मातोश्री वारंवार हिंट द्यायला लागल्या तेव्हा म्हटलं, आता ते जुनं कपाट आवरुनच टाकावं. ( हिमालयाच्या थंड कुशीतला निद्रिस्त ज्वालामुखी जागा होवून ऊसळण्याआधी आवश्यक कारवाई केलेली बरी असा सुज्ञ विचार त्यापाठी होताच.)
तशी 'मी फार हुशार आणि गुणी मुलगी आहे' हे माझं स्वतचं असं मत आहे.आणि ही पोस्ट वाचणारे वाचक माझ्या मित्रयादीच्या कक्षेत येत असल्याने त्यांनाही हे मत पटलेलं असल्याची शक्यता अगदी दोनशे टक्के आहेच.
(
)
तर ते असो !
काल सकाळी उठल्या उठल्या बायको मला म्हणाली, "तुका किते सांगपाक जाय ". मी म्हटल, "बोल". "मुन्नीला आज सकाळी, पहाटेला, घरांत भूत दिसलं". कन्यारत्नाला (व. वर्षे ८ ) चार-पाच दिवसापासून ताप येत आहे. त्यामुळे दिवसभर ती झोपून असते. काल पहाटेला तिला झोप येत नव्हती व ती डोळे उघडे ठेवून जागी होती. इतक्यात म्हणे तिच्या खेळण्याच्या खोक्यातून एक पांढरी शुभ्र आकृती बाहेर आली आणि हवेत तरंगू लागली. दुसऱ्याच क्षणाला, त्या भूताच डोकं धडापासून वेगळ झालं आणि खाली पडलं. मग ते डोकं नसलेले धड तसेच हवेत झुलू लागलं.
मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.
मुंजीचा कानमंत्र
काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।
प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥
हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।
नियोजिलेले काम बुद्धीने हात पाय करतात ॥
बुद्धी असता लुळे पांगळे मात करी व्यंगा ।
अंध सुरदासाची रचना सदा मना सांगा ॥
आळविता का जेव्हां तेव्हां, देव कुठे आहे?।
ओळखिले नाही का तुमच्या देव मनामधी आहे ॥
आळविण्याचा अर्थ असे की मला निग्रही बनवा ।
"ओ पाव्हन, आव इकडं कुठ आज? या कि बसू जरा पाराखाली"
"काय सखाराम, कसा आहेस मित्रा?"
"हाय आता जसा हाय तसा तुमच्या म्होरं" "तुम्ही बोला, आज इकड काय काम काढलं बाय्कुच्या माहेरला?"
"अरे होतं जरा काम!"
"व्हय, राहतंय तुम्च काम! मास्तर होते न जणू तुम्ही?
" होतो रे पण आता रिटायर झालो"
"म्हंजी आता घरीच का?" "आता काय कामधाम करायला नको तुम्ला"
"अरे आयुष्य गेल काम करण्यात आता घरी बसून कुठ करमणार आहे का?"
"हा, म्हणी तुम्ही काम केलं, शाळात बसून लई त लई पोरांच्या टेर्या झोडल्या असतील"
"हा हा हा!!!"
"हसता काय? बायकू-पोर्ह कुठ आहे?"
"अरे अस काय करतोस सखाराम, अरे हिला जावून दोन वर्ष झाले"
''पनिशमेन्ट! आता तुला नाऽऽ पनिशमेन्टच मिळणार!!'' आर्या चित्कारली. तिच्या आवाजात विजयाची झाक होती.
''पण मी काहीच केलं नाही!'' हर्षचा स्वर जरा रडवेला वाटत होता.
'' नो, नो.... तूच तर माझा हेअरबॅन्ड वाकवत होतास... मी म्हटलं होतं तुला तो मोडेल म्हणून...''
''ए, मी काय तो जास्त नाही वाकवला...''
''पण मोडला बघ हेअरबॅन्ड.... आता तुला पनिशमेन्ट!!''
आजी आतल्या खोलीतून वर्तमानपत्र वाचता वाचता आपल्या दोन्ही नातवंडांचे संवाद ऐकत होती.
हानाको आणि अकिको या दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी. रांगत्या असल्यापासून एकत्र खेळायच्या. एकमेकींच्या अंगणात मस्ती करायच्या. एकत्र खाऊ खायच्या, नाचायच्या. आणि पुढे एकत्र शाळेत जाऊन अभ्यासही एकत्र करायच्या. शाळेत तर त्यांना बहिणी बहिणीच समजत इतक्या त्या बरोबर असायच्या.
त्यादिवशी एक कापसाची म्हातारी मला आणि लेकीला दिसली. ती पकडे पर्यंत उडत उडत दुर गेली. आणि ती गेली म्हणुन लेकीने भोकाड पसरलं. ते आवरायला हि गोष्ट इंस्टंट्ली सुचली आणि तीला सांगितली. त्यानंतर परत संध्याकाळी एक म्हातारी दिसली तर तीने तीला उडून दुर जाउ दिलं !
-----