पावसाळ्यास माझ्या तेव्हा

पावसाळ्यास माझ्या तेव्हा, खरी सुरवात होऊ लागली...

Submitted by Pratik jagannat... on 21 September, 2020 - 13:29

अंगणातील कपड्यांची तोरणे जेव्हा घरात सजू लागली;
पावसाळ्यास माझ्या तेव्हा, खरी सुरवात होऊ लागली..

टपटप गळत्या छतास जेव्हा, रास भांड्यांची लागु लागली;
जुन्या पडक्या पाट्यास जेव्हा ओल मिठी मारू लागली...

जोरच्या येणार्‍या वार्‍या मुळे विजेचा लपंडाव सुरू झाला;
अन कुशीत मला निजवूनी मग, आई वारा घालू लागली...

कामावर जाताना बाबांच्या डोक्यावर पिशवी प्लास्टिक चि दिसू लागली;
घरास चार माणसांच्या जेव्हा, गरज छत्रीची भासू लागली...

जुन्याच घराची डागडुजी करताना सकाळची संध्याकाळ होऊ लागली;
निश्वास टाकूनी अखेरचा मग, शांती मनास वाटू लागली...

Subscribe to RSS - पावसाळ्यास माझ्या तेव्हा