ती रात्र

ती रात्र

Submitted by सचिन चंद्रकांत ... on 23 May, 2020 - 12:50

.... ती रात्र ....

चांदण्याच्या रात्री,
स्वप्न मी बघत होतो...

का कोणास ठावूक,
मी आज तिला बघत होतो...

रात्रीच्या त्या अंधारात,
मी उघड्या डोळ्याने तिला रेखाटत होतो...

काळ्याकुट्ट प्रकाशात,
मी माझ्या स्वप्नांचे रंग भरत होतो...

ना होती तिची नि माझी ओळख
पण त्या रात्री मी तिला,
स्वप्नात माझ्या बघत होतो...

✒️सचिन चं लावणे....

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ती रात्र