हर्ड इम्युनिटी

हर्ड इम्युनिटी जगाला / भारताला खरंच वाचवू शकेल ?

Submitted by छज्जातील बंडीही... on 15 May, 2020 - 10:38

जगातले प्रगत देश हर्ड इम्युनिटीचा दाखला देऊन लॉकडाऊनला विरोध करत आहेत. ८०% लोक आपोआप बरे होत आहे हे अगदी बरोबर आहे. पण आजवर जे तीन लाख दोन हजार मृत्यू झाले आहेत ती प्रत्येक केस कुठल्या ना कुठल्या कुटुंबावर कोसळलेले आभाळ आहे. यातले ८६०००+ एकट्या अमेरिकेतले आहेत.

वुहान मधले मृत्यूचे तांडव लॉकडाऊन नंतरच नियंत्रणात आले. जर्मनीची साथ लॉकडाऊनने आटोक्यात आली. दक्षिण कोरियानेही नियंत्रण मिळवले.
व्हिएतनाम या देशाचे कौतुक. वैद्यकीय सुविधा तुटपुंज्या असतानाही शून्य मृत्यू.
चीनच्या आजूबाजूच्या अनेक राष्ट्रांनी कोरोना नियंत्रणात ठेवला.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - हर्ड इम्युनिटी