ती आली तेव्हा रिमझिम

ती गेली तेव्हा रिमझिम...

Submitted by अजय चव्हाण on 1 April, 2020 - 13:37

हाटेपासून "हा" पाऊस कोसळत होता. नुसताच रिमझिम आणि चिंब चिंब. पहाटेचा पाऊस मला आवडतच नाही कारण तो मला खुप भकास वाटतो अगदी संध्याकाळच्या पाऊसापेक्षाही. संध्याकाळचा पाऊस मुसमुसणं असतं तर पहाटेचा पाऊस मला हुंदक्यासारखा वाटतो. अगदी कंठापर्यंत दाठून आलेला आणि न आवरता येणारा. खरं सांगू का? त्या सुरांत मला दुःखाची, एका अपूर्णतेची छटा दिसते. रडणारे ढग तेव्हा दिसतच नाहीत. दिसतात फक्त अस्पष्ट थेंबाच्या रेषा आणि पाण्यांचा तो केविलवाणा आवाज. असं वाटतं मनातलं काही न सांगता तो बरसत आहे आणि त्याचवेळी तो काही अंशी बहरत असल्याचा भास होतो अगदी शांत, मधुर, स्वखुशी बरसत असल्याचा.

विषय: 
Subscribe to RSS - ती आली तेव्हा रिमझिम