रंगपंचमी. होळी

रंगुनी रंगात सार्‍या

Submitted by शंतनू on 29 March, 2021 - 07:12

२००८ ची गोष्ट आहे. कामानिमित्त मुंबईला राहत होतो, तेव्हा एक मित्र मला म्हणाला 'परवा होळी आहे. येणार का रंगपंचमी खेळायला?' पुण्यात सदाशिव पेठेत बालपण घालवलेला मी ह्या प्रश्नावर साडेतीन ताड उडालो. माझ्यातला व्याकरण-नाझी जागा झाला. होळीला रंगपंचमी कशी काय? मुळात 'पंचमी' ही तिथी होळीपौर्णिमेनंतर ५ दिवसांनी येते त्यामुळे 'पौर्णिमेला पंचमी खेळणे' म्हणजे ख्रिसमसच्या रात्री फटाके उडवून हॅप्पी न्यु यिअर करणे किंवा संक्रांतीला ध्वजवंदन करून गणतंत्रदिन (चिरायू होवो वगैरे) साजरा करणे अशी क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रंगपंचमी. होळी