निळा रंग

निळा!

Submitted by kulu on 16 February, 2020 - 00:46

खरंतर निळा हा काही माझ्या अत्यंत आवडत्या रंगांपैकी नव्हेच, पण तरीही ह्या निळ्यानेच मला सगळ्यात जास्त दर्शन दिले आहे. माझे अत्यंत प्रसन्न निसर्गदर्शन सगळे या निळ्याशी संबंधित आहे. क्रूझवर डेकवर बसलं कि समोर दर्याचा स्वच्छ ओला निळा क्षितिजापर्यंत ताणलेल्या धुतल्या निळ्या वस्त्रासारखा पसरलेला असतो आणि त्याच्या वर आकाशाचा निळा त्याला भेटायची घाई करत असतो. हे निळे बदलत जातात, हवेत बाष्प असलं कि पांढुरका निळा, पाऊस पडणार असला कि करडा निळा पण मला आवडतो तो पाऊस पडल्यानंतर अभ्रकाचे ऊन पडल्यावर दिसणारा निळा. तो स्फटिकासारखा पवित्र निळा, बाळाच्या निरागस हसण्यासारखा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - निळा रंग