#PrincessDiana #भटकंती

डायना मावशी आणि शनिवारची दुपार.

Submitted by abhishekraut on 10 May, 2020 - 02:15

डायना मावशी अर्थात प्रिन्सेस डायना हिच्या बद्दल मला सगळ्यात पहिले ज्या पद्धतीने कळलं तो दिवस हा खरंतर तिच्या अपघाती मृत्यूचा होता. मी आणि आई हॉल मध्ये गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि घरचा दरवाजा उघडाच होता. (त्या काळी फ्लॅट मध्ये राहणाऱ्या शेजार्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असायचे आणि शक्यतो संध्याकाळी सगळ्यांचेच दरवाजे उघडेच असायचे. ) आमच्या शेजारचा दादा धावत आमच्या घरी आला आणि म्हणाला, "अहो काकू, डायना मावशी गेली. या ना टीव्ही वर दाखवतायेत..". त्या क्षणाला माझ्या डोक्यात दोन - तीन प्रश्न आले ते मला स्पष्टपणे आठवतायत.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #PrincessDiana #भटकंती