विश्वास...

विश्वास...

Submitted by Swati Karve on 15 June, 2020 - 14:02

विश्वास …
संध्याकाळी पाऊस पडून गेल्यानंतर ,
सोनेरी प्रकाशाने नाहून निघालेलं ते  सुंदर आकाश
अंगणात बहरलेला मोगरा, ओल्या मातीचा धुंद सुवास,
आठवणींचा कल्लोळ, 
मनात दाटून आलेली तुझ्या 
भेटीची तीव्र आस,
आणि दूर असलो तरीही, 
सात्विक तेजाने मन व्यापून टाकणारा, आपल्या नात्यावरचा गाढ विश्वास!

- स्वाती

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विश्वास...