#पाऊस #पाऊस

पाऊस तरी कुठे ,सर्वांसोबत एकसारखा वागतो ...?

Submitted by राजश्रेणू on 17 September, 2020 - 06:46

पाऊस तरी कुठे, सर्वांसोबत एकसारखा वागतो....?
कोणासाठी बरसतो तर कोणासाठी कोसळतो
प्रत्येकासाठी वेगवेगळे रूप धारण करतो
बरसताना,
कोणाच्यातरी मनाला प्रेमसरीने भिजवतो..
कोसळताना,
कोणाच्यातरी फाटक्या छतातून आणि डोळ्यातूनही वाहतो...
पाऊस तरी कुठे,सर्वांसोबत एकसारखा वागतो.....?
पावसात काही मन आठवणीने ओसंडून वाहणारी .....
काही मने, देह न भिजण्यासाठी आडोसा शोधणारी.....
कोण टपरीवरच्या चहासोबत भजी खातो....
कोण छतातून वाहणारे पाणी भांड्यात साठवतो...
पाऊस तरी कुठे सर्वांसोबत एकसारखा वागतो.....?
पण मला वाटतं फक्त पाऊस

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #पाऊस #पाऊस