आठवणीतील 'शाळा' :-3

आठवणीतील 'शाळा' :-3

Submitted by Cuty on 7 February, 2020 - 05:56

वर्गात शिकवणे सुरू झाले. आणि सर्वप्रथम 'पाठांतर' ही संकल्पना समजावून घ्यावी लागली. गुरूजींनी पाढे शिकवायला सुरूवात केली. रोज एक पाढा आमच्याकडून म्हणवून घेत आणि पाठ करायला थोडा वेळ देत. मग वही मिटून, न बघता म्हणायला लावत. तेव्हा कुठे, पाठांतर म्हणजे काय, हे लक्षात आले. कुणाचे लवकर पाठांतर होई, कुणाचे होत नसे. ज्यांचे पाठ नसे ती मुले छडी खात आणि अंगठे धरून उभी राहत. बाकीची मुले 'वाचलो बाबा आपण!' असे भाव चेहर्यावर घेऊन भीतभीतच खाली बसत. खरे तर, उद्या आपल्याला छडी बसू नये, लवकर पाढे पाठ व्हायला पाहिजेत ही भिती त्यांच्याही मनात असे. मग मी एक युक्ती काढली.

Subscribe to RSS - आठवणीतील 'शाळा' :-3