कोरोना जगभर फिरुन भारतात आला

अशक्य ते शक्य केलं कोरोनाबाबांनी

Submitted by मिरिंडा on 16 July, 2020 - 06:11

कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंब ईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली ,मग ती सरकारी असोत की खाजगी. टपप्प्यानी कार्यालयात जाण्याची पद्धत सुरु झाली. एरवी नियमित दांड्या मारणारे कर्मचारी "आता मी कधी ऑफिसला जाणार असं मानभावीपणे विचारु लागले. खरंतर त्याना बरंच वाटत असावं. जसं काही हे कर्मचारी सगळं ठीक होतं तेव्हा नियमित ऑफिसला जात होते. आता रजेसाठी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रं पर्यायानी मेडिकलची बिलं देण्याची गरज उरली नाही.

Subscribe to RSS - कोरोना जगभर फिरुन भारतात आला