:१:१:१ प्रमाणात भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही
हि. मिरच्या, मीठ
फोडणीसाठी-
तेल, लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता

सांबार-
१ वाटी शिजलेली तुर डाळ
१/२ वाटी एमटीआर सांबार पावडर, कमी तिखट वाल्यांसाठी १/३ वाटी
२ वाट्या हि.भोपळ्याच्या १ इंच लांबीच्या फोडी
शेवग्याच्या शेंगा उकडुन
कांदा, टोमॅटो लांब चिरुन
जिरे, मोहोरी, मेथ्या, तेल
गुळ, चिंचेचा कोळ, मीठ, तिखट चवीनुसार

बटाट्याची भाजी-
४-५ मध्यम बटाटे उकडुन फोडी करुन
कांदा उभा चिरुन
१ चमचे आलं, हि.मिरची पेस्ट
जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता, तेल
लिंबु/साईट्रिक अ‍ॅसिड

क्रमवार पाककृती: 

दोसासाठीचे जिन्नस, मीठाशिवाय ७-८ तास भिजऊन मिक्समधुन बारीक करावे. नंतर त्यात मीठ घालुन उबेला ठेवावे. जर हवामान खुप उष्ण असेल तर मीठ घालु नये. बरेच थंड असल्यास शाल पांघरुन बंदिस्त ठिकाणी ठेवावे.
जेव्हा भाजी आणि सांबार करायला घ्याल त्या शेजारी हे पीठाचे भांडे ठेवल्यास अजुन पीठ मस्त फुगते.

चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही, हि. मिरच्या, मीठ मिक्सरवर एकदम बारीक करावे, लागल्यास थोडे पाणी किंवा दही घालावे. वरतुन लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्त्याची
खमंग फोडणी द्यावी.

भाजीसाठी जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता फोडणी करुन कांदा मस्त परतुन घ्यावा मग आलं, हि.मिरची पेस्ट परतुन हळद, मीठ आणि लिंबु/साईट्रिक अ‍ॅसिड टाकुन मिक्स करुन बटाट्याच्या फोडी टाकाव्या.

सांबारासाठी जिरे, मोहोरी, मेथ्याची फोडणी करुन कांदा परतल्यावर, टोमॅटो आणि भोपळा शिजवुन घ्यावा. शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवुन भोपळा शिजल्यावर घालाव्या. हळद, चिंचेचा कोळ घालुन परतावे. मग तुरीची शिजलेली दाळ, १० वाट्या पाणी घालावे. त्यात एम्टीआर पावडर, मीठ, गुळ घालुन चांगले उकळु द्यावे. पातळ वाट्ल्यास थोडी अजुन पावडर घालावी.

सगळं रेडी झाल्यावर गरमा गरम दोसे घालावे आणि भाजी, चटणी, सांबार सोबत खावेत.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसे
अधिक टिपा: 

ब्राऊन राईसचे दोसे पण मस्त होतात, फक्त रंग वेगळा येतो. जमल्यास दोसे घालायचा व्हिडिओ टाकेन.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

बनपुरी

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 11 March, 2014 - 06:39
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो मैदा

१२ केळी

दोन वाटी दही

जिरे

साखर

क्रमवार पाककृती: 

एक किलो मैदा, १२ केळी , लागेल तितके दही घालावे. साखर, जिरे मिसळून मळून रात्रभर ठेऊन द्यावे. पीठ मळायला लागेल तितके दहीच घालावे. पाणी अजिबात घालू नये.

सकाळी त्याच्या पुर्‍या करुन तळाव्यात

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

इडलीवडा वाल्या कर्नाटकी आण्णाच्या दुकानात आज हा नवीन पदार्थ दिसला, त्याने रेसिपी दिली.

पुर्‍या अगदी स्पाँजी होतात. तेलही जास्त पीत नाहीत.

मैद्याऐवजी गव्हाचे पीठ / आटा वापरुन करता येईल का?

या पुर्‍या दोन दिवस टिकतात.

कसलीही भाजी, चटणी, सांबार याबरोबर खाता येतात. नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
माहितीचा स्रोत: 
दुकानवाला

Pages

Subscribe to RSS - इतर प्रकार